उबर इंडियाने विराट कोहलीच्या समावेशासह लाँच/अनावरण केले नवीन ब्रॅण्ड पोझिशनिंग/चे

उबर इंडियाने विराट कोहलीच्या समावेशासह लाँच/अनावरण केले नवीन ब्रॅण्ड पोझिशनिंग/चे
  • भारतातील नवीन ब्रॅण्ड पोझिशन- ‘बढते चलेचे आवाहन करणारे एकात्मिक मार्केटिंग अभियान
·         ११ जून रोजी हे अभियान टीव्हीडिजिटल माध्यमेमुद्रित माध्यमेप्रत्यक्ष प्रसार आणि रेडिओच्या माध्यमातून सुरू होणार
उबर या जगभरातील शहरी वाहतुकीची व्याख्या नव्याने करणाऱ्या राइडशेअरिंग अॅपने आज त्यांचे नवीन ब्रॅण्ड पोझिशनिंग सर्वांसमोर आणले असूनविराट कोहलीला ब्रॅण्ड अॅम्बॅसडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ‘बढते चले’ ही आधाररेखा ब्रॅण्डच्या नवीन पोझिशनिंगभोवती गुंफण्यात आली असून उबरला सांस्कृतिकदृष्ट्या प्रगतीशील अशी चळवळ घडवून आणण्याची क्षमता असलेला ब्रॅण्ड म्हणून घडवण्याचा उद्देश यामागे आहे


 उबर इंडियाचे मार्केटिंग प्रमुख संजय गुप्ता म्हणालेउबर दर आठवड्याला भारतातील लक्षावधी लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवतेयाचा अर्थप्रत्येक ट्रिप हा केवळ भौतिक प्रवास नसतोत्यांच्या आयुष्यातील मोठ्या प्रवासादरम्यान टाकलेले ते एक पाऊल असतेही केवळ ब्रॅण्डची कल्पना नव्हेतर हे भारतभर दररोज प्रत्यक्षात हे घडत आहेही ब्रॅण्ड पोझिशन मूलतमानवी आहेकारणलक्षावधी लोक दर आठवड्याला आमच्यासोबत प्रवास करतात आणि त्यांच्या उद्दिष्टांचाही पाठलाग करतातया संवादाची रचना सर्वांना आपल्याशी निगडित वाटेल अशा पद्धतीने प्रगतीशील विचार आणि महत्त्वाकांक्षी चेतनेकडे जाण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहेआणि वैयक्तिक प्रगतीचा भारतातील कदाचित सर्वांत प्रेरणादायी आदर्श ठरू शकेल अशा विराट कोहलीमध्ये उबरला प्रत्यक्ष खेळपट्टीवरील एक सहयोगी सापडला आहेजो आम्ही भारतभरातील लक्षावधींसोबत शेअर करत असलेल्या प्रेरक शक्तीचे प्रतीक आहेया संकल्पनेभोवती गुंफलेली एटीएलडिजिटल आणि खासगी माध्यमांतील व्यापक प्रसिद्धी आमचे पोझिशनिंग भक्कम करेल आणि ते प्रत्यक्षातही आणेल.”  
या अभियानात उबरची कहाणी भारतात सांगण्यासाठी विराट ब्रॅण्डचा आवाज म्हणून काम करणार आहेपार्श्वभूमीला विराटचे कथन असलेल्या या जाहिरातीमध्ये उबर वापरणाऱ्या चार प्रेरीत प्रवाशांची खरी उदाहरणे विविध संदर्भांत दाखवण्यात येतील आणि त्यायोगे त्यांच्या प्रवासाला नेमका हेतू कसा मिळाला हे सांगण्यात येईलया जाहिरातीमध्ये एक अंध प्रवासी,बाळाच्या प्रतिक्षेत असलेले व घाईने रुग्णालयाकडे निघालेले एक जोडपेकामासाठी प्रवास करणारी स्त्री डॉक्टर आणि मुलीला पहाटे ज्युडो क्लासला घेऊन जाणारी एक स्वतंत्र आई अशी चार उदाहरणे दाखवण्यात आली आहेत. 
याप्रसंगी उबरचा ब्रॅण्ड अँबॅसडर विराट कोहली म्हणालाउबरच्या या अभियानात सहभागी होण्याबद्दल आणि मुख्य म्हणजे कंपनीसोबत केलेल्या सहयोगाने मी रोमांचित झालेलो आहेकारणही कंपनी आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी शहरांना व त्यातील लोकांना सक्षम करण्याचे काम करत आहेकोणत्याही वेळीकुठेही आरामात प्रवास करण्यासाठी उबर प्रवाशांना देत असलेल्या सेवेचे मला कौतुक वाटतेया अभियानाचा भाग झाल्यामुळे मला सहयोगी चालकांशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधण्याची आणि कंपनीने त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात कशी मदत केली ते जाणून घेण्याची संधी मिळाली. 
या अभियानाची संकल्पना ऑगिल्व्ही आणि माथरची असूनभारतातील लाखो प्रवासी आणि चालकांसाठी उबर हा महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असलेला ब्रॅण्ड करण्याच्या प्रयत्नाचा पुनरुच्चार यात आहेस्थळ अ ते स्थळ ब अशी वाहतूक करण्याच्या पलीकडे काहीतरी करणारा ब्रॅण्ड म्हणून उबरचे स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न असूनभारतातील हजारो सहयोगी चालकांना आणि प्रवाशांना विविध संधी मिळवून देण्याची उबरची भूमिकाही यात पुन्हा एकदा मांडण्यात आली आहे. 
या मोहिमेबद्दल ऑग्लिव्हीच्या ग्रूप चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर आणि उपाध्यक्ष सोनल डबराल म्हणाल्या, "निव्वळ एखादे उत्पादन किंवा सेवा विकण्याच्याही पलिकडे जात जीवनविषयक एक तात्विक मांडणी करणारे काम नेहमीच उत्साहवर्धक वाटतेएक लक्ष्य समोर ठेवून त्या दिशेने वाटचाल करण्याचा उबरचा संदेश प्रत्यक्षात आणणे हे कामच आमच्यासाठी एक जिद्द बनली होतीया एकात्मिक मोहीमेत परस्परसंबंधी फिल्म्स आहेतयातील चार लढवय्या व्यक्तिमत्त्वांनी चार स्वतंत्र फिल्मच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील त्यांच्या चार वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेतआणि त्यांना साथ लाभली आहे विराट कोहलीचीयातून एक सकस आणि गुंतवून ठेवणारी कथा जन्माला आली आहेआम्हाला या निर्मितीत जितका आनंद मिळाला तितकाच आनंद हे काम पाहणाऱ्या प्रत्येकाला मिळेलअशी आशा आहेआणि मला नक्कीच आशा वाटते की यापुढे त्यांचा प्रत्येक प्रवासलहान असो की मोठाएक प्रेरणात्मक आशेचा किरण घेऊन येईलत्यात आमचा मूळ विचार 'बढते चलेत्यांच्यासोबत असेल."
या अभियानासाठी माध्यम धोरण निश्चित करण्यासाठी आणि ते अमलात आणण्यासाठी उबरने २०१८ मध्येही मॅडिसनशी संबंध कायम ठेवले आहेतसहा महिन्यांच्या बहुव्यासपीठ अभियानाची व्याप्ती एटीएल (टीव्हीरेडिओओओएचमुद्रित माध्यमेतसेच डिजिटल (यूट्यूबफेसबुकट्विटर आणि कंटेण्ट प्रकाशकतसेच उबरच्या मालकीच्या सीआरएम वाहिन्या व ठिकाणे यांच्यापर्यंत असेलया व्यवसायाने साध्य केलेली वाढ आणि भौगोलिक व्याप्ती बघताटीव्हीसी आणि रेडिओवरील कार्यक्रम हिंदीकन्नडमराठीतेलुगूतमीळ आणि बंगाली अशा सहा भाषांत प्रसारित केले जातील

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning