अॅलिएक्सिसच्या भारताप्रती असलेल्या वचनबद्धतेचा विस्तार

अॅलिएक्सिसच्या भारताप्रती असलेल्या वचनबद्धतेचा विस्तार
~आशीर्वाद पाइप्सच्या संपूर्ण मालकीसाठी करार~
अॅलिएक्सिस एसए, या अत्याधुनिक प्लास्टिक पाइपिंग यंत्रणांच्या उत्पादन आणि वितरणातील जागतिक स्तरावर अग्रेसर असणाऱ्या कंपनीने, आशीर्वाद पाइप्स प्रा. लि (``आशीर्वाद’’)चे उर्वरीत भाग कंपनीच्या संस्थापक पोद्दार कुटुंबाकडून संपादित केले आहेत.
या व्यवहारामुळे, अॅलिएक्सिस आणि पोद्दार कुटुंबातील २०१३ साली स्थापन झालेल्या संयुक्त व्हेंचरची यशस्वीपणे पूर्तता झाली आहे. दोन्ही भागीदारांनी निर्माण केलेल्या बळकट पायावर उभारणी करण्याकडे अॅलिएक्सिस लक्ष देणार आहे आणि याद्वारे भारतात प्लंबिंग आणि शेतकी बाजारपेठांमध्ये विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. अॅलिएक्सिससाठी भारत ही सर्वात प्रमुख बाजारपेठ आहे आणि या व्यवहारामुळे देशाप्रती असलेल्या दीर्घकाळ वचनाची पूर्तता केली जाणार आहे.
या व्यवहाराचा भाग म्हणून, अॅलिएक्सिसने आशीर्वादमधील पूर्वीच्या ६० टक्के भागांमध्ये अतिरिक्त ३७ टक्के भाग प्राप्त केले आणि उर्वरीत ३ टक्के भाग तीन वर्षांच्या कालावधीनंतर पोद्दार कुटुंबाकडून घेतले. या व्यवहाराचे आर्थिक व्यवहार जाहीर न करण्याचा निर्णय दोन्ही पक्षकारांनी घेतला आहे.
अॅलिएक्सिसचे सीईओ लॉरेंट लिनोईर म्हणाले की, ``भारतातील या नव्या टप्प्याबाबत आम्ही अतिशय उत्सुक आहोत, आता आशीर्वादचे कर्मचारी आणि आमचे वितरक भागीदार म्हणून आम्ही २,२०० लोक एकत्रित काम करणार आहोत. या संपादनामुळे अॅलिएक्सिसच्या भारतातील विकासात एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये आशीर्वादच्या विकासाला आता आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ शकणार आहोत आणि उपखंडांमध्येही आमच्या अॅक्टिव्हिटीजचा विस्तार करणार आहोत, संपूर्ण बांधकाम आणि शेतकी समुदायाला याचा लाभ मिळवून देण्यासाठी, आमच्या जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्णता आणि उत्पादनातील तज्ज्ञता यांचा लाभ घेतला जाईल.
मी आशीर्वादचे संस्थापक आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान व्यावसायिक भागीदार असलेल्या पोद्दार कुटुंबाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. अॅलिएक्सिसच्या पाठिंब्यासह आणि पवन, दीपक आणि विकास पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली आशीर्वाद देशातील एक आघाडीची कंपनी म्हणून विकसित झाली. आशीर्वादच्या संचालक मंडळात कायम राहून पवन यांनी यापुढची आमची अधिकृत संलग्नितता स्वीकारली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.’’
पवन पोद्दार, आशीर्वादचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक म्हणाले की, ``गेल्या काही वर्षांतील अॅलिएक्सिसबरोबरच्या आमच्या संयुक्त व्हेंचरबरोबर आम्ही आमचा व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढवला. गेल्या पाच वर्षांपासूनच्या भागीदारीसाठी आम्ही अॅलिएक्सिसचे आभार मानतो आणि आशीर्वाद चांगल्या हातात गेली आहे, यापुढेही आशीर्वादच देशातील प्लंबिंग सोल्युशन पुरवठादार म्हणून अग्रणी राहील. आशीर्वादच्या व्यवस्थापनात दीपक मल्होत्रा यांना पाठिंबा देताना मला अतिशय आनंद झाला आहे. दीपक अतिशय उत्तम व्यावसायिक आहेत, कंपनी अधिक उंचीवर जावी, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.’’
आशीर्वादने दीपक मल्होत्रा आणि सुनील बनठिया यांची व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि प्रमुख प्रक्रिया अधिकारी (सीओओ) या पदावर अनुक्रमे नेमणूक केली आहे, ५ जुलै २०१८ रोजीपासून ते कार्यभार सांभाळतील.
दीपक यांना कन्झ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि टेलिकॉम सर्व्हिस उद्योगक्षेत्रातील तब्बल २८ वर्षांचा अनुभव आहे. २०१७ साली अॅलिएक्सिसमध्ये रुजू होण्यापूर्वी ते पिअर्सन इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांना एअरटेल आणि एशियन पेंट्स यासारख्या कंपन्यांचाही बराच अनुभव आहे. दीपक यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रुरकी येथून बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल)ची पदवी घेतली आहे आणि भारतातील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मार्केटिंग) केले आहे.
सुनिल यांना पुरवठा चेन आणि प्रक्रिया यातील तब्बल २५ वर्षांचा अनुभव आहे. २०१७ साली अॅलिएक्सिसमध्ये रुजु होण्यापूर्वी ते 3एमबरोबर कार्यरत होते, तेथे त्यांनी आग्नेय आशियामधील सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशिया अशा विस्तारीत प्रक्रियांसाठी प्रादेशिक उत्पादने आणि पुरवठा चेन व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सुनील यांनी कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेन्कोलॉजी येथून बॅचलर ऑफ टेक्नोलॉजीची (केमिकल इंजिनिअरिंग) पदवी घेतली आहे.
दीपक आणि सुनील यांच्या सखोल ज्ञानाचा वितरण व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि प्रक्रिया व्यवस्थापन यासाठी लाभ होईल.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता