गो एयरचा मान्सून सेल, प्रवास दर रु. 1299 पासून सुरू

गो एयरचा मान्सून सेल, प्रवास दर रु. 1299 पासून सुरू

·        सर्व  वर्गांमध्ये रु. 1299 पासून सर्वसमावेशक प्रवास दर 
·        बुकिंग कालावधी - 5 जून ते 7 जून 2018
·        प्रवास कालावधी - 24 जून ते 30 सप्टेंबर 2018
·        मर्यादित सीट्स, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दरावर ऑफर्स उपलब्ध

 गो एयर ने मर्यादित कालावधीसाठी आपल्या नेटवर्क वर फ्लाइटने प्रवास करणाऱ्यांसाठी अद्भूत मान्सून सेलची घोषणा करीत आहे. या ऑफर अंतर्गत यात्रेची किंमत रु.1299 पासून (कर आणि शुल्कांचा समावेश करत) सुरू होईल. प्रवाश्यांना 24 जून ते 30 सप्टेंबर 2018 कालावधीत गोएयर मार्फत कार्यान्वीत होणाऱ्या 23 सेक्टर्समधून बुकिंग करता येईल. त्यामुळे बुकिंग कालावधीची सुरुवात 5 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून ती 7 जून 2018च्या मध्यरात्रीपर्यंत असेल.   
गो एयरच्या नेटवर्कवर सर्व नॉन स्टॉप आणि व्हाया फ्लाइट्सवर प्रवासासाठी बुकिंग वैध असेल. या ऑफरच्या अंतर्गत बुकिंग केलेली तिकिटे परतावा नसलेली आहेत (रद्द केल्यावर कर आणि फी परत मिळतील). ऑफरच्या अंतर्गत ही मर्यादित इनवेंटरी आहे आणि सीट्स प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर असतील. सामुहिक बुकिंग्जवर सेलमधले प्रवासदर लागू होणार नाहीत. प्रवासदर मार्ग, फ्लाइट, दिवसातील वेळ, आठवड्यातला दिवस, फ्लाइट शेड्युल यावर अवलंबून असून सेक्टर टू सेक्टर विभिन्न असतील आणि वेळा नियामक मंजूरी आणि बदलांच्या आधीन आहेत. 
गोएयरने ही सर्वात कमी प्रवासदराची ऑफर ग्राहकांसाठी सुरु केल्यामुळे ते या आकर्षक प्रवासदरांचा त्यांच्या सहलींचे नियोजन करण्यासाठी उपयोग करु शकतील. गोएयर आपल्या ग्राहकांना सोईस्कर आणि परवडणाऱ्या फ्लाइंग अनुभवासोबत नेहमीच लवचिक विकल्प उपलब्ध करुन देत असते.
तिकिटांचे बुकिंग www.goair.in, ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्स, गोएयर कॉल सेंटर, एयरपोर्ट तिकिट ऑफिसेस, ट्रॅव्हल एजंट्स आणि गोएयर ऍपवरुन करता येईल. गोएयर ऍप दोन्ही ऍपल आयओएस आणि गूगल ऍंड्रॉइडवर उपलब्ध आहे.  

´गोएयर´विषयी...
2005 च्या नोव्हेंबर महिन्यांत स्थापन झालेली गोएयर ही वाडिया समूहाची हवाई वाहतूक कंपनी आहे. सध्या या कंपनीची हवाई वाहतूक सेवा 23 ठिकाणी सुरू असून 1544 हून अधिक साप्ताहिक विमाने तसेच2 हजारांहून अधिक साप्ताहिक कनेक्शन्स कार्यरत आहेत.प्रवाश्यांच्या सुरक्षेमध्ये उत्कृष्ट दर्जा राखण्यासाठी ही कंपनी एअरबस ए 320 आणि ए 320 नियो या प्रकारची विमाने आपल्या सेवेत वापरते.
ग्राहक खर्च करीत असलेल्या किंमतीचा मान ठेवून त्याच तोडीची उत्कृष्ट सेवा तसेचखिशाला परवडणारी प्रवासभाडी ग्राहकांना पुरवणे यासाठी गोएयर ही कंपनी कटीबद्ध आहे. द स्मार्ट पिपल्स एअरलाईन’ ही गोएयरची वर्षानुवर्षांची ओळख जपून ठेवण्यासाठी सुरक्षित व उत्तम दर्जाची वाहतूक सेवा पुरवण्याचा ही कंपनी नेहमीच प्रयत्न करते. इकॉनॉमी व बिझनेस श्रेणीतील सर्व प्रवाशांचा प्रवासानुभव सुखद व्हावा यासाठी ´गोएयर´ कंपनी आपल्या ´फ्लाय स्मार्ट´ या थीमनुसार सर्वोत्कृष्ट सेवा पुरवण्यात अव्वल आहे. गोएयर या कंपनीची हवाई वाहतूक सेवा अहमदाबादबागडोग्राबेंगळुरुभुवनेश्वरचंडीगडचेन्नईदिल्ली,गोवागुवाहाटीजयपूरजम्मूकोचीकोलकातालेहलखनऊमुंबईनागपूरपटणापोर्ट ब्लेअरपुणेरांचीश्रीनगर आणि हैदराबाद अशा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24