निवृत्त पोलीस आयुक्त, श्री आर. डी. त्यागी यांचे नवीन पुस्तक “सक्सेस अनलिमिटेड’


निवृत्त पोलीस आयुक्त, श्री आर. डी. त्यागी यांचे नवी पुस्तक
“सक्सेस अनलिमिटेड’
भारतीय पोलीस सेवेतील,निवृत्त पोलीस आयुक्त श्री आर. डी. त्यागी लिखित अंतर्मनाची ताकद यावर आधारीत नवीन पुस्तक –‘सक्सेस अनलिमिटेडचे अनावरण. यशाच्या मूलभूत तत्त्वाचे विश्लेषण या पुस्तकात असून जर त्या तत्त्वांचे पालन कोणी केले तर कोणीही यशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचू शकेल. हे पुस्तक तुम्हाला उच्च ध्येय आणि मोठा विचार करण्यासाठी प्रवृत्त करेल ज्यामुळे तुम्हाला अमर्याद यश लाभू शकेल. जे कोणी आपल्या उत्कर्षासाठी झटतात त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे गुरुकिल्ली आहे.'

हे पुस्तक आत्मिक शक्ती आणि विचार, जाणिवा यांच्या शुध्दतेवर भर देते. भरभराट आणि त्याचे परिमाण याचा सर्वंकष विचार या पुस्तकात स्पष्ट केला आहे. आपल्या उत्कर्षाला जर आत्मिक भान, विचारांची शुद्धता आणि मूल्यांचे पाठबळ नसलेले यश अल्पकाळ टिकते. श्री त्यागी यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. या आपल्या पुस्तकाबाबत बोलताना ते म्हणाले, यशाकडे नेणाऱ्या विविध तत्त्वांचा मी अनुभव घेतला असून देशाच्या तरुणाईपर्यंत हे अनुभव पोहोचविण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. याच कारणाने माझे विचार शब्दबद्ध करण्यास मी उद्युक्त झालो.” श्री त्यागींनी असेही सांगितले की,  डॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांमुळे मला ही यशतत्त्वे लिहिण्यास प्रेरणा मिळाली. डॉ. डी. वाय. पाटील स्वायत्त विद्यापीठाचे संस्थापक आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी या पुस्तकाचे आयोजन केले आहे.    
श्री. मोहन भागवत, चीफ,  आरएसएस यांनी असे नमूद केले की, या पुस्तकाची भाषा अतिशय साधी आणि सोपी असून त्यांच्या कथन शैलीमुळे यशस्वी आयुष्यातील मैलाचे दगड ठरणाऱ्या महत्त्वाच्या तत्त्वांकडे लक्ष जाते. आर. डी. त्यागी या व्यक्तीचा उदोउदो यात नसून हे पुस्तक नुसतेच यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवत नाही तर अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे देखील सांगते.
आपल्या निवृत्तीनंतर श्री. त्यागी यांनी आध्यात्म आणि ध्यानधारणेचा अभ्यास केला असून, ‘हॅपीनेस अनलिमिटेड ,योग- दैवी आनंदाचा मार्ग इतर. अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रस्तुत पुस्तक हे सुद्धा त्यांचे व्यक्तिगत अनुभव आणि आध्यात्म यावर आधारित आहे.
लेखकाविषयी
श्री. आर. डी. त्यागी यांनी फिजिक्स या विषयातील पदव्युत्तर शिक्षणनंतर ओएनएफसीशी संलग्न झाले. 1962ध्ये त्यांनी कमिशन्ड ऑफीसर म्हणून भारतीय लष्करी सेवेत प्रवेश घेतला आणि 1964-65च्या भारत पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. त्याबद्दल त्यांना रक्षा पदक आणि युद्ध सेवा चक्राने सन्मानित करण्यात आले. भारतीय लष्करात त्यांनी साडे पाच वर्षे काम केल्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत 32 वर्षे कार्यरत होते. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे तर ते राष्ट्रीय सुरक्षा दलाचे, दिल्ली  (ब्लॅक कॅट कमांडोज) डायरेक्टर जनरल होते. महाराष्ट्र केडरमधील ते अतिशय यशस्वी पोलीस अधिकारी होते.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.