जलसंवर्धन आणि पेयजल संरक्षण प्रकल्पासाठी ब्रिजस्टोन आणि युनिसेफमध्ये सहकार्य करार

जलसंवर्धन आणि पेयजल संरक्षण प्रकल्पासाठी
ब्रिजस्टोन आणि युनिसेफमध्ये सहकार्य करार


जगातील टायर आणि रबरची सर्वात मोठी कंपनी असलेल्या ब्रिजस्टोन कॉर्पोरेशन(ब्रिजस्टोन)ने युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड अर्थात ‘युनिसेफ’बरोबर सहकार्य करार केला असून त्या माध्यमातून ‘ड्रॉप ऑफ होप’ हा जलसंवर्धन आणि पेयजल संरक्षण प्रकल्प राबविला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंवर्धन आणि स्वच्छता विभागाच्या सहभागातून हा सहकार्य करार केला गेला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. ब्रिजस्टोनने ३.९ कोटी रुपयांचे योगदान या प्रकल्पासाठी दिले असून तो पुढील तीन वर्षांमध्ये राबविला जाणार आहे.


या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि सुरक्षा अबाधित केली जाईल, यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये पाण्याच्या सध्याच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी आधारभूत सर्वेक्षण करणे आणि त्याचवेळी भविष्यकालीन स्थितीचा आढावा घेणे, या गोष्टी सध्या केल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील साधारण निम्म्या घरांमध्येच नळाचे पाणी येते आणि त्यातील केवळ ६३ टक्के पाण्यावरच प्रक्रिया केलेली असते. साधारण २०टक्के ग्रामीण घरांमधील लोक घरातील पिण्याच्या पाण्यासाठी दूरवरच्या आणि असुरक्षित अशा जलस्त्रोतांवर अवलंबून असतात. साधारण एक-षष्टांश ग्रामीण लोकसंख्या ही पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक हातपंपांवर अवलंबून असते. पाण्याचे प्रतीमाणसी प्रमाण हे व्यस्त असून ते २१ ते १२९ लिटर प्रतीमाणसी एवढे आहे. २०२० पर्यंत ते ७० लिटर प्रतीमाणसी प्रती दिन एवढे असणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर समित्या अधिक मजबूत करून संपूर्ण वर्षभरात पाण्याच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी स्थानिक पातळीवर पर्याय शोधून काढणे हे लक्ष्य समोर ठेवले गेले आहे.या प्रकल्पाचा पायाभूत उद्देश हा महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्याने आणि घनिष्ट पद्धतीने काम करणे हा असून त्यातून पायाभूत गुंतवणुकीच्या वाढीसाठी महत्वाच्या स्त्रोतांचा माग घेणे आणि त्यांचा वापर करणे, यावर भर असेल.

या भागीदारीबद्दल बोलताना ब्रिजस्टोन एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडच्या मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्य अधिकारी श्री योशीकाझु शीदा म्हणाले, “ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनने आपल्या आसपासच्या समाजातील घटकांसाठी योगदान देण्यावर नेहमीच भर दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.