जयंत ऍग्रो-ऑर्गेनिक्स लि. चा केमेक्सिलतर्फे आउटस्टँडिंग एक्सपोर्ट परफॉर्मन्ससाठी सत्कार

जयंत ऍग्रो-ऑर्गेनिक्स लि. चा केमेक्सिलतर्फे आउटस्टँडिंग एक्सपोर्ट परफॉर्मन्ससाठी सत्कार

जयंत ऍग्रो ओर्गानिक्स लिमिटेड या एरंडेल आधारित विशेष रसायन उद्योगामध्ये अग्रणी असलेल्या उदयोन्मुख जागतिक ओलिओकेमिकल कंपनीचा केमॅक्सिलतर्फे (भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निर्यात प्रोत्साहन परिषदेची संस्था) आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पॅनेल IV : स्पेशॅलिटी केमिकलवांगं आणि एरंडेल तेल विभागातील लक्षणीय निर्यात केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

वाणिज्य आणि उद्योग व नागरी विमान वाहतूकीचे माननीय केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार जयंत ऍग्रोचे प्रमुख श्री. अभय व्ही. उदेशी यांना देण्यात आला. याविषयी श्री. उदेशी म्हणाले कि, "जयंत ऍग्रोकडे एरंडेल तेल आधारित रसायने आणि स्पेशॅलिटी केमिकल्सची जगातील सर्वात विस्तृत श्रेणी आहे आणि केमॅक्सिलसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून आमच्या कामाचा गौरव झाल्यामुळे आमच्या संपूर्ण टीमला उत्तेजन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट उत्पादन पुरविण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करतो आणि भविष्यातही आम्ही हे करत राहू."

गेल्या तीन वर्षांत निरंतर वाढीमुळे वर्ष 2016-17 च्या निर्यातीचा आकडा लक्षात घेता गुणवत्तेची पुरस्काराची आणि प्रमाणपत्रांची निवड केली गेली. एकूण 73 पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले ज्यात दोन जीवनगौरव पुरस्कारांचाही समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!