‘द ऑल इंडिया एसे रायटिंग इव्हेंट’च्या १३ व्या सत्राला सुरुवात देशभरातून प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 ऑल इंडिया एसे रायटिंग इव्हेंटच्या १३ व्या सत्राला सुरुवात
देशभरातून प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई, जुलै २०१८ : हार्टफुलनेसश्री राम चंद्र मिशन (SRCMआणि  युनायटेड नेशन्स इन्फॉर्मेशन सेंटर फॉर इंडिया अॅण् भूतान यांच्यातर्फे अखिल भारतीय निबंध लेखन कार्यक्रम अर्थात  ऑल इंडिया एसे रायटिंग इव्हेंटच्या१३ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेले स्पर्धक http://www.sahajmarg.org/essay-event येथे भेट देऊन कार्यक्रमासंबंधी मार्गदर्शन आणि सूचना प्राप्त करू शकतील आणिआपल्या प्रवेशिका पाठवण्यासाठी essayevent@srcm.org येथे -मेल करू शकतील. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१८ आहेतसेचयामध्ये सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारलेजाणार नाही.
राष्ट्रीय पातळीसाठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रवेशिका पाठवायच्या असून राज्य पातळीसाठी तेलुगुबेंगालीगुजराथीकन्नडमल्याळममराठीउडियापंजाबी आणि तमिळ अशा नऊ प्रादेशिक भाषांत प्रवेशिका मागवण्यातआल्या आहेतयासाठी पुढीलप्रमाणे विभाग करण्यात आले आहेत :
  • विभाग   इयत्ता ९वी ते इयत्ता १२ वीविषय: “देअर इज  विस्डम ऑफ  हेड अॅण्  विस्डम ऑफ हार्ट  चार्ल्स डिकन्सशब्दमर्यादा६००
  • विभाग   पदवीधर (UGआणि पदव्युत्तर (PG) (स्पर्धकाची वयोमर्यादा २८ वर्षेपेक्षा कमी असावी आणि स्पर्धक नोकरी करणारे नसावेत). विषय: ‘ माइंड ऑल लॉजिक इज लाईक  नाईफ ऑल ब्लेडइट मेक्स हॅन्ड ब्लीड दॅट युजेस इट रवीन्द्रनाथ टागोरशब्दमर्यादा७५०
या कार्यक्रमाबद्दल बोलताना हार्टफुलनेसचे जागतिक गाईड आणि एसआरसीएमचे अध्यक्ष श्रीकमलेश डी पटेल म्हणाले, “जागतिक पातळीवर मानवी मूल्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि ती वाढीस लावणेहा याउपक्रमामागचा मुख्य हेतू आहेहार्टफुलनेस आणि युनायटेड नेशन्स इन्फॉर्मेशन सेंटर यांचे हे संयुक्त उद्दिष्ट आहेयाचा प्रसार करण्यासाठी परावर्तन आणि आत्मपरीक्षण या पद्धतींचा अवलंब केला जातोसहभागी होणाऱ्यांनाविषय देण्यात आलेला असून हा विषय ते स्वतःशी कसा जोडतात आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोयाचे विचार सखोल मनन करून परावर्तीत करण्यासाठी त्यांना प्रेरित केले जाणार आहेही केवळ एक आयत्यावेळची उत्स्फूर्त निबंध स्पर्धा नाहीयात सहभागी होणाऱ्यांना आपला निबंध सादर करण्यापूर्वी अभ्याससंशोधनचर्चा करण्यासाठी आणि विषयाबाबत सखोल मनन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार आहे.”
अतिशय नावलौकिक मिळवलेल्या या कार्यक्रमाने कालानुरूप वाढता प्रतिसाद अनुभवलेला आहे१२,००० ते १४००० संस्था यात सहभागी झाल्या असून दोन ते अडीच लाख निबंध प्रवेशिका मूल्यमापनासाठी सादर झालेल्याआहेतसंस्थात्मक पातळीराज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळी अशा विविध स्तरांवर मूल्यमापन प्रक्रीया पार पडली जाणार आहेअंतिम मूल्यमापन समितीमध्ये शिक्षणतज्ज्ञपीएचडीधारकआयआयटी किंवा व्यावसायिक असेउच्चशिक्षित आणि गुणवान आठ सभासद आलेल्या सर्व प्रवेशिकांची पडताळणी आणि मूल्यमापन करणार आहेत.
पारितोषिके : राष्ट्रीय पातळीवरील (इंग्रजी आणि हिंदीआणि राज्य पातळीवरील (इंग्रजीहिंदी आणि प्रादेशिकपहिल्या १० निबंधांना पारितोषिके दिली जाणार असून त्यामध्ये पहिल्या तीन विजेत्यांना पदक (मेडलआणियुएनआयसीचे संचालक  एसआरसीएमचे अध्यक्ष यांची संयुक्त स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहेसंस्थात्मक पातळीवरील पहिल्या दोन प्रवेशिकांना गुणवत्ता प्रशस्तीपत्रक आणि सर्वच प्रवेशिकांना सहभागाचेप्रमाणपत्र दिले जाणार आहे.
एसआरसीएमची माहिती : श्री राम चंद्र मिशन (SRCMही एक स्वयंसेवी संस्था असून अध्यात्माची गोडी असणाऱ्या जगभरातील इच्छुकांना अध्यात्मिक प्रशिक्षण देण्याचे काम या संस्थेच्या हार्टफुलनेस मेडिटेशनच्या माध्यमातूनदिले जातेया माध्यमाची मुळे संस्थेच्या सहज मार्ग यंत्रणेत दडलेली आहेतहृदयस्थ मार्गाचा अवलंब करून एक समतोल जीवन जगण्याचा मार्ग येथे दाखवला जातोएसआरसीएमची स्थापना .१९४५ मध्ये सहजनपूर येथील श्रीराम चंद्र यांनी आपले अध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक फतेहगडचे श्री राम चंद्र यांच्या सन्मानार्थ केलीभारतातील चेन्नई येथे जागतिक मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या आज जगातील प्रत्येक खंडात मिळून १०० हून अधिक देशांतशाखा ([SRCM Centers]आहेत.
हार्टफुलनेसची माहिती: हार्टफुलनेस ही राजयोग ध्यानधारणेची (मेडीटेशनपद्धती असून तिचा शोध विसाव्या शतकाच्या आरंभी लागलापुढे एक शतकभरानंतर हार्टफुलनेसचा जागतिक पातळीवर नागरी समाजशासकीयखातीशाळामहाविद्यालये आणि कॉर्पोरेट जगत असा सर्वत्र विस्तार झाला.  अधिक माहिती  www.heartfulness.org येथे मिळेलआज जगभरातील १३० देशांतील हजारो प्रमाणित स्वयंसेवी प्रशिक्षक आणि लक्षावधीहून जास्तलोक हार्टफुलनेस पद्धतीचा अवलंब करत आहेतजगभरातील शेकडो हार्टफुलनेस केंद्रांच्या माध्यामतून ही संख्या सातत्याने वाढतच चाललेली आहेदाजी या नावाने ओळखले जाणारे कमलेश डी पटेल हे हार्टफुलनेसचे चौथेजागतिक गाईड आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24