या मातृदिनी #TasteOfMothersLove शेअर करा

या मातृदिनी #TasteOfMothersLove शेअर करा

  • अनाथा़श्रमात राहणार्‍या मुलांना मातेच्या प्रेमाची अनुभुती देण्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मदर्स रेसिपीची ऑनलाईन मोहिम
  • मोहिमेच्या माध्यमातून अनाथाश्रमात राहणार्‍या मुलांच्या शिक्षणासह संपूर्ण कल्याणासाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न होणार

मातृ दिनाच्या माध्यमातून कधीही मातेचे प्रेम अनुभवता न आलेल्या मुलांना मातेचे प्रेम नावाची एक अतिशय सुंदर भावना बहाल करण्याची संधी उपलब्ध होत असते. ही भावना म्हणजेच कोणत्याही मुलाकडून मागणी केली जात असणारी अनमोल भेटवस्तू असते. परंतु भारत देशातील सुमारे 2 कोटी मुले मातेच्या प्रेमापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे यावर्षीच्या मातृदिनानिमित्त एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड असणार्‍या मदर्स रेसिपीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. #TasteOfMothersLove नावाने सुरु केलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना आणि प्रामुख्याने मातांना त्यांचे प्रेम अनाथ बालकांशी शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  सर्वात मौल्यवान भावना असणार्‍या मातृप्रेमाची भावना अधिकाधिक अनाथ मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने #TasteOfMothersLove ही संकल्पना मदर्स रेसिपी आणि ट्रिटॉन कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.
ही मोहिम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ती #TasteOfMothersLove या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसवर प्रमोट केली जात आहे. या मोहिमेबाबत सोशल मिडियावरील प्रत्येक कॉमेंट, शेअर, ट्वीट/रिट्वीटसाठी मदर्स रेसिपीकडून अनाथा़श्रमातील मुलांच्या कल्याणासाठी विशिष्ट रकमेची तरतूद करण्यात येईल. इतकेच नव्हे तर यावर्षी 31 मे पर्यंत या ब्रँडकडून त्यांच्या ऑनलाईन विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातील ठराविक टक्के रक्कम मुलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. ऑनलाईन मोहिमेतून जमा होणार्‍या रकमेचा उपयोग अनाथाश्रमातील मुलांना अधिक चांगले वातावरण उपलब्ध करुन देणे, संतुलित पौष्टिक आहार, चांगले कपडे, निवारा तसेच शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केला जाणार आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना देसाई ब्रदर्स लिमिटेडच्या चिफ स्ट्रॅटीजी ऑफीसर संजना देसाई यांनी सांगितले की, “मदर्स रेसिपी या ब्रँडने आपली अशी ओळख निर्माण केली आहे की तो त्यांच्या खाद्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमुळे आईच्या जादुई स्पर्शाच्या समकक्ष समजला जाऊ लागला आहे. सुमारे दोन दशकांपासून मदर्स रेसिपीने विश्वासार्ह आणि जादुई चवीचे खाद्य मुलांसाठी बनवण्याची परंपरा सुरु केली आहे. आईच्या स्पर्शासमान असणारी ती भावना मातेच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या मुलांपर्यंतही पोहोचावी असे आम्हाला वाटते. त्यामुळेच मातृ दिनाच्या निमित्ताने मातेचे प्रेम ज्या अनाथ मुलांसाठी सर्वाधिक गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही राबवत असलेल्या ऑनलाईन मोहिमेला सर्व पातळीवरुन आणि सर्व वयोगटातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग मिळत आहे. आमच्यासाठी या मोहिमेच्या माध्यमातून किती लाईक्स मिळतात यापेक्षा प्रत्यक्षात किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे महत्वाचे आहे. अधिकाधिक लोकांनी पुढे येउन आमच्या या समाजहितवादी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.”

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.