'पॉड' हॉटेलला सर्वोत्कृष्ट ‘बुटीक हॉटेल ऑफ द इयर’ पुरस्कार

'पॉड' हॉटेलला सर्वोत्कृष्ट ‘बुटीक हॉटेल ऑफ द इयर’ पुरस्कार

भारतात २०१७ साली प्रथमच मुंबईत अंधेरी (पूर्व) येथे  सुरु करण्यात आलेले ‘पॉड’ हॉटेल असणाऱ्या अर्बनपॉडने देशातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आपले अस्तित्व ठळकपणे निर्माण केले आहे. गेल्या वर्षी अर्बनपॉडच्या माध्यमातून भारतातील हॉस्पिटॅलिटी विभागात प्रथमच एका ‘नवीन श्रेणीची’ लोकांना ओळख करुन देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या एका वर्षात अर्बनपॉडच्या सेवेचा लाभ भारतीय तसेच परदेशातील प्रवाशांनीही घेतला असून येथे भेट देणाऱ्याची संख्या १० हजाराहून अधिक आहे. विशेष म्हणजे अर्बनपॉडला भेट देणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड वैविध्य असून जगभरातील ४० हून अधिक देशांच्या नागरिकांनी अर्बनपॉडच्या सेवेचा लाभ घेतला आहे.


अर्बनपॉड प्रायवेट लिमिटेडचे सहसंस्थापक हिरेन गांधी यांनी याबाबत माहिती दिली, ‘‘यापूर्वी फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवाशांमध्ये पॉड हॉटेल्स लोकप्रिय होती. आता मात्र भारतीय प्रवासीही या नाविण्यपूर्ण संकल्पनेकडे आकर्षित होत आहेत. अर्बनपॉडच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे येणारा ३० ते ४५ या वयोगटातील मोठ्या संख्येतील पर्यटक, नागरिक अर्बनपॉड मध्ये मोठ्या संख्येने एकट्या महिला पर्यटक तसेच महिला व्यावसायिकही येत असतात. त्यांच्याकडून महिला पॉड्स विभागातील सुरक्षा, आरोग्यदायी वातावरण आणि आरामाला पसंती दिली जात असते. आमच्या ‘पॉड’ हॉटेलने या उद्योगात मानाचे समजला जाणारा टॉप रेटेड आणि ‘सर्वोत्कृष्ट बुटीक हॉटेल ऑफ द इयर’ हा पुरस्कारही मिळवला. या यशामुळे देशातील इतर शहरांमध्येही आमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा आम्ही विचार करत आहोत.”
अर्बनपॉडने जगातील सर्वोत्कृष्ट असे अतिशय सुंदर आणि सुबक, उच्च तंत्रज्ञानयुक्त सेल्फ कंटेंड पॉड्स बनवण्याची उच्चतम कामगिरी केली आहे. (ज्याची तुलना नेहमी अंतराळयानाशी करण्यात येते) जागतिक स्तरावरील ग्राहकांना आकर्षित करण्यात हे अद्ययावत आणि सुधारीत पॉड्स यशस्वी ठरत आहेत. अर्बनपॉड प्रवाशांना राहण्यासाठी एक ‘स्मार्ट-स्टे’ पर्याय उपलब्ध करुन देतो. या ठिकाणी ग्राहकांना पॉकेट फ्रेंडली आकाराच्या पॉड्समध्ये अगदी उच्चभ्रू हॉटेलच्या तोडीस तोड या प्रकारच्या सेवा सुविधा आणि आराम उपलब्ध होतो. आधुनिक प्रवाशांना त्यांच्या घराच्याबाहेर अपेक्षेनुसार आरामदायक निवारा पॉड हॉटेल्समध्ये उपलब्ध करुन दिला जातो. नवीन युगातील प्रवासी (व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारचे) एकटे प्रवासी, प्रवाशांचे समुह (अभ्यासगट, संशोधक आणि खेळाडू) बॅकपॅकर्स असे २० ते ५० या वयोगटातील सर्व प्रकारचे पर्यटक आणि प्रवासी अर्बनपॉडमध्ये राहून गेले आहेत.
‘पॉड’ हॉटेल्स ही संकल्पना लोकांनी लगेचच स्विकारली आणि अनुभवण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने नवीन युगातील प्रवाशांना ही नाविण्यपूर्ण संकल्पना खूपच आवडली. यावरुन लक्षात येते की, भारतीय लोक आणि नवीन स्वरुप, संकल्पना, ट्रेंड्स आणि अनुभवांचा खुल्या मनाने स्विकार करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.