बजाज ऑटो द्वारा नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५ लाँचची घोषणा

बजाज ऑटो द्वारा नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५ लाँचची घोषणा
बजाज ऑटो ने नवीन प्रीमियम एक्जीक्यूटिव डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर 125च्या परिचयाची आज घोषणा केली. नवीन स्टायलिश लुक्ससोबतसशक्त प्रदर्शन आणि जागतीक दर्जाचे डबल एलइडी डीआरएल्स (डे रनिंग लाइट्स) हेडलँप्स उपलब्ध आहेत. आपल्या २००४ मधल्या परिचयापासून डिस्कव्हर ब्रँड आपल्या सर्वोत्तम प्रदर्शन आणि वेगळ्या स्टायलिंगसाठी प्रसिध्द आहे. नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५ याला सेगमेंट गुणविशेषांमधल्या काही सर्वप्रथम घटकांसोबत आता आणखीन वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहे. 
लाँचच्या वेळी बोलताना श्री एरिक वासप्रेसिडेंट (मोटरसायकल्स)बजाज ऑटो लि. म्हणाले, बजाज ने प्लॅटिना कम्फर्ट टेक आणि सीटी १०० सोबत १००cc विभागात अतिशय उदबोधक प्रभाव पाडला आहे. नवीन डिस्कव्हर ११० आणि १२५१००-१२५cc विभागातील ग्राहकांसाठी प्रिमियम अनुभवाच्या दृष्टीने पहिल्यांदाच गुणविशेष आणत आहे. डिस्कव्हर ग्राहकांच्या अगदी नवीन सेटला आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या लाभांची अपेक्षा असते. 
नवीन प्रीमियम एक्जीक्यूटिव डिस्कव्हरमध्ये एकमेव द्वितिय असे एलइडी डीआरएल हेडलँप्स आहेत जे विशेष विभागात प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहेत. बाइकला स्टायलिश लुक देण्यासोबतइंधनामध्ये कोणाताही लक्षणीय प्रभाव पडू न देता ते अगदी दूरवरुन दृष्टीपथात पडतात. केवळ प्रिमियम बाइक्समध्ये आढळणारा डिजीटल स्पिडोमीटर आता डिस्कव्हरमध्ये देखील दिसणार आहे. नवीन प्रीमियम एक्जीक्यूटिव डिस्कव्हर ११० आणि डिस्कव्हर या काळालाल आणि निळा तीन रंगांमध्ये उपलब्ध असतीलत्यांची किंमत  डिस्कव्हर ११० रु. ५०,४४६ (एक्स-शोरुम महाराष्ट्र) आणि डिस्कव्हर १२५ ड्रम व डिस्क आवृत्तीसाठी (एक्स-शोरुम महाराष्ट्र) अनुक्रमे रु. ५३,४९१आणि रु. ५६,३१४मध्ये उपलब्ध आहे. 
दोन्ही डिस्कव्हर्स नवीन लाँग स्ट्रोक इंजिन्ससोबत येत आहेतज्यामध्ये सर्वोत्कृष्ठ दर्जाचा टॉर्क आणि पावर आहे. यामुळे राइड रहदारीच्या स्थितीत सुध्दा ऊर्जादायक आणि मजेची होते. नवीनच ओळख करुन देण्यात आलेली ४ स्ट्रोकएयर कूल्डसिंगल सिलेंडर ११५.५cc डीटीएस-आय इंजिनसोबत येते जी आघाडीच्या श्रेणीची ८.६पीएस पावर आणि ९.८१एनएम टॉर्क देते. दुसऱ्या बाजूला डिस्कव्हर  १२५.४स्ट्रोक, एयर कूल्डसिंगल सिलेंडर १२४.५cc डीटीएस-आय इंजिनसोबत येते जी आघाडीच्या श्रेणीची ११ पीएस पावर आणि ११एनएम टॉर्क देते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24