नारायण हेल्थ-एसआरसीसी रुग्णालयामध्ये बालरुग्णांसाठी विशेष रक्तपेढीचे उद्घाटन


नारायण हेल्थ-एसआरसीसी रुग्णालयामध्ये 
बालरुग्णांसाठी विशेष रक्तपेढीचे उद्घाटन

नारायण हेल्थ-एसआरसीसी रुग्णालयामध्ये बालरुग्णांसाठी विशेष रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. यात सध्या 400 लिटर रक्त साठविण्याची सुविधा उपलब्ध असून नजीकच्या काळात त्यात 900 लिटरपर्यंत रक्त साठविता येईल. या रुग्णालयातील रक्तपेढीची जागा दोन हजार चौरस फूट असून ती मुंबईतील इतर रुग्णालयातील रक्तपेढ्यांहून मोठी आहे. मुलांमधील रक्तसंक्रमणावेळी निर्माण होणारी संभाव्य गुंतागुंत रोखण्यासाठी येथे गामा किरण इरॅडिएशन तंत्र उपलब्ध आहे.
बॉम्बे ब्लड बँक फेडरेशनचे अध्यक्ष व जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी डॉ. झरीन भरुचा यांनी या उद्घाटनाच्या वेळी बोलताना सांगितले की, अशाप्रकारच्या सुंदर कल्पनेसाठी मी व्यवस्थापनाचे अभिनंदन करतो कारण कोणत्याही व्यक्तीसाठी रक्तपेढी ही जीवनदायी आहे तसेच नियमित रक्तदान करणा-या रक्तदात्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे तिचे महत्व विशेष आहे.
रुग्णालयाच्या संचालिका डॉ. पूर्णा कुरकुरे यादेखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी ही रक्तपेढी मुंबईतील लहान मुलांना अर्पण करत असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम