सिनेपोलिसद्वारे भारतातील पहिल्या वायरलेस वर्च्युअल रिअलिटी लाऊंजचा शुभारंभ


 सिनेपोलिसद्वारे भारतातील पहिल्या वायरलेस वर्च्युअल रिअलिटी लाऊंजचा शुभारंभ

सिनेपोलिस ह्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय आणि जगातल्या दुस-या सर्वांत मोठ्या थिएटर सर्किटद्वारे चित्रपट प्रेक्षकांना अधिक थरारक आणि इंटरएक्टिव्ह व्हर्च्युअल रिअलिटी (व्हीआर) असलेले कंटेंट आणण्यासाठी भारतातील पहिले अद्ययावत वायरलेस व्हीआर गेमिंग झोनचा शुभारंभ पुण्यातील सिनेपोलिस सीजन्स मॉल येथे केला जात आहे.

पहिल्या वायरलेस व्हर्च्युअल रिअलिटी लाऊंजसह दर्शकांसाठी सिनेपोलिस व्हीआर गेमिंग झोनमध्ये अतिशय विलक्षण अनुभव उपलब्ध करून दिला जाईल. सिनेपोलिस व्हीआरला इतरांपासून वेगळी करणारी मुख्य बाब म्हणजे ते पूर्णत: वायरलेस आहे, म्हणजे इथे प्रेक्षक मुक्तपणे फिरू शकतात व त्यांना अल्ट्रा लो लॅटन्सी असते म्हणजे फिरणा-यांना फिरल्यामुळे अजिबात त्रास (चक्कर) होत नाही. त्यामध्ये मल्टी प्लेअर आणि मल्टी लोकेशनची सुविधासुद्धा आहे. त्यामुळे आपण गेम खेळण्यासाठी दुस-या सिनेपोलिसमधल्या आपल्या फ्रेंडसोबत मिळून एक टीम बनवू शकता.
विस्ताराच्या टप्प्यामध्ये ही सुविधा मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल. गेमिंग कंटेंटही नियमित प्रकारे अपडेट केले जाईलस्.

ह्या प्रसंगी बोलताना सिनेपोलिस एशियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जेव्हिएर सोटोमेयर ह्यांनी म्हंटले, “आमच्या दर्शकांना असाधारण ग्राहक अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिनेपोलिस सीजन्स, पुणे येथे भारतातील पहिले वायरलेस व्हीआर गेमिंग झोन सुरू करताना आम्हांला आनंद होत आहे. आम्ही नंतर ही सेवा अन्य शहरांमध्येही सुरू करू. भविष्यात आमच्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही अशा आणखी सेवा आणत राहू.”


सिनेपोलिस इंडियाचे स्ट्रॅटजिक इनिशिएटिव्हजचे डायरेक्टर श्री. देवांग संपत ह्यांनी म्हंटले, “सिनेपोलिस व्हीआरचा शुभारंभ हा आमच्या ग्राहकांसोबत जोडले जाण्याचा आणखी एक उपक्रम आहे व त्याद्वारे त्यांना शुद्ध मनोरंजनाच्या अतिशय अमर्याद संधी मिळतील. मनोरंजन क्षेत्रात व्हीआर हा नव्याने समोर येणारा ट्रेंड आहे आणि आम्हांला खात्री आहे की, ह्याद्वारे मनोरंजनाच्या नवीन मितींचा शोध घेताना आमच्या दर्शकांना खूप आनंद मिळेल. ह्या शुभारंभासाठी अक्षय कुमार ह्यांना आमंत्रित करतानाही आम्हांला अतिशय आनंद होत आहे."

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.