टाटा पॉवरच्या ‘क्लब एनर्जी’ने २०१७-१८मध्ये वाचवली विजेची ४ दशलक्ष एकके


टाटा पॉवरच्याक्लब एनर्जीने २०१७-१८मध्ये वाचवली विजेची ४ दशलक्ष एकके, देशभरातील ३.५ दशलक्ष लोकांमध्ये निर्माण केली जागरूकता 
~ एनर्जी क्लबने आपल्या स्थापनेपासून देशभरात २.५ लाख एनर्जी चॅम्पियन्स आणि 
.९ लाख एनर्जी अँबेसिडर तयार केले~
क्लब एनर्जीही टाटा पॉवरची राष्ट्रव्यापी संसाधन आणि ऊर्जा संवर्धन चळवळ देशभरात राष्ट्रबांधणीवर धोरणात्मक भर देऊन संसाधनांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम अविरत करत आहे. हाच वेग कायम राखत, क्लब एनर्जीने मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या सहा शहरांतील ३.५ दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुमारे ४ दशलक्ष एकके वीज वाचवली आहे. गेल्या वर्षात क्लब एनर्जी हा कार्यक्रम राजस्थानातील अजमेर या नवीन शहरातही सुरू करण्यात आला.
क्लब एनर्जी आपल्या स्थापनेपासून- २००७ सालापासून, ५०० शाळांमध्ये सक्रिय असून त्यांनी भारतभरात एकूण २,०१७ एनर्जी स्कूल क्लब्ज तयार केले आहेत. क्लबने शालेय विद्यार्थ्यांमधून आतापर्यंत २,५५,७८३ एनर्जी चॅम्पियन्स आणि २,९८,४६८ एनर्जी अँबेसिडर्स तयार केले आहेत. क्लब एनर्जी कार्यक्रमाने १० वर्षेही पूर्ण केली आहेत. 


टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीर सिन्हा या यशाबद्दल म्हणाले, “क्लब एनर्जी ही चळवळ सुरू केल्याचा तसेच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देशभरात पोहोचवण्यामध्ये लक्षणीय पल्ला गाठल्याचा आम्हाला, टाटा पॉवरला, खूप आनंद आणि अभिमान वाटतो. पृथ्वीच्या रक्षणाच्या या कामात खूप मदत केल्याबद्दल आम्ही विद्यार्थी, शाळा आणि आमच्या टीमचे आभार मानतो तसेच भविष्यकाळातही आमच्या प्रयत्नांनी अनेक आयुष्ये उजळून टाकण्याचे वचनही देतो.”
या उपक्रमांचा भाग म्हणूनक्लब एनर्जीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जासंवर्धन रॅली, पथनाट्य, प्रश्नमंजूषा, पोस्टर स्पर्धा आणि लोणावळ्यातील टाटा पॉवर महसीर हॅचरीला भेट आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. संवर्धन प्रकल्पांबाबत जागरूकता वाढवण्यात या कार्यक्रमांची मोठी मदत झाली. तसेच पर्यावरणाबद्दल प्रत्यक्ष ज्ञानही यातून मिळाले. आज, ही ऊर्जा व नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी एक संपूर्ण चळवळ झाली आहे. ‘क्लब एनर्जीची मदार देशातील तरुणाईवर आहे आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यावर या चळवळीने प्रामुख्याने काम केले आहे. याचा उपयोग पर्यायाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक उष्मा तसेच हवामान बदलाच्या समस्या हाताळण्यात होणार आहे. 
आपल्या विविध उपक्रमांद्वारे लहान मुलांना भविष्यकाळाचे सक्रिय नेते म्हणून घडवून, जबाबदार नागरिक करण्याचे काम टाटा पॉवरचाक्लब एनर्जीकार्यक्रम करत राहील.

 










टाटा पॉवरविषयी:
टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीज कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार होत आहे. कंपनी, तिच्या सर्व उपकंपन्या आणि संयुक्तरित्या नियंत्रित कंपन्या अशा सर्वांची मिळून १०७५७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता आहे; तसेच ऊर्जा क्षेत्राच्या सर्व विभागांमध्ये, म्हणजेच- इंधन सुरक्षा व लॉजिस्टिक्स, निर्मिती (औष्णिक, जल, सौर व पवनऊर्जा), पारेषण, वितरण व व्यापार- यांमध्ये कंपनी काम करत आहे. भारतात वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांसाठी कंपनी यशस्वीरित्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प राबवत आहे. उत्तर दिल्लीमध्ये वीजवितरणासाठी दिल्ली विद्युत बोर्डासोबतटाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड”, भूतानमधील ताला जलविद्युत प्रकल्पातून विजेचे निर्वासन (इव्हॅक्युएशन) करून दिल्लीला आणण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबतपॉवरलिंक्स ट्रान्समिशन लिमिटेडआणि झारखंडमध्ये १०५० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबतमैथोन पॉवर लिमिटेडही या प्रकल्पांची काही उदाहरणे. टाटा पॉवर भारतातील २.६ दशलक्ष ग्राहकांना वितरणसेवा देत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित असा देशातील पहिला ४००० मेगावॉट क्षमतेचा महाऊर्जा प्रकल्प कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे विकसित केला आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठ्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जेची कंपनीची श्रेणी ३४१७ मेगावॉट इतकी आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तार केला असून, इंडोनेशियातील अग्रगण्य कोळसा कंपनी पीटी कॅल्टिम प्रायमा कोल अर्थात केपीसीमध्ये टाटा पॉवरचे ३० टक्के समभाग आहेत; सिंगापूरमधील पीटी बरामल्टिसुकेसराराना टीबीके (“बीएसएसआर”) खाण कंपनीत, ट्रस्ट एनर्जी रिसोर्सेसमार्फत कोळशाचा पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी तसेच आपल्या औष्णिक वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्यासाठी, २६ टक्के भागधारणा आहे; आफ्रिकेतील सब-सहारा भागात प्रकल्प विकसित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबतसेनेर्गीहा संयुक्त उपक्रम सुरू आहे; झांबियामध्ये १२० मेगावॉट जलविद्युत निर्मितीसाठी झेस्कोसोबत ५०:५० भागीदारीत संयुक्त उपक्रम २०१६ मध्ये कार्यान्वित झाला आहे; जॉर्जियामध्ये एजीएलमार्फत पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी संयुक्त उपक्रमातून नॉर्वे व आयएफसीमध्ये १८७ मेगावॉट जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे आणि भूतानच्या राजेशाही सरकारसोबत भागीदारीत  भूतानमध्ये जलविद्युत निर्मिती सुरू आहे. अग्रगण्य तंत्रज्ञान, प्रकल्पांचे उत्तम कार्यान्वयन, सुरक्षेसाठी जागतिक दर्जाच्या प्रक्रिया, ग्राहकांची काळजी आणि पर्यावरणपूरक उपक्रम या वैशिष्ट्यांच्या जोरावर टाटा पॉवर बहुअंगांनी वाढीसाठी सज्ज असून येणाऱ्या अनेक पिढ्यांचीआयुष्ये प्रकाशमान करण्यासाठीवचनबद्ध आहे. आम्हाला भेट द्या: www.tatapower.com
टाटा पॉवर क्लब एनर्जीविषयी:
टाटा पॉवरने आपला शाळांपर्यंत पोहोचणारा कार्यक्रमटाटा पॉवर क्लब एनर्जी२००७ मध्ये सुरू केला. २००९ मध्ये क्लब एनर्जीने आपल्या कार्यक्रमांचे रूपांतर राष्ट्रव्यापी चळवळीत करून मोठी झेप घेतली. या कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता, बेळगाव, जमशेदपूर आणि लोणावळा येथील ५००हून अधिक शाळांमध्ये विस्तारले. यापुढे जाऊन या कार्यक्रमाने १० लाखांहून अधिक नागरिकांना जागरूक करण्याचे तसेच दहा लाखांहून अधिक वीजएकके वाचवण्याचे उद्दिष्ट साध्य करत नवीन पल्ला गाठला. तिसरी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य तसेच पॉवरपॉइंट सादरीकरणांसारख्या कल्पक प्रारूपांच्या माध्यमातून ऊर्जासंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. मुलांना या सत्रांदरम्यान ऊर्जा वाचवण्याच्या तसेच संसाधन संवर्धनाच्या टिप्स दिल्या जातात. या टिप्स वापरून त्यांनी लक्षणीय प्रमाणात ऊर्जा वाचवल्याचे दिसून आले आहे. क्लब एनर्जी चळवळ १५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमाने आतापर्यंत २१ दशलक्ष एकके इतकी वीज एकत्रितपणे वाचवली आहे आणि देशातील ११ शहरांतील २५० शाळांमध्ये क्लब एनर्जी काम करत आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24