‘जीप® कंपास’तर्फे ‘बेडरॉक’ लिमिटेड एडिशन सादर

जीप® कंपासतर्फे बेडरॉक लिमिटेड एडिशन सादर
कंपनीने भारतात २५००० विक्रीचा टप्पा ओलांडला

पुण्याजवळील आपल्या रांजणगाव प्रकल्पात जीप® कंपास या भारतातील सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या एसयुव्ही )२०१७( चे उत्पादन करणाऱ्या एफसीए इंडियाने एक वर्षाहून कमी कालावधीमध्ये भारतात जीप® कंपास गाडीचा २५,००० विक्रीचा टप्पा ओलांडलाहे यश साजरे करण्यासाठी जीप® कंपासतर्फे बेडरॉक’ ही लिमिटेड एडिशन एसयुव्ही आज बाजारात सादर करण्यात आलीसपोर्ट ट्रीम प्रकाराची बेडरॉक’ .० लीटर १७३पीएस टर्बो डिझेल इंजिनसिक्स स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनx२ प्रकारातीलड्रायव्हिंग कॉन्फीगरेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.



३१ जुलै २०१७ रोजी भारतात सादर झालेली जीप® कंपास ही आज भारतीय रस्त्यांवरील सर्वात सुरक्षित एसयुव्ही म्हणून वाखाणली जात आहेया गाडीने निश्चितपणे भारतीय एसयूव्ही बाजारपेठेला अधिक आव्हानात्मक बनवले असून स्पर्धकांना कडवी टक्कर दिलेली आहेतसेच येथील ग्राहकांच्या फोर व्हीलर खरेदी करण्याच्या शैलीमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणतानाच त्यांच्या आकांक्षांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
जीप® कंपास बेडरॉकबाबत बोलताना एफसीए इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकेविन फ्लीन म्हणालेयेथील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून एक वर्षांच्या आतच आम्ही जे यश संपादन केलेते अत्यंत अभिमानास्पद आहेजीप कंपासच्या साह्याने एफसीए इंडियाने गेल्या १० वर्षातील आपली सर्वोत्तम वार्षिक विक्री साध्य करून दाखवली आहे.२५,००० गाड्यांच्या विक्रीचा जो टप्पा आम्ही साध्य केलात्याचा आनंद भारतीय ग्राहकांना जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडीशन देऊन आम्ही साजरा करत आहोत.
जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडीशनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा१६ इंची ग्लॉस अलॉय ब्लॅक व्हील्सगाडीत सुलभतेने चढता यावे यासाठी साईड स्टेपबेडरॉक ब्रँडचे सीट कव्हर्सब्लॅकरूफ रेल्सप्रीमियम दर्जाच्या फ्लोअर मॅटसबेडरॉक डिकॅल्स आणि बेडरॉक मोनोग्राम अशा खास घटक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सिक्स स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनसह ४x.० लीटर टर्बो डिझेल इंजिन असलेल्या बेडरॉक लिमिटेड एडीशनची किंमत १७.५३ लाख (एक्स-दिल्लीठेवण्यात आली असून ती व्होकल व्हाईटमिनिमल ग्रे आणि एक्झोटिका रेड अशा तीन रंगांत उपलब्ध असेल.
‘एफसीए’च्या चार जागतिक उत्पादन आणि निर्यात हबपैकी एक असलेल्या रांजणगाव प्रकल्पात जीप कंपासच्या निर्मितीचा पहिला वर्धापनदिन सोहळा १ जून रोजी एफसीए इंडियाने साजरा केलाकंपनीने याआधीच जपानऑस्ट्रेलियायुके आणि आयर्लंडसह सात ऑटोमोबाईल बाजारपेठांत ८००० हून अधिक जीप कंपास एसयुव्ही निर्यात केल्या आहेत.
फ्लीन पुढे म्हणालेजीप ब्रँडला भारतीय बाजारपेठेत लक्षणीय दाद मिळाली असून आमचा ब्रँड आणि उत्पादन यांच्यावर एवढा विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही येथील ग्राहकांचे आभारी आहोतआमच्या मोपार आश्वासनाला अनुसरून ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून देऊन हा विश्वास आणखी दृढ व्हावा यासाठी एफसीए टीम अविश्रांत झटत आहे.
सध्या भारतात एफसीए इंडियाची ६५ विक्री आणि सेवा केंद्रे असून यंदाच्या वर्षी ती वाढून ७५ वर जाणार आहेतनाविन्यपूर्ण विक्री आणि सेवा अनुभूती पुरवूनकार्यक्षम सेवा आणि गाडीची किफायतशीर मालकी यांच्या आधारे एफसीए इंडियाने ग्राहकांचे उच्च पातळीचे समाधान साध्य केलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy