महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एनडी स्टुडियोजशी हातमिळवणी

अनुभवात्मक पर्यटन आणि आर्टिस्ट ऑफ टॅलेंटला चालना देण्यासाठी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची एनडी स्टुडियोजशी हातमिळवणी

अभ्यागतांना महाभ्रमण देणार बॉलीवूड स्टारचे आयुष्य जगण्याची संधी 


 पर्यटनाच्या विविध पैलूंना चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) महाभ्रमण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या क्षेत्रातील बदलते कल लक्षात घेता कृषी पर्यटनबॉलीवूड पर्यटनग्रामीण पर्यटनखाद्यपर्यटनशैक्षणिक पर्यटन इत्यादी उपविभाग उदयास आले आहेत. विविध सामाजिक स्तरातील पर्यटकांना महाभ्रमणतर्फे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव उपलब्ध करून देण्यात येत आहेत. श्री. नितीन देसाई यांनी उभारलेल्या एनडीज फिल्म वर्ल्ड या भारतातील पहिल्या बॉलीवूड थीम पार्कशी एमटीडीसीने हातमिळवणी केली असून या माध्यमातून कर्जतमध्ये बॉलीवूड पर्यटनाचा एक विस्मयकारक अनुभव उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सहलीमध्ये 'प्रेम रतन धन पायो', 'जोधा अकबर', 'किकआणि 'इंदू सरकारया चित्रपटांच्या सेटवर जाता येणार आहे. महाभ्रमणमधून पर्यटकांना बॉलीवूडची रोमांचक सफर घडणार आहे. एमटीडीसीतर्फे एनडी स्टुडियोजच्या सहकार्याने आर्टिस्ट्स ऑफ टॅलेंट स्ट्रीटही आयोजित करण्याचा विचार आहे. या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांना आपली कला सादर करता येते आणि लोकप्रियता मिळवता येते. एनडी स्टुडियोजमधील विशिष्ट भागामध्ये बांधण्यात आलेल्या स्टॉलमध्ये विविध सादरीकरणांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
याबद्दल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय वाघमारे म्हणाले, "विविध उपक्रमांच्या माध्यमातून कला आणि संस्कृती यांना चालना देण्यासाठी गुणी कलाकारांना प्रोत्साहन देणे हे आर्टिस्ट्स ऑफ टॅलेंट स्ट्रीटचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना त्यांची कला सादर करता येणार आहे. आम्ही एनडी स्टुडियोजशी केलेल्या हातमिळवणीमुळे अधिकाधिक कलाकारांना आकर्षित करता येईल आणि येणाऱ्या भविष्यकाळात या उपक्रमाला घवघवीत यश लाभेलहा आम्हाला विश्वास आहे."
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महासंचालक श्रीमती स्वाती काळे म्हणाल्या, "एनडी स्टुडियोच्या सहकार्याने आम्ही लवकरच आमचा मोबाईल टॅलेंट स्ट्रीट हा उपक्रम सुरू करत आहोतही घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या उपक्रमाच्या नावातून सूचित होत असल्यानुसार हा उपक्रम शहरातील विविध भागांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बॅलार्ड महोत्सवात वरळी सी फेसवर आर्टिस्ट्स ऑफ टॅलेंट स्ट्रीट आयोजित करणार आहोत. अभ्यागतांना कलेच्या माध्यमातून हा खजिना अनुभवण्यासाठी आर्टिस्ट्स ऑफ टॅलेंट स्ट्रीट काळा घोडा हे उत्तम व्यासपीठ आहे.
दिग्गज कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर श्री. नितीन चंद्रकांत देसाई म्हणाले, " महाभ्रमणचा एक भाग होता आल्याचा मला खूप आनंद आहे. पर्यटन क्षेत्रात बरेच बदल होत आहेत आणि गेल्या काही दशकांपासून विविध क्षेत्रांमध्ये त्याचा आवाका वाढला आहे. महाभ्रमणचा एक भाग असलेल्या बॉलीवूड पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी पर्यटकांना सिनेमा आणि पडद्यामागील कामे जाणून घेता येणार आहेत. तरूण कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देणाऱ्या आर्टिस्ट्स ऑफ टॅलेंट स्ट्रीटचा एक भाग होताना मीसुद्धा खूप रोमांचित झालो आहे. 
एमटीडीसीबद्दल: पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळेतेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशेमहाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारेअभयारण्येथंड हवेची ठिकाणेनैसर्गिक गुंफाधबधबेभव्य किल्लेविविधरंगी महोत्सवप्राचीन तीर्थस्थळेवस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/
एनडीज आर्ट वर्ल्ड प्रा. लि.बद्दल
मनोरंजन क्षेत्रात एक ठसा उमटविण्यासाठी २००२ साली दिग्गज प्रोडक्शन डिझायनर श्री. नितीन चंद्रकांत देसाई यांनी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रा. लि.ची स्थापन केली. दूरचित्रवाणी मालिकांसाठी कला दिग्दर्शन करण्यापासून श्री. देसाई यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी सिनेक्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केलेल्या अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळविले होते. २००५ साली त्यांनी मुंबईजवळील कर्जत  (नैना-एमएमआर-एमएसआरडीसी) (प्रस्तावित नवी मुंबई विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर) येथे एनडी फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडक्शन स्टुडियो सुरू केला.  एनडी स्टुडियोजच्या माध्यमातून त्यांनी अशी जागा उभारली जिथे कलेला बहरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाहीत. या स्टुडियोमध्ये स्टोरिबोर्डिंगपासून अखेरच्या टप्प्यातील पोस्ट प्रोडक्शनपर्यंत चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरील सेवा प्रदान करण्यात येतात.  नितीन देसाई यांनी आपली सुरुवात प्रोडक्शन डिझायनर म्हणून केलेली असल्यामुळे डिझाइनमध्ये प्रत्येक बारीकसारीक पैलूंकडे लक्ष देण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे एनडी स्टुडियोमध्ये होणारी प्रत्येक निर्मितीमध्ये बारकाव्यांकडे लक्ष दिले जाईलयाबाबत ते दक्ष असतात आणि कलाकारांना त्यांना हवा तसा चित्रपट तयार करता यावा यासाठी ते मार्गदर्शन करतात.  मुंबई आणि पुण्यापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या कर्जत (नैना-एमएमआर-एमएसआरडीसी) येथील भारतातील पहिल्या आणि एकमेव मनोरंजन थीम पार्कमध्ये पर्यटन आणि माध्यमे व मनोरंजन क्षेत्र यांची सांगड घालणे ही एनडीज आर्ट वर्ल्डची व्हिजन आहे. एनडी थीम पार्क हा वीकएंड साजरा करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी पर्यटक आपल्या फिल्मी इच्छा पूर्ण करू शकतात आणि बॉलीवूड पर्यटनाला चालना मिळू शकते.
अधिक माहितीसाठी http://www.nitindesaiartworld.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24