भारताच्या प्लास्टिक निर्यातीत आर्थिक वर्ष 18 मध्ये 17.1%, म्हणजे 8.85 अब्ज डॉलरपर्यंत वाढ


प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या मते 
भारताच्या प्लास्टिक निर्यातीत आर्थिक वर्ष 18 मध्ये 17.1%, म्हणजे 8.85 अब्ज डॉलरपर्यंत वाढ
·                                          
प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या (PLEXCONCIL) मते, भारताच्या प्लास्टिकच्या निर्यातीत आर्थिक वर्ष 17-18 मध्ये 17.1%, 8.85 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या एकंदर मर्चंडाइज निर्यातीपेक्षा हा वेग अधिक असून, आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये हे प्रमाण 7.56 अब्ज डॉलर होते. 2017-18 मध्ये भारतातून होणाऱ्या मर्चंडाइज निर्यातीचे प्रमाण 303.3 अब्ज डॉलर होते, तर 2016-17 मधील 275.9 अब्ज डॉलरच्या तुलनेत त्यात 9.9% वाढ झाली.
 PLEXCONCILच्या मते, 2017-18 मध्ये भारताच्या एकंदर मर्चंडाइज निर्यातीमध्ये प्लास्टिकचे प्रमाण 2.92% होते. 2016-17 मधील 2.74% योगदानाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. प्लास्टिक कच्च्या मालाची अधिक शिपमेंट, तसेच युरोपीयन युनियन, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबिअन व ईशान्य आशिया यांना पाठवलेल्या वोव्हन सॅक्स/एफआयबीसी, प्लास्टिक शीट्स/फिल्म्स/प्लेट्स, ऑप्टिकल आयटम्स, लॅमिनेट्स, पॅकेजिंग आयटम्स व मेडिकल डिस्पोजेबल्स अशा मूल्यवर्धित उत्पादनांमुळे वर्षभरात भारताच्या प्लास्टिक निर्यातीला प्रामुख्याने चालना मिळाली. वर्षभरात भारताने अमेरिकेला 1.11 अब्ज डॉलर मूल्याची प्लास्टिक उत्पादने निर्यात केली.
 PLEXCONCILचे अध्यक्ष ए. के. बसक यांनी सांगितले, “2017-18 मध्ये भारताच्या प्लास्टिक उत्पादनांसाठी अमेरिका, चीन व संयुक्त अरब अमिराती ही तीन आघाडीची ठिकाणे होती. मूल्याच्या बाबतीत, भारताच्या प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीमध्ये या तीन देशांचा हिस्सा 25.7% होता. PLEXCONCILने अमेरिकेला 1 अब्ज डॉलरची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते व आर्थिक वर्ष 18 मध्ये ते पूर्ण करण्यात आले. PLEXCONCILने 2018-19 मध्ये 10.6 अब्ज डॉलर इतक्या मूल्याची निर्यात करण्याचे व 2025 पर्यंत जागतिक प्लास्टिक निर्यात क्षेत्रातील (850 अब्ज डॉलर उलाढाल) भारताचा हिस्सा सध्याच्या 1.0% वरून 3.0% पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे”.
 बसक यांनी सांगितले, “लक्ष्य कठीण आहे, पण ते साध्य करण्यासारखे आहे आणि सदस्यांच्या मदतीने या दिशेने ठोस प्रयत्न करण्यावर भर देण्याचे कौन्सिलचे उद्दिष्ट आहे. या दृष्टीने, भारतातून मूल्यवर्धित प्लास्टिक उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा, संशोधन व विकास यावरील खर्चात वाढ, मार्केटिंगचे नावीन्यपूर्ण धोरण यांचा अवलंब करण्यात आला. निर्यातीविषयी जागृती करून नव्या व्यवसायांचा समावेश निर्यातीमध्ये करण्याचाही कौन्सिलचा प्रयत्न आहे.”
 क्षमता, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ या बाबतीत देशाच्या प्लास्टिक उद्योगात प्रचंड क्षमता आहे. जगातील आघाडीच्या पाच पॉलिमर ग्राहकांमध्ये सध्या भारताचा समावेश होतो व देशभर 30,000 हून अधिक प्लास्टिक प्रक्रिया युनिट असून त्यामध्ये अंदाजे चार दशलक्ष (40 लाख) मनुष्यबळ आहे. प्लास्टिक हा देशातील झपाट्याने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक असून त्याने सरासरी दोन-आकडी वाढ नोंदवली आहे. भारतातील प्लास्टिक उद्योग देशाच्या आर्थिक विकासात व देशातील ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, आरोग्यसेवा व एफएमसीजी या क्षेत्राच्या वाढीमध्ये मोठे योगदान देत आहे.
 प्लास्टिक प्रक्रिया उद्योगाची परदेशी गुंतवणूक आकृष्ट करण्याची व त्यामुळे उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. प्लास्टिकच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारतर्फे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशात 18 प्लास्टिक पार्क उभारले जाणार आहेत. प्लास्टिक पार्क उभारल्याने स्पर्धात्मकता व गुंतवणूक यामध्ये आणखी वाढ होण्याची, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत वाढ होण्याची व रोजगारनिर्मितीबरोबरच प्लास्टिक क्षेत्रातील क्षमता एकत्र करण्यासाठी क्लस्टर विकासाचे धोरण अवलंबले जाण्याची अपेक्षा आहे. जागतिक सरासरीच्या तुलनेत दरडोई वापर कमी असल्याने, कामगारांसाठीचा खर्च कमी असल्याने आणि कुशल मनुष्यबळ व प्रशिक्षण केंद्रांची उपलब्धता असल्याने भारतीय प्लास्टिक उद्योगात प्रचंड क्षमता आहे.

PLEXCONCIL विषयी
केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रमोट केलेले प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL या नावाने लोकप्रिय) भारतीय प्लास्टिक उद्योगातील निर्यात समुदायाचे प्रतिनिधीत्व करते. 1955 या वर्षी PLEXCONCILची निर्मिती झाली व त्या वर्षापासून निर्यातीत वाढ करण्यासाठीचे धोरण विकसित केले जात असून त्याचे चांगले परिणाम निर्यातीतील वाढीच्या माध्यमातून दिसून आले आहेत.  

या यशामधून PLEXCONCILच्या अंदाजे 2500 सदस्यांचे समर्पित प्रयत्न दिसून येतात. हे सदस्य, तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्कृष्टता, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधिलकी व उपजत व्यावसायिक कौशल्ये या आधारे जागतिक बाजारात स्वतःचे वेगळेपण निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहेत. PLEXCONCIL आपल्या सदस्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि भारतीय प्लास्टिक उद्योगात योग्य भागीदार मिळवण्यासाठी परदेशी ग्राहकांना सेवा देण्यासाठी बांधील आहे.

निर्यातीच्या बाबतीत उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, निर्यातीला चालना देण्यासाठी PLEXCONCILने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर्समध्ये सहभाग; संबंधित बाजारांत जाण्यासाठी शिष्टमंडळाला स्पॉन्सर करणे; परदेशी शिष्टमंडळाला भारतात आमंत्रित करणे; भारतात व परदेशात ग्राहक-विक्रेते यांच्या बैठका आयोजित करणे आणि आपल्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे, यांचा समावेश आहे.

भारतातील प्लास्टिक उद्योगातील उत्पादनांची निर्यात 150 हून अधिक देशांना केली जात असून, प्रमुख ट्रेडिंग पार्टनर युरोपीयन युनियन, अमेरिका, चीन, यूएई, सौदी अरेबिया, तुर्कस्तान, नायजेरिया, इंडोनेशिया, इजिप्त.

अधिक माहितीसाठी पाहा: http://www.plexconcil.co.in/

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.