के रहेजा कॉर्पच्या ‘विवारिया’ ला ‘सर्वोत्तम रहिवासी संकुलाचा’ पुरस्कार

के रहेजा कॉर्पच्या ‘विवारिया’ ला ‘सर्वोत्तम रहिवासी संकुलाचा’ पुरस्कार

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात के रहेजा कॉर्पच्या मुंबईतील प्रीमियर निवासी स्थान असलेल्या महालक्ष्मी येथील ‘विवािया’ला ‘इ वॉर्ड मधील सर्वोत्तम रहिवासी संकुल’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. गोल्ड ग्रीन होम सर्टिफिकेशन मिळवणारी विवारिया ही दक्षिण मुंबईतील पहिली रहिवासी इमारत ठरली आहे आणि यात घन कचरा व्यवस्थापन, कच्चा माल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जा संवर्धन आणि मध्यवर्ती पाणी तापवण्याची यंत्रणा, जल शुद्धीकरण प्रकल्प, ओल्या कचऱ्याचे कम्पोस्टिंग अशा प्रक्रिया इथे राबवल्या जातात ज्यातून रहिवाशांना जगण्यासाठी सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी 2 ऑक्टोबर 2017 रोजी कचरा व्यवस्थापन तपासणी विवारियामध्ये स्वच्छ भारत अभियना अंतर्गत 25 डिसेंबर 2016रोजी चालू झालेल्या स्वच्छ ग्रही अंतर्गत केली. आरोग्यदायी स्वच्छ परिस्थितीचा संदेश देशातील नागरिकांना देण्यासाठी आणि देशाच्या नागरिकांनी आरोग्यदायी परिस्थिती आणि पर्यावरणस्नेही वातावरण ठेवावे याला चालना देण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.  विवारियाने पर्यावरणीय विकासासाठी ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण आणि ओल्या कचर्‍याच्या योग्य पद्धतीने कम्पोस्टिंगद्वारे आपला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई मनपाचे अधिकारी या ऑटोमटेड कचरा विल्हेवाट लावण्याच्या यंत्रणेने आणि विवारियामध्ये बागेत कम्पोस्टच्या वापराने प्रभावित झाले.

या यशानंतर के रहेजा कॉर्पची विवारिया मुंबई महापालिकेच्या वॉर्डला स्वच्छ भारत अभियान सर्व्हे 2018मध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम रहिवासी संकुल प्रकारात प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे. नवी दिल्लीतील अधिकारी जानेवारी 2018मध्ये मालमत्तेची आणि मानकांची पहाणी करणे अपेक्षित आहे.

या सर्टिफिकेशन बाबत बोलताना के रहेजा कॉर्पचे श्री. विनोद रोहीरा म्हणाले की, “के रहेजा कॉर्पमध्ये हा आमचा प्रयत्न असतो की आम्ही चालवत असलेल्या सोसायटीजवर पर्यावरण स्नेही आणि शाश्वत पर्यायांद्वारा सकारात्मक परिणाम होईल. या पर्यावरणीय जीवनवर भर असलेला सर्वांकष अनुभव आम्ही देऊ करत असताना या सर्टिफिकेशन मधून आमची पर्यावरणासाठी असलेली कटिबद्धता अधोरेखत होते.
   
या उपक्रमासाठी आम्ही मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करतो ज्यामुळे अजून कॉर्पोरेट्स आणि रहिवासी संकुले यांना स्वच्छ आणि हरित परिसर निर्माण करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उत्तेजना मिळेल ज्यामुळे दीर्घ काळात समाजाला फायदा होऊ शेकल.”

बृहन्मुंबई महापालिकेच्या एच पूर्व वॉर्डने ही बीकेसी मुंबईतील के रेहेजा कॉर्पला रहेजा टॉवर्समधील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत उल्लेखनीय स्वच्छता कार्याची दखल घेत पुरस्कार दिला आहे.   


व्यावसायिक आणि रहिवासी अशा दोन्ही प्रकारात के रहेजा कॉर्प शाश्वत हरित क्षेत्रासाठी कटिबद्ध आहे आणि त्यांच्याकडे 42.59 दशलक्ष चौ.फु. एवढे हरित क्षेत्र आहे. पर्यावरणसाठी पुढाकार घेणारे म्हणून कंपनी ऊर्जा सक्षम स्त्रोत वापरते आणि अनावश्यक वापर टाळून संवर्धन व शाश्वत विकासाची गरज ओळखून आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.