लिंकने सादर केले जगभरातील नोबिलिटीच्या रँक्सने प्रेरित 'मजेस्टा'

लिंकने सादर केले जगभरातील नोबिलिटीच्या रँक्सने प्रेरित 'मजेस्टा'

लिंक पेन्स अँड प्लास्टिक्स लिमिटेड या लेखन सामग्री उद्योगातील चार दशकांहून अधिक काळ आपल्या योगदानांनी बेंचमार्क निर्माण करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने 'मजेस्टा' या ब्रँड अंतर्गत नवीन प्रीमियम पेन्सची शृंखला सादर केली आहे. पेन्सची हि नवी पिढी आपल्या ०.७ प्रीमियम टीपने एक पूर्णतः नवीन लिहिण्याचा अनुभव देते.


स्टेट ऑफ दि आर्ट जर्मन इंक तंत्रज्ञानामूळे शाई पसरत नाही तसेच लिहिलेली अक्षरेही सुंदर दिसतात. हे पेन्स विशेषतः त्यांच्यासाठी डिझाईन केली आहेत ज्यांना स्वतःवर विश्वास आहे.
मजेस्टाच्या लाँचविषयी बोलताना लिंक पेन्स अँड प्लास्टिक्स लिमिटेडच्या विपणन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख श्री रोहित दीपक जालान म्हणाले कि, "लिंकने त्यांच्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण अनुभव देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. मजेस्टाच्या लौंचसोबत जे ग्राहक आपण कोणता ब्रँड वापरात आहोत याविषयी चौकस असतात आणि ज्यांना आपली एक छाप सोडायची असते त्या ग्राहकांच्या वर्गापर्यंत जास्तीतजास्त पोहोचण्याची आमची योजना आहे. विविध व्यक्तिमत्त्वांबरोबर जुळून येतील असे विविध प्रकारचे पेन्स मजेस्टाच्या शृंखलेमध्ये असल्यामुळे हा एक आदर्श असा भेटवस्तू पर्यायही होऊ शकतो. आपल्या सुरुवातीच्या काळापासूनच लिंक हा नावीन्य आणि ग्राहकांचे समाधान यासाठी ओळखला जातो. या नवीन सादर केलेल्या प्रीमियम लेखन सामग्री शृंखलेमुळे लेखनाला एक नवीन परिमाण देऊ याची आम्हाला खात्री आहे."

'मजेस्टा' हे खाली नमूद केलेल्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत:
इम्पेरिओ - रु. ६५/-
सारा - रु. ७५/-
ट्रायम - रु. ८५/-
प्रिंसेप - रु. ९५/-
मोनार्क - रु. १०५/-

लवकरच सादर होणारे पेन्स:
नोबीला - रु. ५०/-
मजेस्टा रोलर - रु. १००/-

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता