२३४ दशलक्ष देशी भाषा वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ८ प्रादेशिक भाषांमध्ये भारतमॅट्रिमोनीने लाईट अॅप सादर केले

२३४ दशलक्ष देशी भाषा वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ८ प्रादेशिक भाषांमध्ये भारतमॅट्रिमोनीने लाईट अॅप सादर केले
 वाढत्या ऑनलाईन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपली पोहोच वाढविण्यासाठी भारतमॅट्रिमोनी या आघाडीच्या आणि सर्वाधिक विश्वसनीय ऑनलाईन मॅचमेकिंग सेवेने प्रादेशिक भाषेमध्ये मोबाइल अॅप सुरु केले आहे. या भाषांमध्ये मराठीहिंदीगुजरातीतामिळतेलगूमल्याळमबंगाली आणि कन्नड या भाषा समाविष्ट आहेत.
 केपीएमजी - गूगल यांच्या २०१७ च्या अहवालानुसार इंटरनेटवर भारतीय भाषा वापरणाऱ्यांची संख्या हि ५३६ दशलक्ष पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतामध्ये हिंदीमराठीबंगालीतामिळकन्नड आणि तेलगू या भाषांचा इंटरनेटवर वापर करणाऱ्यांची संख्या हि जास्त आहे. टायर २ आणि टायर ३ क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत असलेला इंटरनेटचा वापरडेटाची कमी किंमत आणि स्मार्टफोनच्या कमी होणाऱ्या किमती यांमुळे भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
 हा ट्रेंड लक्षात घेऊन बहुभाषिक लाईट अॅप सादर करणारी भारतमॅट्रिमोनी हि पहिलीच आहे. आता उपयोगकर्ते त्यांचे प्रोफाइल बनविताना त्यांच्या इच्छेनुसार भाषा निवडू शकतील. भाषा निवडल्यामुळे त्यांना नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स या क्षेत्रीय भाषांमध्ये मिळण्यास मदत होईल. क्षेत्रीय साईट्सवर भाषानुरूप पर्याय उपलब्ध असतीलउदा: मराठीमॅट्रिमोनी वर मराठी आणि बंगालीमॅट्रिमोनी वर बंगाली भाषेचा पर्याय असेल.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.