'तुमचं विश्व समृद्ध करा' : बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या भारतातल्या कँपेनची दमदार सुरुवात

'तुमचं विश्व समृद्ध करा' : बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या भारतातल्या कँपेनची दमदार सुरुवात

'बीबीसी वर्ल्डस सर्व्हिस'ने या वीकेंडला मुंबईत एका कल्पक योजनेतून 'तुमचं विश्व समृद्ध कराया कँपेनला सुरुवात केली. 
हा एक यशस्वी उपक्रम ठरलाज्यात बॉलीवुड अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यासारखी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे सहभागी झाली.


हे कॅंपेन बीबीसी क्रिएटिव्हने प्रसिद्ध ग्राफिटी कलाकार INSAसोबत विकसित केलं. मुंबईत जुहू  इथे INSAने पर्यावरणाशी एकरूप होणाऱ्या सुंदर कलाकृतीची निर्मिती केली.
या कॅंपेनसाठी बीबीसीच्या मार्केटिंग टीमने जुहू बीचजवळ एका शंभर फूट रुंद भिंतीची निवड केली होती. त्या भिंतीवर INSAने सुंदर कलाकृती साकारली. आसपासच्या वातावरणाशी एकरूप होणारा हा कलाविष्कार विश्व समृद्ध करण्याच्या भावनेला अक्षरशः अधोरिखत करत होता. 
INSAने 100 फूट रुंदीच्या भिंतीचे बारा भाग पाडले. राखाडी रंगाचा धूर ओकणाऱ्या चिमण्यांचं त्यांनी हिरव्या झाडांमध्ये रूपांतर होताना दाखवलं. हळूहळू बदलणाऱ्या प्रतिमांच्या वापराने बारा फ्रेम्समध्ये हे रूपांतर जणू जिवंत करण्यात आलं. या अद्भुत कृतीमुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन जगांमधली सीमा धूसर बनवणारं एक Gif तयार झालं. भिंतीच्या दोन्ही बाजूंना QR कोड काढण्यात आले आहेत. हे कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर लोकांना थेट आमच्या यूट्यूब चॅनलवर जाता येतं. तिथे मंत्रमुग्ध करणारी ही कला 30 सेकांदाच्या जाहिराताच्या स्वरूपात बघता येईल.
Links to the video:
Tamil:
Telugu:

हे ब्रँड कँपेन भारतातील प्रेक्षकांसाठी आता उपलब्ध असलेल्या बीबीसीच्या स्थानिक भाषेतल्या सेवांबद्दल माहिती देण्यासाठी आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आणि बीबीसीला बातम्यांचं एकमेवाद्वितीय माध्यम म्हणून प्रस्थापित करणं ही या कँपेनची उद्दिष्ट्ये आहेत. 

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या मार्केटिंग प्रमुख लिसा सांटोरो म्हणाल्या की "हे कँपेन सुरुवातीपासूनच फार महत्त्वाकांक्षी होतं. मार्केटची इत्थंभूत माहिती घेतल्यानंतर संपूर्ण देशातील प्रेक्षकांना भावतील अशा कल्पक जाहिराती निर्माण करणं आणि एकाच वेळी 6 भाषांमधून सेवा लाँच करणं हे वाखाणण्याजोगं यश आहे. नाविन्य आणि प्रतिभेच्या जोरावर आम्ही या संयुक्त मार्केटिंग कँपेनच्या माध्यमातून वेगाने वाढणाऱ्या आणि स्पर्धात्मक मार्केटमध्ये उतरलो आहोत."

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने विद्यमान भाषा सेवांचा विस्तार करत १२ नव्या भाषा सेवा सुरू केल्या आहेत. यांत भारतातल्या मराठीगुजराती,पंजाबी आणि तेलुगू या चार भाषांचा समावेश आहे. यामुळे आता बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इंग्रजीसह 42 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या नव्या आणि जुन्या सेवांमधून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसची पत्रकारिता अखंड सुरू राहीलयाची प्रेक्षकांनाही खात्री आहेच.

या कँपेनमुळे लोक बीबीसी न्यूज वाचू आणि पाहू शकतील आणि त्यांचं विश्व समृद्ध करू शकतील. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.