एच-एनर्जीने देशातील पहिल्या एफएसआरयुवर आधारित एलएनजी टर्मिनलचे जेएसडब्ल्यू जयगड बंदरात केले उद्घाटन


एच-एनर्जीने देशातील पहिल्या एफएसआरयुवर आधारित 
एलएनजी टर्मिनलचे जेएसडब्ल्यू जयगड बंदरात केले उद्घाटन
एच-एनर्जी गेटवे प्रायवेट लिमिटेडने (हिरानंदानी समुहाची ऊर्जा कंपनी) देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रि-गॅसिफिकेशन युनिट (एफएसआरयु) आधारित एलएनजी टर्मिनलचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जेएसडब्ल्यू जयगड बंदरात उद्घाटन केले. जयगड बंदराची मालकी व कार्यान्वयन जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरकडे (12 अब्ज अमेरिकन डॉलर उलाढाल असलेल्या जेएसडब्ल्यू समुहाची मेरिटाइम इन्फ्रास्ट्रक्चर उपकंपनी) आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या एलएनजी टर्मिनलचे उद्घाटन केले. 

वार्षिक 4 एमएमटीपीए क्षमता असलेले एच-एनर्जीचे एलएनजी टर्मिनल जागतिक दर्जाच्या इंजिनीअरिंग व सेफ्टी स्टँडर्डचा अवलंब करून बनविण्यात आले आहे. 2018 च्या चौथ्या तिमाहीत याचे व्यावसायिक कार्यान्वयन सुरू होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या वेसलमध्ये एलएनजी लोड करण्यासाठी ते सक्षम होऊ शकेल.
देशातील पहिल्या एफएसआरयुवर आधारित एलएनजी टर्मिनलमुळे बंदरावर आधारित उद्योगांना विकासाच्या नवीन संधी मिळणार आहेत व देशातील सामाजिक पायाभूत सुविधा वाढणार आहेत. स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरातील नैसर्गिक वायूची गरज एलएनजी टर्मिनल भागविणार आहे. परिवहन व घरगुती वापरासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देत असल्याने एच-एनर्जीच्या एलएनजी टर्मिनलमुळे महाराष्ट्रालाही खूप फायदा होणार आहे.
एलएनजी टर्मिनल स्टोरेज, रि-गॅसिफिकेशन, रि-लोडिंग, फ्युएल बंकरिंग आणि ट्रक लोडिंग सुविधा देशातील उद्योगांची ऊर्जेची वाढती गरज भागविणार आहे. कार्यान्वित झाल्यावर रि-गॅसिफाइड एलएनजी दाभोलच्या नॅशनल गॅस ग्रीडला जोडलेल्या 60 किलोमीटरच्या टाय-इन पाइपलाइनद्वारे ग्राहकांना पुरविला जाईल.
हिरानंदानी समुहाचे अध्यक्ष श्री निरंजन हिरानंदानी यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले आणि याविषयी बोलताना ते म्हणाले, देशातील पहिले एफएसआरयु आधारित टर्मिनल उभे करणे ही आमच्या कंपनीसाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही आनंदी आहोत की आमचा पहिला एलएनजी टर्मिनल वेळापत्रकानुसार पूर्ण होते आहे. याच वेगाने आम्ही आमच्या इतर प्रकल्पांवर देखील काम करत राहू. देशातील लोकांचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची आमची कटीबद्धता आम्हाला इथे पुन्हा व्यक्त करायची आहे.
या प्रसंगी बोलताना एच-एनर्जीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्जिक्युटिव्ह ऑफिसर श्री दर्शन हिरानंदानी म्हणालेआमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याने आम्ही आनंदी आहोत. देशातील पहिला एफएसआरयु प्रकल्प आणि जेटी पायाभूत सुविधा हे एलएनजी टर्मिनल प्रोजेक्टच्या दिशेने उचललेले मैलाचे दगड आहेत. एफएसआरयू आधारित दृष्टिकोनामुळे अशाप्रकारचे रि-गॅसिफिकेशन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार आहेत व यामुळे या क्षेत्रात मोठे बदल होतील. देशात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या स्वच्छ इंधनाचा अर्थात नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारी कंपनी म्हणून पुढे येण्यास एच-एनर्जीला मदत होणार आहे. महाराष्ट्र सरकार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, जल वाहतूक मंत्रालय आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी आभार व्यक्त करतो. हे यश मिळविण्यासाठी केलेल्या मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार व्यक्त करतो.
उद्घाटन प्रसंगी बोलताना जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ कॅप्टन बीव्हीजेके शर्मा म्हणाले, जेएसडब्ल्यूची एच-एनर्जीसोबतची भागिदारी आणि देशातील पहिले एफएसआययू आधारित एलएनजी टर्मिनलचे उद्घाटन देशातील सर्वोत्तम मेरिटाइम पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी असलेली आमची कटीबद्धता व्यक्त करते. येत्या काळात जयगड बंदर 80 एमटीपीए क्षमतेचे कार्गो हाताळण्याची मोठी झेप घेणार आहे आणि नव्या पिढीच्या वेसल उदा. सर्वात मोठे ड्राय बल्क कॅरियर (वेल मॅक्स), एलएनजी कॅरियर (क्यू मॅक्स) सर्वात मोठे कंटेनर वेसल (ईईई सीरिज) आणि खूप मोठे क्रूड कॅरियर थेट उतरविण्याचे (Direct berthing) ध्येय बाळगून आहे. यामुळे महाराष्ट्रात स्थानिक बंदरावर आधारित उद्योगांचा विकास शक्य होणार आहे.



Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24