भारतातील अमरावती कॅपिटल सिटीच्या विकासासाठी सेम्बकॉर्प आणि अँसेदास-सिंगब्रिज यांच्या दरम्यान करार


भारतातील  अमरावती कॅपिटल सिटीच्या विकासासाठी 
सेम्बकॉर्प  आणि  अँसेदास-सिंगब्रिज यांच्या दरम्यान करार

शाश्वत नागरी विकास साधण्यात आशियात आघाडीवर असलेल्या `अँसेदास-सिंगब्रिज आंध्र इन्व्हेस्टमेन्ट होल्डिंग्ज` आणि `सेम्बकॉर्प डेव्हलपमेन्ट इंडिया` यांच्यात सहकार्य करार होऊन सिंगापूर अमरावती इन्व्हेस्टमेन्ट होल्डिंग्ज (SAIH) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. राजधान अमरावती शहरातील स्टार्ट-अप एरियाच्या विकासासंदर्भात या कंपनीने स्टेट गव्हर्मेंट ऑफ आंध्र प्रदेश (SGOAP) सोबतच्या कराराला अंतिम स्वरुप दिले आहे. त्यानुसार SGOAPची एजन्सी असलेल्या अमरावती डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन (ADC)च्या सहकार्याने हा विकास करण्यात येणार आहे.

६८४ हेक्टरच्या स्टार्ट-अप परिसराच्या विकासासाठी अमरावती डेव्हलपमेन्ट पार्टनर्स (ADP) स्थापण्यात आली असून त्यात एसएआयएच (५८ टक्के हिस्सा) आणि एडीसी (४२ टक्के हिस्सा) यांचा सहभाग आहे. एडीपीच्या स्थापनेसाठी एसएआयएच आणि एडीसी यांच्यात समभागधारक म्हणून असलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या निश्चित करून शेअरहोल्डर्स करारावर अत्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
स्टार्ट-अप परिसर आणि उत्प्रेरक विकासाच्या दृष्टीने  विकासाचे हक्क, परवाने आणि आवश्यकत्या सवलती व अधिकृतता यांच्याशी संबंधित सवलती आणि विकास करारनाम्यावर एडीपीने एसजीओएपीने स्वाक्षरी केली. एडीपीच्या विकासकार्याला चालना देण्यासाठी काही अटी व सवलती या करारात निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही नियमांत न येणारी जवळपासच्या जमिनीचे संपादन करता येईल आणि सर्वसाधारण पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे विकसित केलेले प्लॉट्स विक्रीचे अधिकारही देण्यात आले आहेत. या विकासाच्या दृष्टीने अटी-सवलती १२ महिन्यांच्या कालावधीसाठी असतील आणि त्यांना वाढ दिली जाऊ शकते.
सिंगापूरच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयात व्यापारविषयक मिनिस्टर इन-चार्ज श्री. एस. इस्वारन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अमरावती पार्टनर्स जॉइंट इम्पिलमेन्टेशन स्टीअरिंग कमिटीच्या बैठकीत हा करार करण्यात आला.
नव्याने स्थापन झालेल्या आंध्र प्रदेशची अमरावती ही नवी राजधानी म्हणून विकसित करण्याचे नियोजन एसजीओएपीने केले आहे. आंध्र प्रदेशच्या नागरिकांच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक शहर तयार करण्याबरोबरच जागतिक गुंतवणूक आणि वुद्धिमंतांना आकर्षित करण्याचे उद्दीष्टही या विकासाचे आहे.
अमरावती शहरात कृष्णा नदीच्या किनाऱ्याजवळ २० चौरस किलोमीटर बीजविकास परिसरात स्टार्ट-अप परिसर आहे. स्टार्ट-अप परिसरा १५ ते २० वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार असून अमरावती शहरामध्ये निवास आणि गुंतवणूक आकर्षित करणारे हे पहिले केंद्र ठरेल, अशी अपेक्षा आहे.
व्यापारउद्योगाबरोबरच निवासी संकूल प्रकल्पांचा विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. आर्थिक उलाढालीला चालना देण्याच्या दृष्टीने प्रमुख विकासकांच्या सहकार्याने एसजीओएपी उद्योग आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता