लीभेरने भारतातील व्यवसाय केला अधिक सक्षम, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे नवा उत्पादन प्रकल्प सुरू


लीभेरने भारतातील व्यवसाय केला अधिक सक्षम, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे नवा उत्पादन प्रकल्प सुरू
·         500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या या प्रकल्पात भारतीय ग्राहकांना साजेशा व अतिशय दर्जेदार रिफ्रेजरेशन उपकरणांची निर्मिती केली जाणार
·         विविध रेफ्रिजरेट्समुळे भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार अत्याधुनिक जर्मन इंजिनीअरिंग तंत्रज्ञान भारतात आणले जाणार
·         आगामी वर्षांत रेफ्रिजरेटर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये स्थान सक्षम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट
 जगभर चार कारखाने (युरोपमध्ये 3 व मलेशियामध्ये 1) उभारणाऱ्या व वर्षभरात 2.2 दशलक्षहून अधिक उपकरणांची विक्री केलेल्या लीभेर या जर्मनीतील रेफ्रिजेटरमधील तज्ज्ञ कंपनीने भारतात, महाराष्ट्रातील औरंगाबादमधील शेंद्रा इंडस्ट्रीअल पार्कमध्ये आज उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. कारखान्याचे उद्घाटन डॉ. आयसोल लीभेर व सौ. स्टेफानी वोलफर्थ या लीभेर समूहाच्या दोन भागधारकांच्या हस्ते व देशभरातील डीलर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लीभेरचा हा भारतातील पहिला रेफ्रिजरेटर कारखाना आहे. 50 एकरांमध्ये विस्तारलेल्या या प्रकल्पात उत्पादन, नियोजन व आढावा याविषयी अचूक माहिती व एकात्मिक ट्रेसेबिलिटी सिस्टीम ही क्षमता असलेली स्मार्ट उत्पादन वैशिष्ट्ये, प्रक्रिया व मालमत्ता यांचा समावेश आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन करत असताना, वर्षभरात एकूण अंदाजे 500,000 युनिटची उत्पादनक्षमता आहे. डोमेस्टिक अप्लायन्सेस या उत्पादन विभागात भारतासह पाच देशांमध्ये घरगुती व व्यावसायिक वापरासाठी रेफ्रिजरेटर्स व फ्रीझर्स यांचे उत्पादन केले जाते.  
येत्या काही वर्षांत, प्रामुख्याने सक्षम आर्थिक स्थितीमुळे, भारतातील होम अप्लायन्सेससाठीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वाढती मागणी व या क्षेत्राला असलेला सरकारचा पाठिंबा यामुळे या क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. वाढते विनियोग्य उत्पन्न, तसेच नव्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे झुकलेली आकांक्षा असलेल्या वाढत्या शहरी व निम-शहरी लोकसंख्येमुळे विशेषतः मागणी वाढते आहे.
व्यवसाय वाढीसाठी भारतात असलेल्या क्षमतेविषी बोलताना, डॉ. आयसोल लीभेर यांनी सांगितले, प्रगतीच्या दृष्टीने भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. जीवनशैलीमध्ये झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे, जीवन अधिक आरामदायी व सुलभ करणाऱ्या अप्लायन्सना मागणी वाढत असल्याने भारतात कूलिंग अप्लायन्ससेससाठी प्रचंड संधी आहे, असे आम्हाला वाटते. भारतात नवा कारखाना सुरू केल्याने आम्हाला भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करता येणार आहे”.
त्या पुढे म्हणाल्या, आमच्या पहिल्या कारखान्याचे उद्घाटन 1954 मध्ये झाले आणि हा कारखाना आजही जर्मनीमध्ये उत्पादन करत आहे व मोठ्या संख्येने प्रीमिअम उत्पादनांची निर्मिती करत आहे, यातून आम्ही ज्या गुणवत्ता मापदंडांचे व कामगिरीच्या स्तराचे पालन करतो ते खऱ्या अर्थी दिसून येते.
उद्घाटनानिमित्त बोलताना, लीभेर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ सेल्स ऑफिसर राधाकृष्ण सोमयाजी यांनी सांगितले, " लीभेरच्या ब्रँड मूल्यांचे पालन करत, दर्जेदार अप्लायन्सेसची निर्मिती करणे, जागतिक मापदंड निर्माण करणे, सर्वोत्तम टीम नियुक्त करणे व जागतिक दर्जाच्या स्थानिक पुरवठादारांशी भागीदारी करणे, हे धोरण औरंगाबादमधील उत्पादन प्रकल्पात अवलंबले जाणार आहे. बी2सी/बी2बी श्रेणीतील तज्ज्ञ म्हणून, भारतातील गरजा जगातील अन्य भागांपेक्षा वेगळ्या असल्याचे आम्ही जाणतो आणि म्हणून भारतीय संदर्भ व आमच्या जर्मन तंत्रज्ञानाची सांगड घालून भारतात उत्पादन घेणे योग्य ठरेल.
60 हून अधिक वर्षे, लीभेरच्या रेफ्रिजरेशन व फ्रीझिंग इक्विपमेंटने गुणवत्ता, डिझाइन व नावीन्य या बाबतीत ठसा निर्माण केला आहे. याचे श्रेय आम्ही उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवलंबत असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, दर्जेदार साहित्य व प्रक्रिया यांना व टिकाऊ व उर्जाक्षम उत्पादने निर्माण करण्याच्या त्यांच्या क्षमतेला जाते. "
लीभेरविषयी: लीभेर समूहामध्ये प्रत्येक खंडातील एकूण 50 देशांमध्ये अंदाजे 130 कंपन्या आहेत आणि 44,000 कर्मचारी आहेत. 2017 मध्ये, लीभेरने 9.8 अब्ज युरो इतकी एकूण उलाढाल केली. डोमेस्टिक अप्लायन्सेस उत्पादन विभागात खासगी व व्यावसायिक वापरासाठी चार देशांत रेफ्रिजरेटर्स व फ्रीझर्स यांचे उत्पादन केले जाते आणि औरंगाबादमुळे एकूण उत्पादन प्रकल्पांची संख्या पाच होणार आहे. विभागीय नियंत्रक कंपनी ओचसेनहॉसन (जर्मनी) येथील लीभेर-हॉलगरेट गे एम बे ह असेल.
लीभेर समूहाविषयीकंपन्यांचा हा विकेंद्रित समूह विविध विभागांद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या व स्वायत्त व्यवसाय युनिटमध्ये विभागला आहे. समूहाची उत्पादने अकरा विभागांद्वारे उत्पादित केली जातातअर्थमूव्हिंग इक्विपमेंट, खाणकाम, मोबाइल क्रेन्स, टॉवर क्रेन्स, काँक्रिट तंत्रज्ञान, मरिटाइम क्रेन्स, एअरोस्पेस व वाहतूक व्यवस्था, मशीन टूल्स व ऑटोमेशन सिस्टीम्स, डोमेस्टिक अप्लायन्सेस, कम्पोनंट्स व हॉटेल्स. समूहाची सेंट्रल होल्डिंग कंपनी लीभेर-इंटरनॅशनल एजी असून, तिचे भागधारक केवळ लीभेरपरिवारातील सदस्य आहेत. लीभेर-इंटरनॅशनल एजी स्वित्झर्लंडमधील बुल्ले येथे आहे.
लीभेर डोमेस्टिक अप्लायन्सेसविषयीइंजिनीअर हान्स लीभेरयांनी 1954 साली ओचसेनहॉसन (जर्मनी) येथे डोमेस्टिक अप्लायन्स विभागाची स्थापना केली. 60 वर्षांहून अधिक काळ, लिभेरने देशांतर्गत व व्यावसायिक क्षेत्रांसाठी नावीन्यपूर्ण रेफ्रिजरेशन अप्लायन्सेसची प्रीमिअम उत्पादक म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. आता दरवर्षी उत्पादन प्रकल्पात 2.2 दशलक्षहून अधिक अप्लायन्सेस तयार होतात.

संपर्क
गायत्री सेठी | + 91 9769306266 | gayatri.sethi@adfactorspr.com
प्रदीप्त रॉय | +91 7030941365 | pradipta.roy@liebherr.com


Warm Regards,

Santosh Sawardekar
Senior Executive-Media Relations - Travel, Hospitality & Lifestyle

cid:image001.jpg@01D2F19C.A7F4B4B0

M: +91 9987062959
T:
 +91 22 67574444   Ext : 405
E: 
santosh.sawardekar@adfactorspr.com

PR Awards South Asia PR Consultancy, 2017
The Holmes Report Global Corporate PR Agency, 2016
The Holmes Report India Consultancy, 2016 & 2014
PRWeek South Asia Consultancy, 2016 & 2015
ICCO Global Awards Independent Consultancy – APAC, 2016
IPRCCA-E4M PR Consultancy, 2016 & 2015
Fulcrum Awards Large Consultancy, 2016
Campaign India South Asia Agency, 2016 & 2014
The Holmes Report Global Financial Consultancy, 2015
The Holmes Report Asia-Pac Financial Consultancy, 2015 & 2013
cid:image002.jpg@01D2F19C.A7F4B4B0cid:image003.jpg@01D2F19C.A7F4B4B0cid:image004.jpg@01D2F19C.A7F4B4B0


Disclaimer: The information in this email is confidential and is intended solely for the addressee(s). Access to this email by anyone else is unauthorized. If you are not an intended recipient, you must not read, use or disseminate the information contained in this email.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy