महाराष्ट्र शासनाद्वारे पहिल्यावहिल्या मुंबई खरेदी महोत्सव २०१८ ची घोषणा

महाराष्ट्र शासनाद्वारे पहिल्यावहिल्या मुंबई खरेदी महोत्सव २०१८ ची घोषणा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन हे संयुक्तपणेआपला पहिलावहिला वार्षिक मुंबई खरेदी महोत्सव (एमएसएफ) सादर करण्यास सज्ज झाले आहेत. भारतातील हा पहिलाच असा शहरी महोत्सव असून तो १२ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान मुंबईच्या कानाकोपर्‍यात साजरा होणार आहे.

एकमेव अशा बाजारपेठा आणि फ्लॅश मॉब,मोठी विक्री आणि बक्षिसे, अशा विविध गोष्टीतून मुंबईचा पहिलाच असा ३ आठवड्यांचा हा उपक्रम छाप पाडून जाणार आहे. आपल्याला आपल्या मित्र व कुटुंबासह मजा करायची असेल किंवा फॅशनचे ताजे ट्रेंड पहायचे असतील, तर एमएसएफ २०१८ ला अवश्य भेट द्या. या महोत्सवाला भेट देणार्‍यांना जागतिक दर्जाचा, गुंगवून टाकणारा खरेदीचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर मनाला भुरळ घालणारे नृत्य, संगीताचे कार्यक्रम शहरभर सुरू असतील.

महाराष्ट्र शासनाने एवढ्यातच दिलेल्या एका आदेशानुसार दुकाने व आस्थापना २४ x ७ उघडी राहू शकतात. या आदेशाचा फायदा घेत पर्यटन मंत्रालय व एमटीडीसी हे मुंबईतील पहिलाच छोट्या मोठ्या वस्तूंचा रात्रीचा बाजार भरवत आहे जो केवळ आठवड्याच्या शेवटी असेल आणि पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहील. यामुळे नागरिकांना मुंबई खरेदी महोत्सवाचा पुरेपूर फायदा उठवता येईल आणि मुंबईकरांना #MumBuyKarहा हॅशटॅगखर्‍या अर्थाने साजरा करता येईल.

या प्रसंगी बोलताना श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, म्हणाले, “भारतात आणि महाराष्ट्रात प्रथमच आम्ही आपल्यासाठी मुंबई खरेदी महोत्सव २०१८ सादर करीत आहोत. मला हे जाहीर करताना अभिमान आणि आनंद वाटतो की हा महोत्सव १२ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान होत असून याद्वारे मुंबई हे जागतिक दर्जाचे खरेदी केंद्र म्हणून उदयास येईल. या महोत्सवाला आमचे भागीदार विक्रेते, ब्रॅंड, उपहारगृहे यांच्याकडून मिळणारा उत्साही प्रतिसाद पाहून आनंद होतो आहे. या सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन मुंबई खरेदी महोत्सव प्रत्यक्षात उतरवला आहे. प्रत्येक मुंबईकराने आणि देशाच्या नागरिकांनी हा महोत्सव साजरा करण्यात सहभागी व्हावे.

या आनंदात भर घालण्यासाठी, मुंबई खरेदी महोत्सवादरम्यान मुंबईतील पहिलाच फूड ट्रक झोन विविध ठिकाणी आठवड्याच्या शेवटी उपलब्ध असेल. पर्यटक आणि मुंबईकर नागरिक दोघांनाही ग्राहकाभिमुख उत्साह आणि जादुई अनुभव यांचा संगम अनुभवायला मिळेल.

भारताची आर्थिक आणि मनोरंजन राजधानी म्हणून मुंबई एक पर्यटन स्थळ आणि उत्साही जीवनशैली यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासाठी हे प्रगतीसाठी महत्वाचे क्षेत्र आहे. एमएसएफ २०१८ महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देईल. आमचे ध्येय हा उपक्रम जागतिक मंचावर सिद्ध करणे असे आहे. हा महोत्सव जगातील एक हवाहवासा खरेदी आणि सांस्कृतिक महोत्सव ठरावा. हा एमटीडीसीचा एक मोठा उपक्रम असून येत्या वर्षांत त्याला आणखी भव्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असेश्री जयकुमार रावळ, पर्यटन मंत्री व (ईजीएस), महाराष्ट्र शासन, म्हणाले.

मुंबई खरेदी महोत्सवच्या निर्मितीविषयी बोलताना श्री विजय वाघमारे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, म्हणाले, “मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि फॅशनचे माहेरघर आहे. एमटीडीसीला इथे महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई खरेदी महोत्सवाची निर्मिती करताना आनंद होतो आहे. आबालवृद्धांसाठी हा एक उत्तम उपक्रम आहे ज्याद्वारे ते शहरात होणार्‍या विविध कार्यक्रमांसाठी एकत्र येऊ शकतात. याद्वारे आम्ही महसूल आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रगतीची अपेक्षा करतो. आम्हाला अशी आशा आहे की येत्या वर्षांत या महोत्सवाची उत्तुंग वाढ होईल. यातून #MumBuyKarही भावना जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचेल.

ग्राहकांना प्रोत्साहन देणे हा मुंबई खरेदी महोत्सवाचा महत्वाचा भाग आहे. भाग्यवान ग्राहक रोज, दर आठवड्याला, आणि महोत्सवाच्या शेवटी भव्य बक्षिसे जिंकू शकतात. यासाठी ग्राहकांना रु ५००/- मूल्य असलेल्या वस्तु एमएसएफ नोंदणीकृत आस्थापनेतून विकत घ्याव्या लागतील. नंतर एक एसएमएस <MSF><पावती क्रमांक><दुकानाचे नाव ठिकाण><रक्कम><भागीदार दुकानात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर> या महितीसह ५६२६३ या क्रमांकावर पाठवावा लागेल. एमएसएफचे लेखापरीक्षण भागीदार पीडब्लूसी हे प्रत्येक श्रेणीतील विजेते संगणकीय सोडतीद्वारे निवडतील.

या महोत्सवादरम्यान शहरात दर आठवड्याच्या शेवटी विविध ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम होतील. मुंबईत विविध टप्प्यात ५०० पेक्षा अधिक कार्यक्रम १३ ठिकाणी जसे की गिरगाव चौपाटी, क्रॉफर्ड मार्केट, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, दादर, कार्टर रोड, वांद्रे, जुहू चौपाटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अंतरदेशीय विमानतळ, वाशी रेल्वे स्थानक, द वॉक, ठाणे, सायप्रस उद्यान, मुलुंड, गॅलरीया मॉल, पवई आणि मॅक्सस मॉल, मीरारोड या ठिकाणी होतील.

एमएसएफ रात्रीचा बाजारअनिवासी निर्देशित क्षेत्रात भरवला जाईल आणि दुकाने पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
·         १९ व २० जानेवारी मालाड येथे
·         २६ व २७ जानेवारी पवई येथे

फूड ट्रक असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने एमएसएफ खाऊ गल्ली प्रसिद्ध सार्वजनिक ठिकाणी आठवड्याच्या शेवटी भरवण्यात येईल.
·         १३ व १४ जानेवारी वरळी सी फेस येथे
·         १९ व २० जानेवारी मालाड येथे
·         २६ व २७ जानेवारी पवई येथे

द कलर रन अर्थात पृथ्वीवरील सर्वात आनंदी ५ किमी धाव ही एक अनोखी स्पर्धा आहे जी आरोग्य, आनंद आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व या गोष्टी साजरी करते. द कलर रन ही आता जगातली सर्वात मोठी धावण्याची मालिका असून जगभरातील ४०+ देशातील ६ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे. ही आता भारतात येत असून मुंबई खरेदी महोत्सवात ती इथे सादर करण्यात येईल. द कलर रन जियो गार्डन्स, वांद्रे कुर्ला संकुल येथे रविवार १४ जानेवारी २०१८ रोजी संपन्न होईल.

मुंबई खरेदी महोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी एमटीडीसी ने विविध संघटना, संस्था जसे की एमसीएचआय, क्रेडई, फिक्की, एफएचआरएआय इंडिया, जीजेईपिसी इंडिया, नरेडको, रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय), इंडियन बुलियन व ज्वेलर्स, आणि फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशन (एफआरटीडब्लुए) यांच्याशी भागीदारी केली आहे. मुंबई खरेदी महोत्सव २०१८ चे खरेदी भागीदार म्हणून आघाडीचे मॉल व मुंबईतील रिटेल दुकानांच्या साखळ्या पुढे आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.