फायनान्शियल हॉस्पिटल’तर्फे उद्योजकांना मिळतो यशाचा कानमंत्र


फायनान्शियल हॉस्पिटलतर्फे उद्योजकांना मिळतो यशाचा कानमंत्र
एका दशकाहून अधिक अनुभव असलेली आणि मुंबईतील मुख्यालयासह संपूर्ण भारतात सात कार्यालये असलेली फायनान्शियल हॉस्पिटलही आघाडीची सल्ला कंपनी असून ती ग्राहकांना आर्थिक नियोजन, कर नियोजन आणि इतर आर्थिक घटकांमध्ये ऑनलाईन सल्ला देते. मिहिका इन्श्युरन्स अँड फायनान्शियल कन्सल्टन्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची ही कंपनी गुंतवणूक सेवा, म्युच्युअल फंड्स, विमा, बॉंडस आदींमध्येही ऑनलाइन गुंतवणूक सेवा प्रदान करते. फायनान्शियल हॉस्पिटलची स्थापना व्यवसायाने चार्टर्ड अकाऊन्टन्ट असलेल्या श्री मनीष हिंगर यांनी २००४ मध्ये केली होती.
एका दशकाच्या अनुभवातून फायनान्शियल हॉस्पिटलने आर्थिक आणि करांच्या बाबतीतील गोष्टींकडे लोक कशा पद्धतीने पाहतात याची अचूक नाडी पकडण्याची कला आत्मसात केली आहे. कंपनी देत असलेली ग्राहककेन्द्री उत्पादने आणि सेवा यांच्या माध्यमातूनच तिने हे यश प्राप्त केले आहे.
ग्राहक प्राधान्यया आपल्या तत्वामुळेच ग्राहक नेहमीच कंपनीबरोबर राहिले असून ही दूरदृष्टी कंपनीच्या सर्वच स्तरांवर रुजली आहे. त्याचमुळे त्यांच्या आर्थिक संपत्तीसारख्या अगदी संवेदनशील गोष्टींबाबतही ग्राहक कंपनीवर विश्वास ठेवतात.
कंपनीचे ध्येय हे भारतामध्ये संपत्ती आणि कर या क्षेत्रांमध्ये सल्लासेवेसाठी बाजारपेठ निर्माण करणे हे आहे. लोकांना बिनदिक्कत त्यांच्या शंका आणि प्रश्न विचारता येतील आणि कंपनीसुद्धा संपूर्ण कौशल्य व पारदर्शकतेने सेवा पुरवू शकेल, हे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. संपत्ती आणि सल्ला क्षेत्रात मोठी संधी असल्याचे ध्यानात घेवून पुढील गोष्टी यश मिळविण्यास मदत करतील असे कंपनीचे मानणे आहे
·         ग्राहकाला निष्पक्ष सल्ला देणे
·         ग्राहकाचे आर्थिक उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची तयारी ध्यानात घेणे
·         ग्राहकाच्या ध्येयाप्रती असलेली त्याची भावनिक जवळीक समजून घेणे
·         ग्राहकाच्या जीवनभराच्या कमाईशी थेट संबंध असल्याने त्याबाबत जबाबदारीने सल्ला देणे
अपयशाचा स्वीकार करत, त्यापासून शिकत पुढे जाणे आणि त्यातून प्रगती करणे, या तत्वांवर कंपनी विश्वास ठेवते. अगदी अचूक असा कॅशफ्लो सांभाळत समाधानी आणि संतुष्ट ग्राहक आणि  कर्मचारी मिळविणे व त्याद्वारे मार्गक्रमण करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट राहिले आहे.
वितरण आणि सल्ला क्षेत्रामध्ये आणि आर्टीफीशियल इंटेलीजन्स (एआय) तसेच मशीन लर्निंग या गोष्टी नक्कीच अमुलाग्र बदल घडवून आणतील, असे तिचे मानणे आहे. अंतर्गत माहिती आणि तंत्रज्ञान चमूच्या माध्यमातून कंपनीने संपत्ती व सल्ला क्षेत्रातील बदलांचा माग घेत ते आत्मसात करण्याचे धोरण आखले आहे. त्यांच्याकडे असलेल्या तंत्रकुशल मॉडेलच्या माध्यमातून कंपनी भविष्यातील कठीण आव्हानांनाही यशस्वीपणे सामोरी जाण्याची तयारी ठेऊन आहे.
ग्राहक प्राधान्यहे कंपनीचे ध्येय कंपनीमध्ये सर्वच स्तरांवर रुजले आहे आणि त्याचमुळे त्याचे ग्राहकही आर्थिक संपत्तीसारख्या अगदी संवेदनशील बाबतीत त्यांच्यावर विश्वास ठेवतात.


Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता