एडलवाइजकडून सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स

एडलवाइजकडून सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) 20,000 मिलियन रुपये पब्लिक इश्यूची घोषणा

इश्यू 24 जुलै ते 16 ऑगस्ट 2018 या कालावधीत सुरु राहणार

एडलवाइज फायनान्स सर्विसेस लिमिटेडचा एनबीएफसी विभाग असणाऱ्या ईसीएल फायनान्स लिमिटेड (ईसीएल) ने आज सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सची (एनसीडीघोषणा केलीया पब्लिक इश्यूजची प्रति फेस व्हॅल्यू 1,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहेयाची एकत्रित संख्या 5,000 मिलियन इतकी आहे. 15,000 मिलियनपर्यंत ओव्हर-सबस्क्रिप्शन रिटेन करण्याचा उपलब्ध पर्याय धरुन ही संख्या एकूण 20,000 मिलियन (2,000 कोटी रुपये) आहे.

एनसीडीकडून 36 महिन्यांच्या कालावधीसाठी वार्षिक 9.45 इतक्या व्याज दराची घोषणा करण्यात आली आहे. 60 महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजाचा दर 9.65% तर 10 वर्षांच्या कालावधीसाठी तो 9.85% इतका दिला जाणार आहेयाशिवाय ओव्हरनाईट मुंबई इंटर बँक ऑफर रेट (एमआयबीओआर)शी लिंक असणारा फ्लोटिंग रेट पर्यायही उपलब्ध आहेया पर्यायानुसार गुंतवणुकदार 3 वर्षांसाठी वार्षिक सरासरी ओव्हरनाईट मुंबई इंटर बँक ऑफर रेट अधिक 2.5व्याज मिळवू शकतात. (अधिक माहितीसाठी कृपया ऑफर डॉक्युमेंट्स पहा).
क्रिसीलने या ऑफरिंगला क्रिसील एए/स्टेबल” तर आयसीआरएने आयसीआरए एए (स्टेबल)” मानांकन दिले आहेयावरुन अंदाज येतो की या ऑफर्स संपूर्णपणे सुरक्षित असून आर्थिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडते तसेच यामध्ये खूप कमी क्रेडीट रिस्क आहे.
ईसीएल फायनान्स लिमिटेडचे 31 मार्च 2018 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 30,600.27 मिलियन रुपये तर करवजा एकूण नफा (पीएटी) 4,620.47 मिलियन रुपये इतका निव्वळ नफा नोंदवण्यात आला आहेगेल्या आर्थिक वर्ष 2018 कंपनीचे एकूण उत्पन्न 39.32% सीएजीआर म्हणजेच 30,600.27 मिलियन आहेयाच वर्षात पीएटीची नोंद 30.35%म्हणजेच 4, 620.47 मिलियन रुपये इतका नोंदवण्यात आला आहेआर्थिक वर्षात कंपनीच्या लोन बुकमध्ये 37.84सीएजीआर म्हणजेच 220,081.23 मिलियन रुपयांची नोंद आहे.
इश्यूच्या माध्यमातून उभारली जाणारी निधी रक्कम कर्ज वितरणासाठी तसेच कॉर्पोरेट उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जाणार आहे.
या एनसीडी इश्यूसाठी एक्सीस बँक लिमिटेड आणि एडलवाइज फायनांशियल लिमिटेड लिड मॅनेजर्स म्हणून काम करत आहेतहा इश्यू 24 जुलै 2018 रोजी खुला होईल तर 16 ऑगस्ट 2018रोजी अर्ली क्लोजरच्या पर्यायाने बंद होईल**एनसीडी बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केला जाईल ज्यामुळे गुंतवणुकदारांसाठी लिक्विडिटी उपलब्ध होईल.
**इश्यूची सबस्क्रिप्शन लिस्ट सबस्क्रिप्शनसाठी कामाच्या सर्व दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असेलयासाठी नियोजित कालावधीत अर्ली क्लोजर किंवा एक्स्टेंशनचा पर्यायही उपलब्ध असेलया पर्यायाचा वापर करायचा असेल तर कंपनीच्या अधिकृत सक्षम संचालकाची संमती आवश्यक राहणार आहे

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24