आयजी इंटरनॅशनलची कॅमेट ट्रेडिंगसह भागीदारी

आयजी इंटरनॅशनलची कॅमेट ट्रेडिंगसह भागीदारी
~ पेरू देशातील रसाळ अॅवॅकॅडो फळे भारतात उपलब्ध करणार ~
 अतिशय ताजी आणि अनोखी विदेशी फळे उपलब्ध करून देऊन भारतीयांना सुखावणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या फळे आयातदार असलेल्या आयजी इंटरनॅशनलने पेरू देशातील आघाडीच्या ताज्या आणि प्रक्रिया केलेल्या फळांची व्यापारी कंपनी असलेल्या कॅमेट ट्रेडिंगसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीनुसार पेरू देशातील रसाळ अॅवॅकॅडो फळे भारतात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पेरू देशातील हास अॅवॅकॅडो फळांची पहिली पाठवणूक समुद्री मार्गाने होणार असून त्याद्वारे आयजी इंटरनॅशनलला ४० फूट कंटेनर मिळणार आहेत, ज्यामध्ये रसाळ, चवदार आणि गराने भरपूर युक्त असलेल्या अॅवॅकॅडो फळांच्या ४००० पेट्या असतील. त्यांचे वितरण मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकता, हैद्राबाद आणि कोचीन येथे केले जाणार आहे.

आयजी इंटरनॅशनल आणि कॅमेट ट्रेडिंग यांच्यातील ही भागीदारी भारतातील वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या फळ बाजारपेठेच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणार असून या क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करू शकणार आहे. कॅमेट ट्रेडिंगतर्फे हास आणि फ्युअर्ते अशा दोन जातींच्या अॅवॅकॅडो फळांचे उत्पादन करण्यात येते आणि पेरू देशातील हास अॅवॅकॅडो फळांची ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यातदार आहे. व्यावहारिकदृष्ट्या पाहता देखील हास अॅवॅकॅडो फळे ही जगामध्ये सेवन केल्या जाणाऱ्या अॅवॅकॅडो फळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
आयजी इंटरनॅशनलचे संचालक तरुण अरोरा म्हणाले, “भारतीयांना जगभरातील सर्वात ताजी आणि आरोग्यदायी फळे उपलब्ध करून देणे हे आयजी इंटरनॅशनलचे ध्येयधोरण आहे. त्यामुळे कॅमेट ट्रेडिंगच्या सहयोगाने रसाळ, चवदार आणि आरोग्यदायी अशी अॅवॅकॅडो फळे भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. फळे आणि भाजीपाला यांच्याबाबतीत भारतीय ग्राहक अत्यंत चोखंदळ व वैविध्याची आवड असणारा म्हणून ओळखला जातो आणि आता त्यांच्या आहारात अॅवॅकॅडोसारख्या अनोख्या विदेशी फळाची भर पडणार आहे. सफरचंद आणि आंबा या फळांप्रमाणेच अॅवॅकॅडो फळ देखील भारतीय घरकुलांमध्ये प्रमुख फळ म्हणून आपले स्थान पटकावेल, अशी आमची मनीषा आहे.”
हृदयासाठी अत्यंत आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या अॅवॅकॅडो फळामध्ये अतिशय लक्षणीय प्रमाणात पोटॅशियम असते, हा एक अशा प्रकारचा इलेक्ट्रोलाईट घटक आहे, ज्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंड कार्य बिघाड यांसारख्या आजारांपासून शरीराला संरक्षण मिळते. ही फळे ऑक्सिडीकरणाला विरोध करणारी असल्याने त्यांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जाण्यास मदत होते आणि उत्तम आरोग्य लाभते. एवढेच नव्हे तर यांच्यात असलेल्या चांगल्या कोलेस्टेरॉल आणि फोलिक अॅसिड घटकांमुळे अॅवॅकॅडो फळे ही गर्भवती महिला आणि लहान मुले यांच्यासाठी अतिशय प्रभावी अन्नपदार्थ - ‘सुपर फूड’ मानली जातात.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता