टारगस तर्फे अल्ट्रा-थिन ब्ल्यूटूथ कीबोर्ड टारगस केबी55 चे भारतात अनावरण केल्याची घोषणा

टारगस तर्फे अल्ट्रा-थिन ब्ल्यूटूथ कीबोर्ड टारगस केबी55 चे 
भारतात अनावरण केल्याची घोषणा


हा कॉम्पॅक्ट आणि अनुरूप कीबोर्ड तुमच्या स्मार्टफोन,लॅपटॉपला जोडला जाऊन तुम्हाला प्रवासातही काम करणे शक्य करतो


टारगस इंडिया, या आघाडीच्या आयटी उपकरण आणि कॉम्पुटरशी निगडीत कंपनीने आपल्या कीबोर्ड पोर्टफोलियोच्या विस्ताराची घोषणा अल्ट्रा-थिन मल्टी-प्लॅटफॉर्म ब्ल्यूटूथ कीबोर्ड टारगस केबी55 चे भारतात अनावरण करून केली आहे. फक्त5.1एमएम आकारातला हा कीबोर्ड उच्च कोटीचे तंत्रज्ञान आणि दर्जेदार बांधणी उत्तम तर्‍हेने केलेल्या रचनेत एकत्र आणतो. रु. 1,599/- एवढ्या किमतीला टारगस केबी55 सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.
मल्टी-प्लॅटफॉर्म या शब्दाला पूर्णपणे नवीन ओळख देताना,टारगस केबी55 विंडोज, मॅक, आयओएस आणि एँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर अनुरूप आहे. ब्लूटूथ 3.0 वायरलेस फिचर स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अथवा डेस्कटॉप बरोबर जोडायला मदत करते ज्यामुळे ग्राहकाला कोणत्याही उपकरणाबरोबर वापरण्याच्या निवडीची विविधता मिळते.
या अनावरणा प्रसंगी बोलताना रिजनल डायरेक्टर – प्रोडक्ट मार्केटिंग, एशिया आणि कंट्री मॅनेजर, मनिष अहेर म्हणाले की, “टारगस मध्ये आम्ही, ग्राहकांची नस ओळखण्यावर विश्वास ठेवतो. ग्राहकांचे व्यस्त आयुष्य लक्षात घेऊन आम्ही कॉम्पॅक्ट ब्लूटूथ कीबोर्ड आणला आहे. सगळ्यात स्लिम कीबोर्ड असल्याने हा नेण्यास सोपा आहे आणि ब्लूटूथ फिचरमुळे तो कोणत्याही उपकरणाच्या बरोबर अनुरूप ठरतो. टारगसचा त्रासमुक्त कीबोर्ड ही अत्यंत आशादायी उपलब्धता आहे आणि आम्हाला आशा आहे ग्राहक याचा आनंद घेतील.”
आपल्या वेगळ्या रूपाच्या जोरावर, हा अल्ट्राथिन कीबोर्ड कॉम्पॅक्ट आणि हलकी रचना याने परिपूर्ण असून टिकाऊपणा, मजबुती आणि स्टाईल यात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. सीझर-स्वीच कीजची रचना सहनशक्ती लक्षात घेऊन करण्यात आली आहे ज्यात टिकाऊपणा आणि प्रतिसादात्मकता आहे ज्यामुळेप्रत्येकवेळेला क्लिक केल्यावर अथवा स्वाईप केल्यावर चांगला प्रतिसाद मिळतो. कीबोर्ड मध्ये 2एएए बॅटरीसाठी जागा आणि लाइफ इंडिकेटर आहे ज्यातून त्या संपल्याचे कळते. एकदा कीबोर्ड कनेक्ट झाला की फक्त पॉवर ऑन/ऑफ वर फ्लिप करा आणि तुम्ही टाईप करण्यासाठी तयार आहात.

टारगस बाबत

टारगस® ने मोबाईल एक्सेसरी श्रेणीची आपल्या लॅपटॉप केस इंव्हेंशन द्वारे 30 वर्षांपूर्वी निर्माण केली. कंपनी मोबाईल एक्सेसरीज प्रकारात नवीन प्रयोग आणि योग्य पर्याय आजच्या जीवनशैलीनुसार देत प्रगती करत आहे. टारगस उत्पादने उत्पादकता, कनेक्टीव्हिटी आणि सुरक्षा यात सुधारणा करताना, ग्राहकांना सर्व वातावरणात त्याच्या मोबाईल उपकरणांपासून मोकळीक देत आराम आणि समाधान देतात. 1983 साली स्थापन झालेल्या टारगसचेमुख्यालय अनाहिम, कॅलिफोर्निया येथे आहे तर जगभरात ऑफिसेस आणि 100 पेक्षा जास्त देशात वितरण करार आहेत. टारगस बाबत अधिक माहितीसाठी भेट द्या http://www.targus.com

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24