झिम लॅबोरेटरीज लिमिटेड 8 जून 2018 रोजी बीएसई मेन बोर्डवर होणार सूचीबद्ध

झिम लॅबोरेटरीज लिमिटेड 8 जून 2018 रोजी बीएसई मेन बोर्डवर होणार सूचीबद्ध 
·        झिम ही जागतिक स्तरावरील काही कंपनींपैकी एक असून ती व्यावसायिक स्वरुपात ओरल फिल्म टेक्नोलॉजीची निर्मिती करते
·        सिंगल थिन स्ट्रीपवर एकहून अधिक एपीआय असलेल्या मल्टी-लेयर थीन फिल्म्सच्या निर्मितीतील पहिली भारतीय कंपनी आहे
·        कंपनी 8 जून 2018 रोजी बीएसई मेन बोर्डवर लिस्ट होईल 
·        झिम ची बुक वॅल्यू प्राईज प्रती इक्विटी शेअर रु. 160/- राहील.


झिम लॅबोरेटरीज लिमिटेड (ZIM) – ही अभिनव संशोधन आणि विकासकेंद्री औषधनिर्मिती कंपनी आहे, जी प्रोपरायटरी नॉवेल ड्रग डिलिव्हरी सोल्युशन्स (एनडीएस) आधारित लक्ष्य असणारी गुंतागुंतीचे जेनेरिक उत्पादन निर्मिती आणि पुरवठा करते.
झिम लॅब्ज 1994 मध्ये ओटीसी एक्सचेंज ऑफ इंडियामध्ये सूचीबद्ध झाली होती. सेबीची मार्गदर्शक तत्व पाळून कंपनी बीएसईवर सूचीबद्ध होईल आणि व्यापारानुसार किंमतीचा शोध घेण्यात येईल.
टेक्नोक्रेट डॉ. अनवर दाउद द्वारा प्रचारित ही कंपनी अभिनव संशोधन आणि विकासकेंद्री व्यापार मॉडेलद्वारे, ज्यामध्ये  बळकट आयपी बेस – 26 शोधांसोबत  53 पेटंट फायलिंगआणि 45 देशांमध्ये 174 ग्राहक आहेत, जे ग्राहकांना उत्पादन विकास, सह-विकास, आऊट लायन्सिंग, निर्मिती, पुरवठा आणि विपणन साह्य देते.

झिम ओरल थिन फिल्म्सविषयी:
·        झिम ओरल थिन फिल्म (ओटीएफतंत्रज्ञानाला थिनओरल® पेटंटेड असून जगात ओरल फिल्म्ससाठी सुमारे 19 अप्लाईड प्रोडक्ट/ प्रोसेस पेटंट आहेत.
·        तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या डीसइंटिग्रेटींग गोळ्यांप्रमाणे त्या लिओफिलीसेशन किंवा लो कंप्रेशन प्रेशर वापरून तयार केल्या जातात, थिनओरल® स्ट्रिप लवचिक असतात आणि त्यांची साठवणूक व वाहतूक करणे सुलभ असते.
·        थिनओरल® तंत्रज्ञान हे औषधे सबलिंग्युअल आणि बुक्कल अबसॉप्शन रुट्सने घेता येतात, यात फर्स्ट पास मेटलीझम टाळून बायोअवबिलीटी सुधारित केलेली दिसते.
·        झिम ने 19 उत्पादनांची निर्मिती केली असून त्यापैकी 13 चे 3 वर्षांत व्यवसायीकीकरण केले विकसित तंत्रज्ञान हे देशी डिझाइन (उत्पादन आणि चाचणी) तसेच सूत्रीकरण विकासामुळे तोंडावाटेच्या फिल्मचे उच्च उत्पादन व्यावसायिक उत्पादन करण्यास सक्षम आहे.
·        झिम ला 24 डीसीजीआय उत्पादन संमत्या मिळाल्या आहेत आणि भारतात 14 तर परदेशात 13 उत्पादने मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
·        झिम नामांकित ब्रँड जसे की, मॅनकाइंड, आरपीजी, सन फार्मा, डेलविन, कोरोना, इंडियाबुल्स फार्मास्युटिकल्स युएसव्ही आणि अशा इतररांसोबत आपल्या उत्पादनांचे विपणन करते.

·        ओटीएफशिवाय, झिम लॅब्जकडे प्री फॉर्म्युलेशन इंटरमिजीअरी आणि फिनिश्ड फॉर्म्युलेशनच्या उत्पादन श्रेणीची वर्गवारी आहे.
झिम लॅबोरेटरीज लिमिटेडविषयी:
झिमची स्थापना 1989मध्ये झाली असून एक फार्मा इनोव्हेटर म्हणून त्याने आपला महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे. फार्मास्युटीकल टेक्नोलॉजी आणि व्यापारच्या क्षेत्रातील नवीन पैलूंचा सातत्याने शोध घेत, झिम ने स्वत:ला न्यू ड्रग डिलिव्हरी सिस्टिम्सच्या क्षेत्रात पसंतीचा हेल्थकेअर सोल्युशन प्रोव्हायडर म्हणून स्थापन केले आहे.
भारताच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराच्या औद्योगिक पट्ट्यात कंपनीचे मुख्यालय आहे, झिम ही इयु-जीएमपी आणि हू-जीएमपी प्रमाणित व  ISO 9001:2008अधिस्वीकृत कंपनी व्यावसायिक टीमने सज्ज आहे. ती विविध मार्केट सेगमेंटच्या मोठ्या गरजा देखील भागवते. आम्ही तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, कॅपस्युल, पॅलेट, मल्टी-पार्टीक्यूलेट सिस्टिम्स, ड्राय सिरप, डायरेक्टली कंप्रेसीबल ग्रॅन्यूअल, टेस्ट मास्क्ड पावडर, ग्रॅन्यूअल्स आणि तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या डीसइंटेग्रेटींग स्ट्रिप्सचे संशोधन आणि विकास, निर्मिती, पुरवठा आणि वितरण करतो.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता