कोटक महिंद्रा बँकेने सादर केली स्वतंत्र व्यक्ती आणि सोल प्रोप्रायटरशिप अकाऊंट्ससाठी तत्काळ चालू खाते उघडण्याची सुविधा


कोटक महिंद्रा बँकेने सादर केली स्वतंत्र व्यक्ती आणि सोल प्रोप्रायटरशिप अकाऊंट्ससाठी तत्काळ चालू खाते उघडण्याची सुविधा
कोटक महिंद्रा बँकेने (कोटक) स्वतंत्र व्यक्तींसाठी बायोमेट्रीकच्या माध्यमातून आणि सोल प्रोप्रायटरशिप अकाऊंट्ससाठी स्कॅनिंगच्या माध्यमातून तत्काळ चालू खाते उघडण्याची सुविधा सुरू केल्याची घोषणा आज केली.
आधारशी निगडीत बायोमेट्रिक खाते उघडण्याच्या सुविधेमुळे स्वयंरोजगार व गैर-व्यावसायिकांना तत्काळ चालू खाते उघडण्याची व कार्यान्वित करण्याची सुविधा मिळते.
सोल प्रोप्रायटरशिप व्यवसाय स्कॅनिंगच्या प्रक्रियेद्वारे कोटकमध्ये चालू खाते उघडू शकतात. यामुळे पूर्वी चालू खाते उघडण्यासाठी 6 ते 7 दिवस लागणारा वेळ कमी होऊन केवळ एक दिवसावर आला आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट पुनीत कपूर म्हणाले, “ग्राहकांसाठी बँकिंग जलद, सोपे आणि अधिक सुलभ करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. डाऊनलोड करण्याजोगे देशातील पहिले डिजिटल बँक खात्याची सुविधा 811 द्वारे आम्ही मार्च 2017 मध्ये सुरू केली. बायोमेट्रिक आणि स्कॅनिंगच्या प्रक्रियेद्वारे कुठल्याही त्रासाशिवाय व तत्काळ चालू बँक खाते उघडण्याचा अनुभव स्वतंत्र व्यक्ती आणि सोल प्रोप्रायटरशिप कंपन्यांना मिळेल.”
“स्वयंरोजगार करणारे आणि सोल प्रोप्रायटरशिपचे मालक आता त्यांच्या व्यवसायासाठी तयार केलेल्या विविध बँकिंग सुविधांचा लाभ सोप्या पद्धतीने घेऊ शकतील,” असेही कपूर म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning