९ महिन्यांच्या लहान बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया


मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट रूग्णालया मध्ये ९ महिन्यांच्या लहान बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
पश्चिम भारताचा विचार करता यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झालेले हे सर्वात लहान बाळ.
 मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट हॉस्पिटलमध्ये पालघर जिल्ह्यातील, घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या ९ महिन्यांच्या बाळावर जिवंत दात्याकडून घेतलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याचे वजन केवळ ५.६ किलो होते. सल्लागार अॅबडॉमिनल अवयव प्रत्यारोपण आणि एचपीबी शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. पश्चिम भारताचा विचार करता यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेले हे सर्वात लहान बाळ ठरले


नऊ महिन्यांच्या काव्यचे वजन केवळ ५.६ किलो होते. त्याला जन्मल्यापासूनच त्रास सुरू झाला होता. त्याला जन्मापासूनच यकृताचा बिलिअरी आर्टेसिया हा आजार झाला होता. या आजारामध्ये यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. २ महिन्यांचा असताना या बाळावर मुंबईतील एका रूग्णालयामध्ये एक मोठी शस्त्रक्रिया (पोर्टो-एंटरेस्टॉमी) करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि त्याच्या यकृताचे कायमचे नुकसान झाले. त्याच्या यकृताला लिव्हर सिऱ्हॉसिस हा आजार झाला. त्यामुळे त्याची वाढ खुंटली. त्याचे वजन ५.६ किलोपर्यंत येऊन थांबले. त्याला कावीळ झाली आणि पोटात पाणी साचले. त्याला दोन प्रकारचे प्राणघातक संसर्ग झाले होते. यावरील उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात दाखल करणे अति तातडीचे होते. काव्यचे वडील विवेक आणि आई निशा हे दोघेही वयाच्या तिशीत आहेत आणि ते रोजंदारीवर काम करतात. त्यांनी काव्यला मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट रूग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.

मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट पिडियाट्रिक हेपॅटोलॉजिस्ट  डॉ. ललित वर्मा यांनी सांगितले, "काव्य ६ महिन्यांचा असल्यापासून आम्ही त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या यकृताला सिऱ्हॉसिस झालेला होता. आम्ही पोटावर काही उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्यासाठी आणि त्याचे वजन वाढावे यासाठी अथक प्रयत्न केले. पण त्याचा फायदा झाला नाही. उलट संसर्गच झाला. त्यावेळी यकृत प्रत्यारोपण करणे हाच एक पर्याय शिल्लक होता.

काव्यच्या यकृताच्या जागी त्याच्या आईच्या यकृताचा काही भाग प्रत्यारोपित करण्यात आला. ही शस्त्रक्रिया १४ जून २०१८ रोजी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल १४ तास चालली आणि आता काव्यची प्रकृती सुधारली असून त्याला आता डिस्चार्ज देण्यात येणार आहे.मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील सल्लागार अॅबडॉमिनल अवयव प्रत्यारोपण आणि एचपीबी शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांनी या शस्त्रक्रिया करणाऱ्या चमूचे नेतृत्व केले. ते म्हणाले, "१० किलोपेक्षा कमी वजन असलेल्या मुलांवर प्रत्यारोपण करणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते.  काव्यबाबत सांगायचे झाले तर त्याच्यावर यापूर्वी झालेल्या दोन शस्त्रक्रियांमुळे त्याचे छोटे आणि मोठे आतडे यकृताशी अत्यंत घट्ट चिकटलेले होते. आम्ही हळुवारपणे आणि अत्यंत काळजीपूर्वक यकृत आणि आतडी विलग केली. या प्रक्रियेत किमान रक्तस्त्राव होईल याची आम्ही खातरजमा केली. कारण ३००-४०० मिलिपेक्षा जास्त रक्तस्त्राव हे बाळ सहन करू शकले नसते. संसर्ग झालेले संपूर्ण यकृत आम्ही काढून टाकले. आम्ही काव्यच्या आईच्या यकृताचा अत्यंत छोटा भाग विलग केला. त्याचे वजन २६० ग्रॅम होते. पण तेवढा भागसुद्धा बाळासाठी खूप मोठा होता. त्यामुळे एक विशिष्ट तंत्र वापरून आम्ही तो भाग अजून कमी करून २१० ग्रॅमपर्यंत आणला. त्यानंतर हे यकृत काव्यच्या शरीरात प्रत्यारिपोत करण्यात आले आणि अत्यंत लहान रक्तवाहिन्यांना (३-५ मिमी व्यास) जोडण्यात आले. यकृतात रक्तप्रवाह सुरू केल्यानंतर ते गुलाबी रंगाचे झाले आणि लगेचच काम करू लागले. शस्त्रक्रियेनंतर काव्यला स्थिर पण नाजूक अवस्थेत पीआयसीयूमध्ये ठेवण्यात आले. अशा लहान बाळांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान प्रत्येक बारीकसारीक तपशीलाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. बहुतेक रुग्णालयांमध्ये १० किलोहून कमी वजन असलेल्या बाळांमध्ये अवयव प्रत्यारोपण करणे टाळले जाते. मी अमेरिकेतील ड्युक विद्यापीठात घेतलेल्या प्रशिक्षणामुळे मला ही शस्त्रक्रिया करताना मदत झाली."

मुंबई सेंट्रल येथील वोक्खार्ट रूग्णालयामधील सल्लागार अॅबडॉमिनल अवयव प्रत्यारोपण आणि एचपीबी शल्यचिकित्सक डॉ. गौरव गुप्ता म्हणाले, "निशाची (काव्यची आई) अलीकडेच प्रसूती झाली. असे असूनही तिने पुढाकार घेऊन यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शवली. या शस्त्रक्रियेनंतर तिचीही प्रकृती आता सुधारली आहे."

वोक्खार्ट रूग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालक झहाबिया खोराकीवाला म्हणतात, "कितीही गुंतागुंतीची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आमचे हॉस्पिटल अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि आमच्याकडे उत्तम शल्यविशारद, हेपॅटोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्ट आहेत. मी अभिमानाने सांगू इच्छिते की, आमच्या नर्स लहान बाळांची अत्यंत काळजीपूर्वक शुश्रुषा करतात आणि ही बाळे लवकरात लवकर बरी होतील, याची खातरजमा केली जाते. या यकृत प्रत्यारोपणाने वोक्खार्ट रूग्णालयने एक नवा मापदंड घातला असून पश्चिम भारतात लहान बाळांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणारे हे एकमेव रूग्णालय ठरले आहे."

आपल्याला बाळाला नवसंजीवनी मिळाल्याने निशा आणि विवेक (आई व वडील) यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. काव्यचे वडील श्री. विवेक राऊत म्हणाले, "काव्य हा लढवय्या आहे, हे त्याने सिद्ध केले आहे. त्याने शस्त्रक्रिया आणि भूल या दोन्ही प्रक्रिया सहन केल्या. वोक्खार्ट रूग्णालय आणि डॉ. अनुराग व त्यांच्या


टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांनी काव्यची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. डॉ. अनुराग गेले १५ दिवस रात्रंदिवस आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य दिले.

वोक्खार्ट रुग्णालयांविषयी:

वोक्खार्ट रुग्णालये ही टर्शरी केअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची साखळी असून नागपूर, नाशिक, वाशी (नवी मुंबई), राजकोट, सुरत, दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई येथे या साखळीतील रुग्णालये आहेत. रुग्णांची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी वोक्हार्ड्‌ट रुग्णालयांमध्ये अतिप्रगत पायाभूत सुविधा तसेच जागतिक मापदंडांचे पालन करणाऱ्या प्रक्रिया आहेत. रुग्णाची सुरक्षितता व काळजी घेण्याचा दर्जा हे आपल्या धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या देशातील मोजक्या व्यावसायिकरित्या व्यवस्थापित कॉर्पोरेट रुग्णालय समूहांपैकी वोक्हार्ड्‌ट हॉस्पिटल्स लिमिटेड हा एक आहे. एकूण १५०० खाटांच्या रुग्णालयांमध्ये १०००हून अधिक नियमित कार्यप्रणाली आणि पद्धती क्लिनिकल तसेच नॉन-क्लिनिकल प्रक्रियांसाठी अवलंबल्या जातात. रुग्णांची सेवा आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा समृद्ध करणे, हे यामागील मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.