आनुवांशिक चाचणी व लक्षित (टार्गेटेड) थेरेपी औषधांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगापासून पीडित रुग्णांच्या वाचण्याचे प्रमाण वाढू शकते


आनुवांशिक चाचणी व लक्षित (टार्गेटेड) थेरेपी औषधांमुळे
फुफ्फुसाच्या कर्करोगापासून पीडित रुग्णांच्या वाचण्याचे प्रमाण वाढू शकते
सर्रासपणे धूम्रपान करण्यासोबतच सक्रिय व निष्क्रिय धूम्रपानामुळे भारतात फुफ्फसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आनुवांशिक चाचणी आणि लक्षित थेरेपी औषधांसह उपचारामुळे कर्करोगाने पीडित रुग्णांच्या वाचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढू शकते, असे डॉक्टरांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सांगितले.
आघाडीची जेनोमिक्स-संचालित संशोधन व निदान कंपनी मेडजीनोममधील ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. विद्या एच. वेल्डोरे म्हणाल्या, “आनुवांशिक म्युटेशन्समुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासह इतर कर्करोग होतात. आनुवांशिक चाचणीच्या माध्यमातून कर्करोग होण्यास कारणीभूत ठरलेले आनुवांशिक म्युटेशन टिश्यू बायोप्सीतून लक्षात आले की डॉक्टर्स अधिक प्रभावी व उत्तम औषधोपचार करू शकतात. ही औषधे कर्करोग पेशींचे मूळापासून नाश करतात. ज्यामुळे रुग्णाची स्थिती सुधारते आणि केमोथेरपीचे साइड-इफेक्ट्स होत नाहीत. फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित रुग्णांसोबतच इतर कर्करोगाने पीडित रुग्णांमध्ये देखील आनुवांशिक चाचणीच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.’’
तंबाखूच्या व्यसनामुळे लोकांच्या आरोग्याला असलेल्या धोक्याबाबत बोलताना नाशिक येथील अॅपेक्स वेलनेस ऋषिकेश हॉस्पिटलचे वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शैलेश बोंडार्डे म्हणाले, “जगभरात दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱया 6 दशलक्ष मृत्यूंपैकी भारतात एक दशलक्ष मृत्यू होतात. तसेच तंबाखू सेवनाच्या बाबतीत भारत दुसऱया क्रमांकाचा देश आहे. भारतात प्रत्येकी तीनपैकी एक व्यक्ती कोणत्यानाकोणत्या स्वरुपात तंबाखूचे सेवन करते. याचा लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तंबाखू व तंबाखूजन्य धुरामध्ये आढळण्यात येणारी 60 हून अधिक रसायने कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतात. कर्करोगामुळे होणाऱया पुरुषांच्या मृत्यूंच्या प्रमाणामध्ये तंबाखूजन्य कर्करोगामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण 42 टक्के आहे, तर महिलांसाठी हे प्रमाण 18.3 टक्के आहे. तंबाखूच्या सेवनामुळे होणारे दोन सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे तोंडाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग. तंबाखू सेवन करणाऱया व्यक्तीवरच त्याचा परिणाम होतो असे नाही. त्यामुळे एकूण हेल्थकेअर खर्चामध्ये वाढ होते आणि उत्पादकता कमी होते.’’
फुफ्फुसाचे कर्करोग दोन प्रकाराचे आहेत. नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (एनएससीएलसी), फुफ्फुसाच्या सर्व कर्करोगांच्या प्रकरणात 80 टक्के हा कर्करोग आढळून येतो. हा कर्करोग धूम्रपान करणारे व धूम्रपान न करणारे अशा दोन्ही व्यक्तींमध्ये आढळून येतो. स्मॉल सेल लंग कॅन्सर (एससीएलसी), फुफ्फसाच्या सर्व  कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये या प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण 20 टक्के आहे. हा कर्करोग प्रामुख्याने धूम्रपान करणाऱया व्यक्तींमध्ये आढळून येतो. ईजीएफआर जनुकामधील कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या म्युटेशन्समुळे 25 ते 40 टक्के एनएससीएलसीच्या केसेस आढळून येतात. आनुवांशिक चाचणीच्या माध्यमातून म्युटेशनचे निदान झाल्यानंतर डॉक्टर्स या म्युटेशन्ससाठी योग्य औषधोपचार करू शकतात. यामुळे अप्रभावी उपचार व आजार अधिक गंभीर होण्यास प्रतिबंध होतो. एनसीसीएन, ईएसएमओ व एएससीओ सारख्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकतत्त्वांनी निदानाच्या वेळी सर्व एनएससीएलसी रुग्णांमध्ये ईजीएफआर जनुक म्युटेशन चाचणी अनिवार्य केली आहे. यामुळे प्रभावी उपचार नियोजन व व्यवस्थापन करण्यामध्ये मदत होते.
डॉ. शैलेश बोंडार्डे म्हणाले, “फुफ्फुसाच्या कर्करोगावर पूर्वी वापरण्यात आलेल्या उपचारपद्धतीच्या तुलनेत आता अधिक वैयक्तिक पद्धतीने उपचार केला जात आहे. आता आम्ही रुग्णाच्या शरीरातील पेशीरचना आणि त्याच्या आनुवांशिक इतिहासावरून फुफ्फसाच्या कर्करोगावर उपचार करतो. या उपचारामध्ये केमोथेरपीपासून ते गोळ्यांपर्यंतचा समावेश असतो. तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी तंबाखूजन्य कर्करोगासाठी नियमितपणे स्वतची तपासणी केली पाहिजे. फुफ्फुसाचा कर्करोग प्रगत टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत या आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. या प्रगत टप्प्यावर उपचार करणे खूपच अवघड बनते. सतत खोकला येणे, छातीत दुखणे व श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे इतर फुफ्फुसाच्या आजारांमध्ये देखील दिसून येतात. याच कारणामुळे छातीचा एक्स-रे व स्पटम सायटोलॉजी सारख्या स्वस्त स्क्रिनिंग टूल्सचा वापर करत या आजाराचे सहजपणे निदान होऊ शकत असले तरी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होण्यास उशीर होतो.’’
आनुवांशिक चाचणीने कर्करोगाचे उपचार व व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. डॉ. विद्या एच. वेल्डोरे म्हणाल्या, “टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या 100 हून अधिक रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले की लक्षित थेरेपी आधारित औषधांनी ईजीएफआर नॉन म्युटेड रुग्णांच्या तुलनेत ईजीएफआर म्युटेड रुग्णांमध्ये वाचण्याचे प्रमाण 13 महिन्यांवरून 19 महिन्यांपर्यंत सुधारले. यामधून लक्ष्य थेरेपीचे फायदे दिसून येतात.’’
गेल्या एका दशकामध्ये एनएससीएलसी प्रकाराच्या फुफ्फुसाचा कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेली लक्ष्य आण्विक थेरेपी झपाट्याने प्रगत झाली आहे. घातक परिणामापासून शरीरातील आरोग्यादायी उढतींचे संरक्षण करण्यासोबतच कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी लक्षित थेरेपीचा वापर करणे आता शक्य झाले आहे. आनुवांशिक चाचणीच्या माध्यमातून रुग्णामधील कर्करोगाची आण्विक रचना समजल्यानंतर अशा प्रकाराची लक्ष्य थेरेपी करता येऊ शकते. अशा प्रकाराचे उपचार सुरू ठेवण्यासाठी कर्करोगाच्या गाठीची पुन्हा आनुवांशिक चाचणी करणे आवश्यक असते आणि ही चाचणी लिक्विड बायोप्सीनावाच्या नॉन-इन्वेसिव्ह रक्तचाचण्यांच्या माध्यमातून करता येऊ शकते. लिक्विड बायोप्सी ही रुग्णांसाठी उत्तम पर्यायी चाचणी आहे. कारण भरीव गाठीमधून नमुना मिळणे खूपच आव्हानात्मक असते. फुफ्फुसाच्या कर्करोगामधील रक्तचाचणी किंवा लिक्विड बायोप्सीचे महत्त्व उपचाराच्या प्रतिसादाचे मूल्यांकन व वारंवार होणाऱया वेदनांच्या लवकर निदानासाठी फुफ्फुसाच्या कर्करोगापासून पीडित जगभरातील व्यापक रुग्णांवरील वैद्यकीय अभ्यासातून दिसून आले आहे. मेडजीनोम ही भारताच्या आघाडीच्या कर्करोग हॉस्पिटल्ससोबतच्या व्यापक वैद्यकीय प्रमाणीकरणाच्या पूर्ततेनंतर 2017 च्या सुरुवातीला लिक्विड बायोप्सी चाचण्या सादर करण्यामध्ये अग्रणी कंपनी राहिली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता