पॉवरग्रीडच्या कर वजावटीनंतरचा नफा 8,000 कोटींच्या पलीकडे


पॉवरग्रीडच्या कर वजावटीनंतरचा नफा 8,000 कोटींच्या पलीकडे
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रीड) ही उर्जा मंत्रालय, भारत सरकार आणि सेंट्रल ट्रान्समिशन युटीलिटी (सीटीयू) अंतर्गत येणारी देशातील "नवरत्न" कंपनी असून त्यांना आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान एकूण  30,766 कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात झालेला एकंदर नफा   8,239 कोटींचा होता एकूण उत्पन्नात 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर स्टॅंडअलोन बेसिसवर एकूण नफा आर्थिक वर्ष 2016-17च्या तुलनेत 10 टक्के राहिला. कंपनीला पहिल्यांदाच   30,000 कोटींचे एकूण उत्पन्न   8,000 कोटींचा कर वजावटनंतरचा नफा प्राप्त झाला आहे.
आर्थिक वर्ष 2017-18च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला   2,005 कोटींचा एकूण नफा झाला, 2016-17 मध्ये हा नफा   1,916 कोटी असून तुलना करता यंदा तो 5 टक्क्यांनी वाढलेला दिसतो.

कंपनीचे भांडवल 2017-18 या वित्त वर्षात   27,370 कोटी इतके असून भांडवली खर्च   25,791 नमूद करण्यात आला. 2018-19 च्या आर्थिक वर्षात कंपनीचे   25,000 कोटींच्या भांडवली खर्चाची योजना आहे. कंपनीचा अंतीम डिव्हीडंट 28% वर प्रस्तावित आहे (  10 दर्शनी मूल्याचे   2.80 प्रति समभाग) शिवाय अंतरीम डिव्हीडंटपोटी 24.5% (  10 दर्शनी मूल्याचे   2.45 प्रति समभाग) 2017-18 आर्थिक वर्षाकरिता यापूर्वीच देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान पॉवरग्रीडने आंतर-प्रादेशिक प्रक्षेपण घटक 765 केव्ही डी/सी जबलपूरओराई, एलआयएलओ 765 केव्ही एस/सी सतना-ग्वालियर, ओराई, एनईआर आग्रा एचव्हीडीसीचे पोल-III आणि IV तर चंपा कुरुक्षेत्र एचव्हीडीसीचे पोल -II प्रक्षेपणाची क्षमता 11,400 मेगाव्हॅटने वाढवतील. त्याशिवाय यावर्षी अनेक मुख्य प्रक्षेपणाच्या वाहिन्यांना परवानगी देण्यात आली असून त्यात 765 केव्ही डी/सी अजमेर-चित्तोरगड, 400 केव्ही डी/सी कामेंग-बालीपारा, 400 केव्ही डी/सी औरंगाबाद-बोईसर,  765 केव्ही डी/सी औरंगाबाद-पडघे, 400केव्ही डी/सी पडघे-कुडूस-काला, 765केव्ही डी/सी वर्धा-निझामाबाद आणि 400केव्ही  डी/सी किशेनपूर-डुलहस्ती व किशेनपूर-न्यू वानपोह प्रक्षेपण वाहिन्यांचा समावेश आहे. पॉवरग्रीडने 2017-18 दरम्यान यशस्वीपणे ईआरएसएस XXI ट्रान्समिशन लिमिटेड आणि डब्ल्यूआर-एनआर पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडचे टीबीसीबी अंतर्गत संपादन केले आहे. पॉवरग्रीड टीबीसीबी शाखा म्हणजे पॉवरग्रीड विझाग ट्रान्समिशन लिमिटेड आणि पॉवरग्रीड उंचाहार ट्रान्समिशन लिमिटेडने आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान मध्यवर्ती डिव्हीडंटची घोषणा केली.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.