टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर प्रोग्रॅमची सुरुवात

एक वर्षाच्या भागीदारीचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन खाते आणि एअरबीएनबीतर्फे
टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर प्रोग्रॅमची सुरुवात

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे जगातील अग्रणी कम्युनिटी ड्रिव्हन (स्थानिकांच्या सहभागावर आधारित) हॉस्पिटॅलिटी कंपनी असलेल्या एअरबीएनबी या कंपनीशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यात येत आहे. राज्यातील पर्यटनाच्या संधींना चालना देण्यासाठी एअरबीनबीच्या सहकार्याने टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर प्रोग्रॅम सुरू करण्याचे एमटीडीसीचे उद्दिष्ट आहे.


या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्थानिकांना आर्थिक चालना देण्याचा प्रयत्न आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सूक्ष्म उद्योजकांना मदत करून प्रशिक्षण, सक्षमीकरण, उपलब्धता आणि प्रचार या चार स्तंभांच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायात वृद्धी घडवून आणणे हे या कायर्क्रमाचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमातील मुख्य घटक खालीलप्रमाणे:

          प्रशिक्षण: एअरबीनबीतर्फे सर्वंकष प्रशिक्षण साधनसंच तयार करण्यात येईल. दर्जेदार पर्यटन स्थळे, घरे आणि उद्योजकांना शोधण्यासाठी एमटीडीसीतर्फे या साधनसंचाचा वापर करण्यात येईल. त्याचप्रमाणे निवडक उद्योजकांना तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी, वित्तव्यवस्था, नियमन आणि प्रचार या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी एअरबीएनबीतर्फे याचा वापर करण्यात येईल.

          सक्षमीकरण: यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही वाटा राज्यात पर्यटनाच्या विकासासाठी एअरबीएनबीतर्फे महाराष्ट्र पर्यटन खात्याला देण्यात येईल. या निधीचा या कार्यक्रमाचा पाया रचण्यासाठी वापर करतानाचा महाराष्ट्र पर्यटन खात्यातर्फे प्रशिक्षित उद्योजकांना अतिरिक्त निधीसाठी सध्याच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये जोडून घेण्यात येईल.

          उपलब्धता: एअरबीएनबी आणि महाराष्ट्र पर्यटन खात्यातर्फे निवड उद्योजकांना स्थानिक भागीदारांसोबत जोडून घेण्यात यईल आणि त्यांना तंत्रज्ञान उपलब्ध करून दण्यात येईल, भाषेच्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत केली जाईल आणि मार्गदर्शन करण्यात येईल.
एअरबीएनबीच्या को-होस्टिंग मॉडेलमध्ये ग्रामीण युवक किंवा स्थानिक संस्थांना स्मार्ट फोन आणि भाषाकौशल्याच्या मदतीने दर्जेदार घरांसह सूक्ष्म उद्योजकांसोबत भागीदारी करण्यास मदत करण्याची क्षमता आहे.

          प्रचार: एकदा हे उद्योजक पर्यटकांना निवासी व्यवस्था उपलब्ध करून देण्यास सज्ज झाले की, एअरबीएनबी कंटेन्ट क्रिएटर्ससोबत भागीदारी करून जगभरातील पर्यटकांमध्ये या उद्योजकांचा प्रचार करतील. या उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन खातेसुद्धा आपल्या व्यासपीठांचा उपयोग करेल.

हा कार्यक्रम सर्वप्रथम एलिफंटा गावात सुरू होईल. या ठिकाणी एमटीडीसी आणि एअरबीएनबी ग्रामपंचायतींशी सहयोग करून ३५ घरांची निवड करेल आणि त्यांच्यात एअरबीनबींच्या मानकांनुसार बदल करेल. या घरांचे यजमान हे या कार्यक्रमाचे पहिले लाभार्थी उद्योजक असतील.

या प्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री. जयकुमार रावल म्हणाले, "पर्यटन हा राज्यासाठी उत्पन्नाच स्रोत आहेच, त्याचप्रमाणे स्थानिकांच्या विकासासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. एअरबीनबीच्या रुपाने आम्हाला एक जागतिक पातळीवरील भागीदार मिळाला आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन संधींचे विस्तारीकरण करण्यासाठी हॉस्पिटॅलिटी आणि होमस्टे क्षेत्रात सूक्ष्म उद्योजक तयार करण्याचे त्यांचे व्हिजन आहे. टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेशन प्रोग्रॅमच्या निमित्ताने एअरबीएनबीसोबत असलेली आमची भागीदारी विस्तारताना आम्हाला आनंद होत आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उदयोन्मुख उद्योजकांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी मदत होईल आणि महत्त्वाच्या ठिकाणी एक सक्षम होमस्टे नेटवर्क तयार होईल. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे, ज्यात शासनाने त्यांच्या भागीदाराने देऊ केलेल्या उत्पन्नाच्या वाट्याचा उपयोग  राज्यातील वंचित समाजाच्या लाभासाठी केला आहे. एअरबीएनबीच्या सहकार्याने अशा प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जगभरातील पर्यटकाना आकर्षित करण्याचे आणि महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये प्रचंड वाढ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याचे प्रधान सचिव श्री. व्ही. के. गौतम म्हणाले, "अॅक्सिलरेटर टुरिझम कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन खाते व एअरबीएनबीचे एलिफंटा गावात होमस्टे इकोसिस्टिम आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांतील प्रत्येक गावात किमान एक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य आहे. पहिल्या वर्षी १५०० पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योजक घडविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि पर्यटकांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव उपलब्ध देता येईल."

"एअरबीएनबीने नेहमीच जगभरात अधिकाधिक समाविष्ट करणारे पर्यटन क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि भारतासारखी उदयोन्मुख बाजारपेठही त्याला अपवाद नाही. सर्व स्थानिकांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करणे. ज्यांना यापूर्वी पर्यटन क्षेत्राचा लाभ झालेला नाही त्यांना समाविष्ट करून घेणे हे सर्वसमावेशक पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर प्रोग्रॅमबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत आणि या माध्यमातून वंचित समाजस्तरातील उदयोन्मुख हॉस्पिटॅलिटी सूक्ष्म उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी एअरबीएनबीचे सीईओ आणि सहसंस्थापक ब्रायन चेस्की यांनी सन्माननीय पंतप्रधानांची भेट घेतली आणि भारतात ५०,००० हॉस्पिटॅलिटी सूक्ष्म उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अॅक्सिलरेटर प्रोग्रॅमची सुरुवात हा आमच्या आश्वासनाच्या पूर्ततेचे द्योतक आहे आणि भारतात पुरोगामी, शाश्वत पर्यटन यंत्रणा तयार करण्यासाठी महाराष्ट्र हा आमचा आघाडीचा भागीदार आहे.", असे एअरबीएनबीच्या पॉलिसी व कम्युनिकेशन्स विभागाचे जागतिक पातळीवरील प्रमुख क्रिस लेहेन म्हणाले.

"एअरबीएनबी आणि महाराष्ट्र पर्यटना खात्याने गेल्या वर्षी आम्ही या संदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. या माध्यमातून आम्ही महत्त्वाच्या पर्यटन जिल्ह्यांमध्ये शेकडो सूक्ष्म उद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी एकत्रित काम केले.", असे एअरबीएनबी इंडियाचे कंट्री हेड श्री. अमरप्रीत बजाज म्हणाले. "टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर प्रोग्रॅमच्या माध्यमातून या भागीदारीचे विस्तारीकरण करताना आम्ही रोमांचित झालो आहोत आणि महाराष्ट्रात सृदृढ, शाश्वत पर्यटनाला मदत करण्याता आम्ही यापुढेही महत्त्वाची भूमिका पार पाडत राहू."

एमटीडीसीबद्दल:
पर्यटन हे राज्यातील वेगाने प्रगती करणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास करणे या उद्दिष्टाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) स्थापन करण्यात आले. स्थापनेपासूनच पर्यटन स्थळांचा विकास आणि देखभाल यात एमटीडीसी आघाडीवर राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विविध ठिकाणी या महामंडळातर्फे रिसॉर्ट चालविण्यात येतात. पर्यटकांना सहकार्य करण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी माहिती केंद्रे सुरू केली आहेत. या माहिती केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, तेथे जाण्यासाठी उपयुक्त ठरणारे नकाशे, महाराष्ट्र पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका आणि पर्यटन पुस्तके वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. येथे स्वच्छ सागरकिनारे, अभयारण्ये, थंड हवेची ठिकाणे, नैसर्गिक गुंफा, धबधबे, भव्य किल्ले, विविधरंगी महोत्सव, प्राचीन तीर्थस्थळे, वस्तुसंग्रहालये आणि ऐतिहासिक स्थळे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी भेट द्या: http://www.maharashtratourism.gov.in/

एअरबीएनबीबद्दल:
एअरबीएनबीची स्थापन २००८ साली करण्यात आली. या पर्यटन समुदायातर्फे संपूर्ण सफर उपलब्ध करून देण्यात येते. यात पर्यटकांच्या निवासव्यवस्थेपासून ते तुम्ही कुणाला भेटणार हेही ठरवून देण्यात येते. तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन जगभरातील लाखो लोकांना आपल्या जागा, पॅशन आणि गुणवत्तेतून उत्पन्न मिळविण्यास एअरबीएनबीतर्फे मदत करण्यात येते. एअरबीनबीच्या निवासी व्यवस्थांतर्फे लाखो पर्यटकांना १९१ हून अधिक देशांमध्ये निवासी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. यात अपार्टमेंटपासून ते व्हिला, कॅसल, ट्रीहाऊस आणि बीअँडबीपर्यंत विविध प्रकारची घरे समाविष्ट आहेत. अनुभवाच्या आधारे लोक स्थानिकांतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणाच्या वेगवेगळ्या बाजू पाहू शकतात. त्याचप्रमाणे रेसीशी भागीदारी केल्यामुळे निवडक देशांमधील सर्वोत्तम स्थानिक रेस्टॉरंट उपलब्ध होतात. हे सर्व एका वापरण्यास सुलभ अशा वेबसाईट आणि अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24