यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त भारतातील लंग्रो ग्रूपने पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता वाढवली

यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त भारतातील लंग्रो ग्रूपने पर्यावरणाप्रती आपली कटिबद्धता वाढवली 
·                     लंग्रो इंडियाचा युएनडीपीच्‍या जागतिक पर्यावरण दिन प्रदर्शनामध्‍ये ग्रूप इनिशिएटिव्‍ह म्‍हणून सहभाग
 लंग्रो ही इलेक्ट्रिकल व डिजिटल पायाभूत सुविधामधील जागतिक अग्रणी कंपनी आपल्‍या ग्रूप कंपनीजसोबतच सर्व कर्मचा-यांसोबतच्‍या सहयोगाने यंदा जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहे. या उपक्रमाचा भाग म्‍हणून लंग्रो इंडिया नवी दिल्‍लीमध्‍ये आयोजित युएनडीपीच्‍या पर्यावरण दिन प्रदर्शनामध्‍ये सहभाग घेत आहे. या प्रदर्शनामध्‍ये कंपनी वीजेचा कमी वापर आणि पर्यावरणावर कमी परिणाम करणारे ऊर्जा कार्यक्षम उत्‍पादन सोल्‍यूशन्‍स सादर करणार आहे. हा उपक्रम अधिक पुढे नेत, लंग्रो आपल्‍या उत्‍पादन केंद्रे व कार्यालयांमध्‍ये स्‍थानिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. तसेच कंपनी त्‍यांच्‍या कर्मचा-यांसाठी शैक्षणिक कार्यशाळा व व्‍याखान्‍यांचे आयोजन करत आहे. लंग्रोच्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍तच्‍या उपक्रमांमध्‍ये सर्व ग्रूप कंपन्‍यांमध्‍ये कर्मचारी-केंद्रित मोहिमेचा समावेश आहे. या मोहिमेच्या माध्‍यमातून उत्‍तम पर्यावरणाप्रती त्‍यांचे विचार, सूचना व उपक्रमांना समोर आणले जाणार आहे. कंपनीच कार्यालये व उत्‍पादन केंद्रे उत्‍तम पर्यावरणाच्‍या दिशेने पाऊल म्‍हणून एका तासासाठी एअर-कंडिशनिंग मशिनचा वापर न करण्‍याची योजना आखत आहेत.
लंग्रो ग्रूपचा जागतिक पर्यावरण दिनामधील सहभाग हा कंपनीच्‍या अत्‍यंत सूक्ष्‍म पातळीवर पर्यावरणीय समस्‍या कमी करण्‍याच्‍या जागतिक मोहिमेचा भाग आहे. या जबाबदारीचा ग्रूपचे केंद्रे व उत्‍पादन जीचनचक्रावर परिणाम झाला आहे. ज्‍यामुळे ते अगदी विचारपूर्वक उत्‍पादने डिझाइन करत आहेत. ग्रूपच्‍या कंपन्‍यांनी कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासोबतच पर्यावरणास अनुकूल उत्‍पादने डिझाइन करण्‍यासाठी हाती घेतलेल्‍या उपक्रमांना सादर करण्‍याकरिता जागतिक पर्यावरण दिन ही ग्रूपसाठी एक संधी आहे.
''इलेक्ट्रिकल व डिजिटल पायाभूत सुविधांमधील जागतिक अग्रणी कंपनी म्‍हणून आम्‍ही आदर्श ठेवण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी असलो पाहिजे आणि त्‍यासाठी ग्रूप कटिबद्ध राहिला पाहिजे. लंग्रो इंडिया कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासोबतच पर्यावरणाला उत्‍तम स्‍थळ बनवण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न करते,'' असे लंग्रो इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. जीन चार्ल्‍स थॉर्ड म्‍हणाले.ते पुढे म्‍हणाले, ''आम्‍हाला सांगताना अभिमान वाटत आहे की लंग्रो इंडियाच्‍या दोन उत्‍पादन केंद्रांना पर्यावरणाप्रती उच्‍च कटिबद्धता दाखवण्‍यासाठी सलग दोन वर्षांसाठी ग्रीनटेक फाऊंडेशनकडून ग्रीन अवॉर्ड मिळाला आहे.''
लंग्रो ग्रूपच्‍या उद्देशांसोबतच लंग्रो इंडिया पर्यावरणासाठी सक्रियपणे कार्य करत असलेली काही इतर ध्‍येये :
·         वर्षानुवर्षे उत्‍पादनाच्‍या अवशिष्‍टामध्‍ये १० टक्‍क्‍यांनी घट
·         आपल्‍या केंद्रांना सौरऊर्जा कार्यक्षम बनवणे. कंपनीने आपल्‍या दोन उत्‍पादन केंद्रांमध्‍ये हा प्रकल्‍प यशस्‍वीरित्‍या पूर्ण केला आहे.
·         प्रॉडक्‍ट एन्‍व्‍हायरोंमेन्‍टल प्रोफाइल (पीईपी) असलेल्‍या उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून ६८ टक्‍के विक्रीचे ध्‍येय गाठण्‍याचा प्रयत्‍न करणे. याचा अर्थ असा की भारतातील लंग्रोच्‍या उत्‍पादन केंद्रामधून विक्री करण्‍यात येणारी उत्‍पादने ही डिझाइनिंग, वापर व पुनर्चक्रणच्‍या बाबतीत कडक नियमांचा पालन करून उत्‍पादित करण्‍यात आली आहेत. ज्‍यामुळे पर्यावरणावर त्‍यांचा कमी परिणाम होईल.
·         आरओएचएस नियमांचे कडक पालन. यामुळे कंपनी इलेक्ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची खरेदी व उत्‍पादनामध्‍ये घातक घटकांचा वापर कमी प्रमाणात करेल याची  खात्रीहोते.
यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त लंग्रो इंडिया पर्यावरणाबाबत आणि आपण सर्व कार्बनचे प्रमाण कमी करण्‍यासोबतच पर्यावरणावरील कार्बनचा परिणाम कमी करण्‍यासाठी काय करू शकतो याबाबत जागरुकता निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.
लंग्रो ग्रूप बाबत :
लंग्रो ही इलेक्ट्रिकल व डिजिटल पायाबूत सुविधांची उभारण्यात जागतिक कीर्तीची तज्ज्ञ कंपनी आहे. निवासी असो किंवा व्यावसायिक अथवा औद्योगिक लंग्रो प्रत्येक प्रकल्पासाठी समग्र उपाययोजना तयार करून देते. ५.५ अब्ज युरोंचा* हा समूह लिमोजेस फ्रान्स येथे स्थित असून ९० देशांत त्यांचे उत्पादन कारखाने आहेत. समूहाची उत्पादने जगभरातील १८० देशांत विकली जातात. जागतिक पातळीवर लंग्रो वायरिंग उपकरणे आणि केबल व्यवस्थापनात बाजारपेठेत आघाडीवर आहे. लंग्रो कार्यरत असलेल्या देशांमध्ये किमान एका तरी व्यवसायात आघाडीवर असून त्यात फ्रान्सइटलीरशियाब्राझिलमेक्सिको, चीन आणि भारताचा समावेश आहे.
लंग्रोची उत्पादने व सेवा सोपेपणाच्या तीन निकषांवर आधारित आहेत – वापरण्यातील सोपेपणा, बसवण्यातील सोपेपणा आणि वितरणातील सोपेपणा– ज्यामुळे कंपनीला नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे सहज शक्य होते. भारतात कंपनीचे ६००० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून कंपनी स्थानिक बाजारपेठेच्या प्रत्येक क्षेत्राशी सुसंगत उत्पादने व सेवा उपलब्ध करत आपल्या मुख्य व्यवसायात आघाडी घेत आहे.
लंग्रो ग्रूप इंडिया बाबत :
लंग्रो इंडिया उर्जा वितरणवायरिंग उपकरणे, घरगुती स्वयंचलन, आराखड्यानुसार केबलिंग, प्रकाशयोजना व्यवस्थापन, केबल व्यवस्थापन आणि औद्योगिक वापराची उत्पादने इत्यादी प्रकारची विविध उत्पादने तयार करते.
कंपनी एमसीबी, आरसीडी डीबी आणि सिंगल फेज यूपीएसमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवते आणि वायरिंग उपकरणे क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय यूपीएस तिसरा फेज,आराखड्यानुसार केबिलिंग, घरगुती स्वयंचलन आणि केबल व्यवस्थापन यंत्रणा या क्षेत्रांत कंपनीने खास स्थान मिळवले आहे.
मुंबईमध्ये मुख्यालय असलेली लीग्रँड देशभरात ५४ कार्यालये १००० स्टॉकिस्ट १४००० हून अधिक रिटेलर्स, ५० विविध उत्‍पादन केंद्रे, १० अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्रे, १३ प्रशिक्षण केंद्रे आणि एक संशोधन व विकास केंद्र यांसह कार्यरत आहे. तंत्रज्ञानातील नाविन्य दळणवळण यंत्रणा तयार करण्यासाठी उत्पादनांचे सोपे आणि वेगवान समीकरण इन्स्टॉलेशनच्या सोप्या युक्त्या इत्यादींवर लंग्रोमधील संशोधन व विकास गटाचा भर असतो. 

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy