एसओटीसी ट्रॅव्हलकडून देश-विदेशाच्या पर्यटनासाठी विशेष मान्सून पॅकेजेस

एसओटीसी ट्रॅव्हलकडून देश-विदेशाच्या पर्यटनासाठी विशेष मान्सून पॅकेजेस
एसओटीसी ट्रॅव्हलने पावसाळी पर्यटनाच्या मोसमात ग्राहकांसाठी किफायतशीर ठरतील अशी आपली वार्षिक मान्सून ट्रॅव्हल पॅकेजेस आणली आहेतनित्याचा ऑफसीझन असतानाहीएसओटीसी ट्रॅव्हलकडे चौकशींचा भडीमार होताना पाहायला मिळत आहेतसेच मान्सून २०१८साठीच्या पर्यटनाला देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
पैशांचा संपूर्ण मोबदला देण्याबरोबरच एक रोमहर्षक अनुभव देणारी ही भारत आणि विदेशातील पर्यटनाची ही पॅकेजेस म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीने एक आगळीवेगळी पर्वणीच आहेऑनलाईन प्लॅटफॉर्मस्(मोबाईल आणि वेबसाइट), कॉल सेंटर्स आणि विस्तारलेली आऊटलेट्स अशा एसओटीसीच्या ओम्नी-चॅनल नेटवर्कद्वारे ही पॅकेजेस उपलब्ध होतील.
या सीझन ऑफरबद्दल एसओटीसी ट्रॅव्हलचे प्रॉडक्टकॉन्ट्रॅक्टिंग अॅण्ड इनोव्हेशनचे प्रमुख श्रीअमोद थत्ते म्हणाले की`दैनंदिन कामकाजातून थोडासा आराम मिळावा आणि त्यातून नवा उत्साह यावा,यासाठी ही मान्सून पॅकेजेस आहेतआमच्या ग्राहकांना पैशांचा पुरेपूर मोबदला मिळावायासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतोत्यातूनच वेगवेगळ्या पर्यटनस्थळांसाठी अविश्वसनीय अशी पॅकेजेसएसओटीसी ट्रॅव्हलने तयार केली आहेतआपल्या कुटुंबीयांसह अशा पर्यटनांचा लाभ घेणाऱ्या भारतातील लोकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे.`
ते पुढे म्हणाले की`खर्चाच्या बाबतीत दक्ष असलेल्या ग्राहकांच्या दृष्टीने आम्ही योग्य मोबदल्यात मिळू शकेल अशा पर्यटनाची विशेष आखणी केली आहेविमान प्रवासाचा आनंद देणारी ३८,०००रुपयांपासूनची विदेशयात्रा आणि ३१,९०० रुपयांच्या देशातील पर्यटनाशी संबंधित या पॅकेजेसना वाढती पसंती मिळत आहे.`

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.