व्हॅरॉक इंजिनीअरिंग लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला जून 26, 2018 रोजी सुरुवात


व्हॅरॉक इंजिनीअरिंग लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला जून 26, 2018 रोजी सुरुवात 
[
व्हॅरॉक इंजिनीअरिंग लिमिटेडने (“कंपनी”) प्रमोटर व इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स (पुढे स्पष्ट केल्याप्रमाणे) यांच्यामार्फत ऑफर फॉर सेलद्वारे 20,221,730 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीच्या ऑफरला जून 26, 2018 पासून सुरुवात करायचे जाहीर केले आहे (“ऑफर”). ऑफरमध्ये पुढील ऑफर फॉर सेलचा समावेश आहे (i) तरंग जैन यांच्यामार्फत 1,752,560 पर्यंत इक्विटी शेअर्स (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”), (ii) ओमेगा टीसी होल्डिंग्स प्रा. लि.द्वारे 16,917,130 पर्यंत इक्विटी शेअर्स (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स 1”) आणि (iii) टाटा कॅपिटल फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे 1,552,040 पर्यंत इक्विटी शेअर्स (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स 2”). ऑफरमध्ये 100,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवले जातील (“एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन”) आणि त्यांना ऑफर प्राइसवर प्रति शेअर 48 रुपये डिस्काउंट दिले जाईल (“एम्प्लॉयी डिस्काउंट”). ऑफरमधून एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन वजा केल्यावरनेट ऑफर उरेल आणि नेट ऑफर एकूण 20,121,730 इक्विटी शेअर्सपर्यंत आहे. कंपनीच्या ऑफरनंतरच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलामध्ये ऑफर व नेट ऑफर यांचे प्रमाण अनुक्रमे 15% 14.93% असेल.

बिड/ऑफर जून 28, 2018 रोजी बंद होणार आहे. जीसीबीआरएलएम व बीआरएलएम यांच्या सल्ल्याने कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर सुरू होण्याच्या तारखेच्या एक वर्किंग दिवस अगोदर असेल.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 965 रुपये ते 967 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 15 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 15 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व क्रेडिटट स्युइस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरसाठी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स अँड बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“जीसीबीआरएलएम”) आहेत. आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर (“बीआरएलएम”) आहे.
सुधारणा केल्यानुसार, बदल केलेल्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, 2009 च्या रेग्युलेशन 41 नुसार संदर्भ असलेल्या, ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b) नुसार, (“एससीआरआर”), (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) व सेबी आयसीडीआरच्या रेग्युलेशन 26(1) रेग्युलेशनच्या अनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेनुसार राबवली जाणार असून त्यामध्ये नेट ऑफरपैकी 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी कॅटेगरी”) राखून ठेवले जातील, तसेच जीसीबीआरएलएम व बीआरएलए यांच्या सल्ल्याने कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स क्यूआयबीपैकी 60% पर्यंत भाग कदाचित अँकर इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवतील (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी किमान एक-तृतियांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखले जातील. तसेच, क्यूआयबी श्रेणीच्या 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील (अँकर इन्व्हेस्टर वगळता). क्यूआयबी श्रेणीतील उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात क्यूआयबींना त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल.
तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, नेट ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 35% शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व बिडरना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होता येईल व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24