पुन्हा बरसल्या या जलधारा...

पुन्हा बरसल्या या जलधारा...
डॉकलाहल्ली उमेश
यांच्याद्वारे
वॉलथॅम सायंटिफीक कम्युनिकेशन मॅनेजरमार्स इंडिया.

मान्सुनच्या पहिल्या जलधारा बरसताच जीवाला बैचैन करणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळतोआपण मान्सूनच्या आगमनाचा आनंद लुटत असतानाच हा ओलसर मोसम आपल्या पाळीव जनावरांसाठी मात्र एक वेगळेच संकट घेउन येत असतोयामुळे आपल्या घरातील फरची त्वचा असणाऱ्या पाळीव प्राण्यांना मान्सूनच्या दुष्प्रभावापासून वाचवणे आवश्यक ठरते.

मार्स इंडियाचे वॉलथॅम सायंटिफीक कम्युनिकेशन मॅनेजर डॉकलाहल्ली उमेश यांच्यामते पाळीव प्राण्यांच्या मालकांनी मान्सूनमध्ये त्यांच्या लाडक्या जीवांवर उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची जाणीव ठेवली पाहिजेमान्सूनच्या कालावधीत वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पाळीव प्राणी घाबरुन सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचा प्रयत्न करतातविशेष म्हणजे काही पाळीव प्राणी वादळी वाऱ्यांना इतके घाबरतात की ते पुरते हादरुन जातातत्यांच्या अति घबराटीची लक्षणे म्हणजे थरथर कापणेस्वत:चे केस उपटण्याचा प्रयत्न करणेलपण्याचा प्रयत्न करणेचावण्याचा प्रयत्न करणे किंवा दात एकमेकांवर आपटणेवादळी वाऱ्याला घाबरुन तुमचा प्राणी सुटून पळून गेला तर तो सुरक्षित परतण्याची एकमेव आशा म्हणजे तुम्ही त्याची ओळख पटवण्यासाठी केलेली आधीची तरतूदहे टाळण्यासाठी वादळी वाऱ्याच्यावेळी पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यास उपयुक्त ठरणारी अँटी-अँक्झाइटी औषधे उपलब्ध आहेतही औषधे प्राण्यांना वादळी वाऱ्याच्यावेळी तणाव आणि भितीमुक्त ठेवण्याचे काम करतात.

मान्सूनच्या कालावधीत डासमाशा आणि पिसवासारखे परजीवी पाळीव प्राण्यांवर हल्ला करतातत्यामुळे पिसवांच्या चावण्यामुळे उद्भवणारी ऍलर्जीताप यांसारखे आजार त्यांना त्रस्त करु शकतातयासाठी एक जबाबदार मालक म्हणून आपण मान्सूनच्या कालावधीत प्राण्यांवर गोचीडपिसवा तसेच कीटकनाशक औषधांचा वापर केला पाहिजे.  

कुत्र्यांमध्ये पालीबेडूक आणि कोळी यांसारख्या प्राण्यांचा पाठलाग करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असतेकुत्री  एक तर त्या प्राण्यांना खातात किंवा तोंडात धरुन ठेवतातया प्राण्यांच्या शरीरात टॉक्सिक घटक असल्यामुळे त्यांचा संसर्ग पाळीव कुत्र्यांना होउन त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकार नेहमीच घडत असतातअशा प्रकारे कुत्र्यांना विषारी पाली आणि बेडकांपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी ते बाहेर असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणेच सर्वाधिक महत्वाचे ठरत असते.यासाठी त्यांना बाहेरच्या वातावरणात अधिक वेळ ठेवूच नये.

मान्सून नेहमीच अनेक प्रकारचे संसर्ग घेउन येत असतोतुम्ही तुमच्या पाळीव जनावरांना चारत असणाऱ्या बिफचिकन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसामधून घातक जीवाणूंचा संसर्ग होउ शकतोयासाठी पाळीव प्राण्यांना चारण्यासाठी तुमच्याकडून खरेदी केले जाणारे मांस स्वच्छतेची काळजी घेतल्या जाणाऱ्या दुकानातून खरेदी केलेले असावेत्यांना चांगल्या दर्जाचे पेट फूड देणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. (पेडीग्रीसारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड सगळीकडे उपलब्ध आहे.) हे ब्रँड्स तुमच्या पाळीव पाण्यासाठी 100% सुरक्षित मानले जातातहे पेट फूड्सही हवाबंद कंटेनर्समध्ये ठेवले तरच ते आर्दता किंवा दवामुळे खराब होण्याचा धोका टाळता येतो.
आपण सगळे पाळीव जनावरांवर प्रेम करत असतोमग त्यांच्यासाठी एक सुरक्षित आणि आरामदायक वातावरण करण्यासाठी थोडासा प्रयत्न करण्याचीही जबाबदारी आपण पाळली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24