वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

बिर्ला एड्युटेक लिमिटेडने (बीईएलबिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल (बीओएमआयएस) ची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.  शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम दिग्गजांसोबत एनएससीआय येथे झालेल्या पॅनेल चर्चेनंतर यासंबंधीची घोषणा करण्यात आली.  दक्षिण मुंबईत असणाऱ्या काही मोजक्या आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बीओएमआयएसच्या येण्याने भर पडली आहे.  त्यांचा अभ्यासक्रम हा सर्व-समावेश असून तो समग्र दृष्टीकोन ठेवून तयार करण्यात आला आहे.  
काही विशिष्ट विषय आणि स्टेम आधारित (विज्ञानतंत्रज्ञानअभियांत्रिकी आणि गणितएकात्मिक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या जोडीला अभ्यासेतर उपक्रमांना समान महत्त्व देऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची शिक्षणाची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवून बीओएमआयएसने कला प्रदर्शनाच्या सत्रासाठी हेलन ओ ग्रॅडी आणि विशिष्ट नृत्य सत्रासाठी शामक डावर इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यासारख्या प्रख्यात संस्थांशी हात मिळवणी केली आहेविद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्यासाठी फरटॅडोस स्कूल ऑफ म्युझिकची निवड केली गेली आहे. पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून या नव्या आंतरराष्ट्रीय शाळा प्रवेशासाठी अनेकांनी चौकशी सुरू केली आहे.  
एनएससीआय येथे झालेल्या चर्चासत्रात रुचिरा घोषडॉइंदू शहानीश्रीफ्रान्सिस जोसफडॉकविता अग्रवालश्रीमिकी मेहताश्रीस्पोकी व्हीलरडॉकुमी वेवैनाश्री.फ्रेझर स्कॉटशीना चौहानडॉतुषार गुहाडॉरेनी फ्रान्सिसविलिर्ब्रोड जॉर्जडॉसुनिता वाडीकर आणि परवीन शेख ही ख्यातनाम मंडळी उपस्थित होती. 
याप्रसंगीआयएसएमईच्या संस्थापक-डीन आणि आयएसडीआयच्या अध्यक्षा डॉइंदू शहानी म्हणाल्या, “बीईएलने मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते.  आमच्या संस्थेतून अनेक पदवीधर उत्तीर्ण झाले आहेत जे आज यशस्वी व्यावसायिकउद्योजक आहेतपण तरीदेखील कोणीही शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले की माझे मन आनंदाने भरून येते.  भारतातील सरासरी वय हे 29 वर्षे आहे आणि एक भक्कम आणि नवा भारत घडविण्याच्या दृष्टीने ही आपल्यासाठी एक मोठी संधी आहेही तरुण पिढी हेच भारताचे भविष्य आहे. या तरुण पिढीच्या क्षमता वाढविण्याच्या कार्यात आपला हातभार लागतो आहे याचे मला खूप समाधान आहे. या क्षेत्रात प्रंचंड बदल घडवून आणण्याची गरज आहेमुलांच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अंगीभूत सर्जनशीलतेलाकल्पनांना आणि नव्या उपक्रमांना वाव देण्याची गरज आहे. या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व लोकांना मी मनापासून शुभेच्छा देते.
नव्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगीव्यवसाय विकास प्रमुख श्रीनिर्वाण बिर्ला म्हणाले, “भारताचे भविष्य असणाऱ्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि भारतीय शिक्षण पद्धती अधिक चांगली करणे हे बिर्ला एड्युटेकचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. जगभरातील मुलांबरोबर जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची क्षमता निर्माण करण्याचे आणि त्यांना बळकटी देण्याचे ध्येय बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल.
यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्रीयश बिर्ला म्हणाले, “भारत ही जगातील सर्वात जास्त प्रगतीशील अर्थव्यवस्था आहे.  आपल्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 54%लोकसंख्या ही 25 वर्षांच्या आतील आहे. अशा परिस्थितीतजागतिक स्तरावरील गरजा पूर्ण करू शकेल अशा प्रकारचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना देऊ करणे ही आपली जबाबदारी आहे. कामाची गरज असणारी माणसे मोठ्या संख्येने आपल्यापुढे उभी आहेत. त्यांना सुयोग्य पद्दतीने जागतिक दर्जाचे शिक्षण देणे आणि प्रगत जगासोबत चालण्यासाठी आवश्यक ते ज्ञान पुरविणे अतिशय महत्त्वाचे आहे.
हा उद्घाटन सोहळा हा एका माहितीपर परिषदेचा एक भाग होता. जीबीएमएसच्या प्राचार्या मादीपा शेट्टी यांनी लोकांचे स्वागत केले आणि या उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  कौशल्य विकास आणि सर्व-समावेशक शिक्षण याव्यतिरिक्त विकसित देशातील शिक्षण क्षेत्राचा कल समजून घेणेसामाजिक रचना आणि शिक्षण पद्धती यामंधील संबंधशिकविण्यापासून शिकण्यापर्यंतच्या प्रवासाचे टप्पे इकाही विषयांवर यावेळी उहापोह केला गेला.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy