महाराष्ट्रातर्फे ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस २०१८ उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्रातर्फे ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस २०१८ उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १५ मे २०१८ ते १८ मे २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस या प्रदर्शनात सहभाग घेतला. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, बुद्धिस्ट पर्यटन आदींचा प्रसार करण्यात आला. आपला देश आणि जगातील व्यापार सेवा वृद्धिंगत व्हाव्यात हे ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेसच्या ४ थ्या पर्वाचे उद्दिष्ट होते.


ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेसचे यजमानत्व महाराष्ट्राकडे आहे. जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या निमित्ताने एमटीडीसीतर्फे कृषी पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कारण राज्यामध्ये कृषी पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड संधी आहेत आणि शेतकरी त्यांच्या नियमित शेतीसोबत कृषी पर्यटन सुरू करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध उपक्रमांची आणि राज्यात पिकविण्यात येणाऱ्या पिकांची ओळख होईल. यामुळे शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी कमी होण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे पर्यटनाच्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी एमटीडीसीतर्फे वैद्यकीय पर्यटन आणि बुद्धिस्ट पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. महाराष्ट्रात अद्ययावत आणि आधुनिक सुविधा तसेच सक्षम वैद्यकीय तज्ज्ञांसह सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळतात. त्यामुळे महाराष्ट्र हे वैद्यकीय पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण आहे. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचे जन्मस्थान, शिक्षणाचे ठिकाण, प्रवचने आणि निर्वाणाच्या ठिकाणी बुद्ध तीर्थाटनास चालना देण्यात येते. नागपूरमधील दीक्षाभूमी, नालासोपारा येथील स्तूप, बोरिवलीमधील मंडपेश्वर लेण्या, दादरमधील चैत्यभूमी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्या, घारापुरी लेण्या आणि अजिंठा व वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये निश्चित वाढ होईल.

या प्रसंगी महाराष्ट्राचे सन्माननीय पर्यटन मंत्री श्री. जयप्रकाश रावल म्हणाले, "पर्यटन सेवा एका छताखाली सादर करताना आणि या क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण सेवांपासून प्रेरणा घेताना आम्हाला अत्यंत आनंद आहे. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि जगभरातील भागधारकांना भेटण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. अभ्यागतांच्या मागण्या पुरविण्यासाठी महाराष्ट्रात समृद्ध पर्यटन सेवा उपलब्ध आहेत. पर्यटन प्रकार, चैतन्यमय संस्कृती, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी यांचे मार्केटिंग करण्यासाठी ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेसमध्ये सहभागी होणे ही उत्तम संधी आहे.

या वेळी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव श्री. विजय गौतम (आयएएस) म्हणाले, "जगभरातील उद्योगक्षेत्रांमध्ये पर्यटन क्षेत्र हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेस २०१८च्या माध्यमातून आम्ही वैद्यकीय पर्यटन, कृषी पर्यटन, बुद्धिस्ट पर्यटन यांचा प्रचार करणार आहोत. जगाला सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून देऊन वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करण्याचा आणि महाराष्ट्राला सर्वोत्तम पर्यटन ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने राज्यासाठी पुढील वाटचालीसाठी दिशा ठरविण्याचा हा एक मार्ग आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24