नव्या फ्रँचायजी मॉडेलच्या माध्यमातून विस्तारीकरणाची पीएनजी ज्वेलर्स यांची महत्त्वाकांक्षी योजना

नव्या फ्रँचायजी मॉडेलच्या माध्यमातून विस्तारीकरणाची 
पीएनजी ज्वेलर्स यांची महत्त्वाकांक्षी योजना

आपल्या परंपरेचा वारसा अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच फ्रँचायजी मॉडेल जाहीर करण्याची घोषणा  केली. आयएफओ-इनिशिएल फ्रँचायजी ऑफरिंग या नावाने ही योजना राबविण्यात येणार असून याद्वारे ज्वेलरी ब्रँडच्या विस्तारीकरणाच्या उद्देशाने आगामी दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
ही घोषणा पीएनजी ज्वेलर्ससाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार असून अल्प काळातच आपल्या सर्वांत मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरणाची योजना आखली आहे.सुमारे 60 वर्षांपूर्वी पुण्यातील एका कुटूंबाचे स्वतःच्या मालकीचे आणि संचलित स्टोअरपासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविण्याची झेप घेणार्‍या पीएनजी ज्वेलर्सने महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, अमेरिका आणि युएई या ठिकाणी आऊटलेटस् उभारत मोठा पल्ला गाठला आहे. या फ्रँचायजी मॉडेलच्या माध्यमातून ब्रँडच्या वाढीच्या कार्यवाहीमधील पुढील एक रोमांचक टप्पा आहे आणि त्याचा आपल्या व्यवसायावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव पडेल, अशी अपेक्षा आहे.
पुढील दोन वर्षांच्या या कालावधीत पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी मॉडेलच्या माध्यमातून 15 नवीन स्टोअर उभारण्याची योजना आखली आहे. प्रामुख्याने, महाराष्ट्रात विशेषतः पुणे परिसरातील तळेगाव, पिरंगुट, उंड्री, चाकण यांसारख्या ठिकाणी,तसेच मुंबई परिसरात नवी मुंबई, मीरा रोड-भाईंदर व घोडबंदर रोड ठाणे,गोरेगाव, अकोला, दौंड, बार्शी, गोंदिया, यवतमाळ आणि मालेगांव या ठिकाणी मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच, महाराष्ट्रांतील कोकणात याचबरोबर मध्य पूर्व, अमेरिका, युके व पूर्व भाग यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक विस्तार करण्याची महत्वाकांक्षी योजना त्यांनी आखली आहे. पीएनजी ज्वेलर्ससोबत फ्रँचायजी सहयोगी म्हणून होण्यास इच्छुक असलेल्यांना एफओसीओ व एफओएफओ या दोन पध्दतींमध्ये निवड करता येणार आहे. यामध्ये पहिल्यापासून व्यवसायाचा अनुभव असणार्‍यांना तसेच नव्याने व्यवसाय प्रारंभ करणारे अशा दोघांनाही वाव मिळेल.
ही योजना दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे. छोट्या व्यावसायिकांना  सदिच्छा, विश्‍वास व विश्‍वासार्हता यांच्या आधारस्तंभावर उभारलेल्या पीएनजी ज्वेलर्सच्या प्रदीर्घ व्यवसायाचा फायदा घेण्याची व त्यांच्यासोबत संलग्न होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळेल. पीएनजी ज्वेलर्स तर्फे नव्याने जोडल्या जाणार्‍या आपल्या सहयोगींना तज्ञ मार्गदर्शन, विपणन सहाय्य,  नावलौकिक कमावलेले अभिनव डिझाईन्स व यशस्वी होण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधने देण्यात येतील. तसेच या फ्रँचायझीची स्थानिक बाजारपेठेबद्दल असलेली माहिती या स्टोअरसाठी फायदेशीर ठरेल.
सर्व स्टोअर्सना एक समान अत्याधुनिक व अभिनव आणि आकर्षक सजावट असणार आहे, जे या पारंपरिक ब्रँडच्या उच्च दर्जाच्या सेवांना पूरक ठरेल. सध्याच्या पीएनजी ज्वेलर्स स्टोअर्सप्रमाणेच या फ्रँचायझी स्टोअर्समध्ये देखील पीएनजी ज्वेलर्स स्टोअर्सप्रमाणे हिरे,सोने व चांदीचे दागिने उपलब्ध असतील.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले की, पीएनजी ज्वलेर्सच्या परंपरेचा विस्तार करत फक्त प्रादेशिक पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दागिने खरेदीसाठी पसंतीचे ठिकाण बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील  आहोत.आमच्या महत्त्वाकांक्षी विस्तारीकरणाच्या योजनेबाबत माहिती देताना मला अत्यंत आनंद होत असून ग्राहकांना यशस्वी फ्रँचायजी मॉडेलद्वारे अधिक आनंददायी अनुभव देऊ ही आशा आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता