53 वर्षे जुन्या एसआरडीसीची नव्या संस्थेसह आयआयजी या नव्या रुपात नवी ओळख

53 वर्षे जुन्या एसआरडीसीची नव्या संस्थेसह आयआयजी या नव्या रुपात नवी ओळख
एसआरडीसी या भारतातील आघाडीच्या जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने 19 जुलै 2018 रोजी झालेल्या एका भव्य सोहळ्यात आपली आयआयजी (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जेमोलॉजीही नवी ओळख अधिकृतररित्या सादर केलीहा महत्त्वाचा टप्पा सादर करताना वनेस ज्वेल या आघाडीच्या हिरे उत्पादक कंपनीचे संस्थापक रमणिकभाई शहा आणि क्रिस्ट्रल डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक-संस्थापक भागीदार श्रीअरविंदभाई पारीख यांनी ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न बिल्डिंगमधील आयआयजीच्या नव्या संस्थेचे उद्घाटन केलेया क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे हरी कृष्ण एक्सपोर्ट चे. संस्थापक-व्यवस्थापकीय संचालक श्री. घनश्यामभाई ढोलकिया यांनी संस्थेच्या नव्या लोगोचे अनावरण केले. या क्षेत्रातील 150 हून अधिक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलीसध्या व्यवस्थापकीय संचालक राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाटचाली करणा-या आयआयजीने 1965 साली श्रीकांतीलाल देसाई  यांनी स्थापन केलेली कटिंग आणि पॉलिशिंग फॅक्टरी म्हणून आपली मुळे रोवलीया कारखान्यातील 500 जणांच्या दमदार संघाला अतुलनीय असे प्रशिक्षण देण्यात आले. आज कालांतराने 1980 मध्ये या संस्थेचे रुपांतर  श्रीजी राजेंद्र डायमंड क्सलासेस (एसआरडीसीया पूर्णवेळ जेम्स आणि ज्वेलरी इन्स्टिट्यूटमध्ये झाले
स्थापनेपासून या संस्थने जगभरातील 1,00,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यातील काही अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आता आयआयजी या नव्या ब्रॅण्ड ओळखीसह काम करताना ही संस्था जेम्स ज्वेलरी डिझायनिंग आणि मर्चंडायझिंगमधील विविध कोर्सेस उपलब्ध करून देईल आणि आता या संस्थेत नवे समकालीन कोर्स आणि अभ्यासक्रम उपलब्ध असतील. 

माझ्या वडिलांनी पाच दशकांपूर्वी सुरु केलेल्या या प्रयत्नांचा वारला पुढे नेणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आयआयजी हे आमच्या मानाच्या संस्थेचे नवे रुप म्हणजे भारतातील एक ऐतिहासिक क्षेत्र असलेल्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील शक्य तितक्या उत्कृट प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांना देणे हा आमचा प्रयत्न आहे व हा उपक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरू शकतो, अशे आयआयजीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल देसाई यांनी या कार्यक्रमात सांगितले. 

आयआयजी बद्दल
मुंबईमध्ये स्थापन झालेली आजि एसआरडीसीचे पाठबळ लाभलेली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ जेमोलॉजी (आयआयजीही 1965 पासून भारतातील एक आघाडीची जेमोलॉजिकल संस्था आहेया संस्थेचे नेतृत्व श्रीराहुल देसाई करत आहतेमुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आयआयजीने स्थापनेपासून 1,00,000 हून अधिक विद्यार्थ्यांना घडविले आहे. इथे खडे, हिरे आणि दागिन्यांचे डिझायनिंग तसेच मर्चंडायझिंगमधील विविध अभ्यासक्रम कामातून शिकणे आणि बाजारपेठेवर आधारित अभ्यासक्रम शिकविले जातात. रफ डायमंड असॉर्टमध्ये शिकवणा-या भारतातील काही निवड संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश आहे. वेनस ज्वेलतर्फे वेनस ग्रेडिंग सिस्टम या अत्यंत अचूक अशा डायमंड ग्रेडिंग उपकरणाचेही प्रशिक्षण इथे दिले जाते. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता