पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये 24% म्हणजे, 1,035.72 कोटी रुपयांपर्यंत वाढ


पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये 
24% म्हणजे, 1,035.72 कोटी रुपयांपर्यंत वाढ


इंडसइंड बँक लि.च्या संचालक मंडळाने आज, 30 जून 2018 रोजी संपलेल्या तिमाहीतील ऑडिटपूर्व आर्थिक निकालांना मंजुरी दिली.

कामगिरीच्या ठळक वैशिष्ट्यांवर दृष्टिक्षेप:

तपशील

Q1 FY19
(कोटी रुपये)
Q1 FY18
(कोटी रुपये)
वार्षिक वाढ (%)
Q4 FY18
(कोटी रुपये)
तिमाही वाढ (%)
एकूण व्यवसाय
(ठेवी + अॅडव्हान्सेस)
3,09,537
2,50,080
24 %
2,96,593
4%
नेट इंटरेस्ट इन्कम
2,122
1,774
20%
2,008
 6%
ऑपरेटिंग प्रॉफिट
1,911
1,589
20%
1,769
8%
निव्वळ नफा
1,036
837
24%
953
9%


प्रमुख गुणोत्तरे:

तपशील (% मध्ये)
Q1 FY 19
Q4 FY 18
नेट इंटरेस्ट मार्जिन
3.92
3.97
भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CAR)
14.70
15.03
रिटर्न ऑन अॅसेट्स
1.91
1.86
रिटर्न ऑन इक्विटी
17.25
16.56
प्रति शेअर उत्पन्न (मूलभूत रु.) (वार्षिक नाही)
17.25
15.88

जून 30, 2018 पर्यंतच्या तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:

·         तिमाहीत नेट इंटरेस्ट इन्कम (एनआयआय) 2,122.43 कोटी रुपये मिळाले, तर या तुलनेत अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत ते 1,774.06 कोटी रुपये होते, त्यामध्ये 20% वाढ झाली.

·         तिमाहीत कोअर फी इन्कम 1,164.80 कोटी रुपये मिळाले, तर या तुलनेत अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत ते 974.04 कोटी रुपये होते, त्यामध्ये 20% वाढ झाली. तिमाहीत नॉन-इंटरेस्ट इन्कम 1,301.60 कोटी रुपये मिळाले, तर या तुलनेत अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत ते 1,167.26 कोटी रुपये होते, त्यामध्ये 12% वाढ झाली.

·         तिमाहीत ऑपरेटिंग प्रॉफिट 1,911.13 कोटी रुपये मिळाला, तर या तुलनेत अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत तो 1,588.53 कोटी रुपये होता, त्यामध्ये 12% वाढ झाली.

·         तिमाहीत निव्वळ नफा 1,035.72 कोटी रुपये मिळाला, तर या तुलनेत अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीत तो 836.55 कोटी रुपये होता, त्यामध्ये 24% वाढ झाली.

·         कासा (करंट अकाउंट्स – सेव्हिंग अकाउंट्स) रेश्योमध्ये 43.42% पर्यंत सुधारणा झाली, तर 30 जून 2017 पर्यंत हे प्रमाण 37.78% होते.

·         एकूण अॅडव्हान्सेसचे प्रमाण जून 30, 2018 पर्यंत 1,50,675 कोटी रुपये होते, तर जून 30, 2017 पर्यंत ते 1,16,407 कोटी रुपये होते, त्यात 29% वाढ झाली.

·         एकूण ठेवी जून 30, 2018 पर्यंत 1,58,862 कोटी रुपये होत्या, तर या तुलनेत जून 30, 2017 पर्यंत त्या 1,33,673 कोटी रुपये होत्या, त्यात 19% वाढ झाली. एकूण व्यवसाय 3,09,537 कोटी रुपये झाला. बचत खाती जून 30, 2018 पर्यंत 47,711 कोटी रुपयांपर्यंत होती, जून 30, 2017 पर्यंतच्या 31,556 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 51% वाढ झाली.

·         नेट एनपीए जून 30, 2018 पर्यंत 0.51% होत्या, तर जून 30, 2017 पर्यंत 0.44% होत्या.

·         जून 30, 2018 पर्यंत, नेटवर्कमध्ये 1410 शाखांपर्यंत व 2285 एटीएमपर्यंत वाढ झाली, तर हे प्रमाण जून 30, 2017 पर्यंत अनुक्रमे 1210 शाखा व 2090 एटीएम होते.

कामगिरीविषयी बोलताना, इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोमेश सोबती यांनी सांगितले,

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, बँकेने वाटचालीची गती कायम राखली आणि सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. बँकेने आघाडी कायम ठेवली आणि बँकिंग ऑपरेशनच्या बाबतीत आणखी एक संतुलित व सातत्यपूर्ण वर्ष घालवण्यासाठी पुढील वाटचालीचे नियोजन केले आहे. बँकेच्या धोरणाच्या केंद्रस्थानी डिजिटायझेशन व ग्राहकांची सोय  हे घटक असून त्यामुळे बँकेच्या सेवेद्वारे यापुढेही ग्राहकांसाठी मूल्य निर्माण केले जाईल.

बँकेने चालू तिमाहीत निव्वळ नफ्यामध्ये 24 % वाढ नोंदवली व रिटर्न ऑन अॅसेट्स अगोदरच्या वर्षातील याच तिमाहीच्या 1.86% तुलनेत 1.91% पर्यंत वाढले आहे.


इंडसइंड बँकेविषयी
सन 1994 मध्ये कार्यास सुरुवात केलेल्या इंडसइंड बँकेतर्फे ग्राहक व कॉर्पोरेट ग्राहक अशा दोन्हींना सेवा दिली जाते. बँकेच्या तंत्रज्ञान सुविधेमार्फत मल्टि-चॅनल सेवा क्षमतांना पाठबळ दिले जाते. जून 30, 2018 पर्यंत, देशातील विविध ठिकाणी इंडसइंड बँकेच्या 1410 शाखा व 2285 एटीएम होती. बँकेची प्रतिनिधी कार्यालये लंडन, दुबई व अबूधाबी येथे आहेत. बँक आपला व्यवसाय तंत्रज्ञानावर आधारित चालवण्यावर भर देते. बीएसई व एनएसई या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांसाठी, तसेच एमसीएक्स, एनसीडीईएक्स व एनएमसीई असा प्रमुख कमोडिटी एक्स्चेंजसाठी बँक क्लिअरिंग बँक म्हणून काम करते. एप्रिल 1, 2013 रोजी इंडसइंड बँकेचा समावेश निफ्टी 50 बेंचमार्क इंडेक्समध्ये करण्यात आला. अलीकडेच बँकेने, डब्लूपीपी व मिलवर्ड ब्राउन यांचे पाठबळ असलेल्या ब्रँड्झ टॉप 50 नुसार आघाडीच्या 50 मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स 2015 मध्ये 13वे स्थान मिळवले व भारतातील आघाडीच्या 50 ब्रँडमध्ये सहावे स्थान मिळाले.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy