घरातील उपकरणांचा ‘कंट्रोल’ मोबाइलवर - मुंबईतील संकुल होतायेत स्मार्ट

घरातील उपकरणांचा ‘कंट्रोल’ मोबाइलवर - मुंबईतील संकुल होतायेत स्मार्ट

 अरे रे..एसी बंद करायचा राहिला..आतल्या खोलीतला दिवाही बंद करायला विसरलो किंवा विसरले अशी आरोळी प्रत्येकांच्या कानावर अधूनमधून पडत असते. मात्र, अशा विसरण्याच्या सवयीला कायमचा पूर्ण विराम देण्यासाठी चेतन बाफना यांनी ‘लोकेटेड’ अॅप विकसित करण्यात आले आहे.

या अॅपच्या मदतीने तुम्ही घरातून बाहेर पडताना कोणतेही उपकरण सुरू राहिल्यास ते तुम्ही कुठूनही अॅपच्या मदतीने केवळ एका क्लिकवर बंद करू शकणार आहात. एवढेच नव्हे तर बाहेरून घरी जाताना अॅपच्या एका क्लिकवर एसी सुरू करून आपली खोली थंडगार करू शकणार आहात.

सध्या मुंबई शहरात रहेजा युनिव्हर्सल यांच्या दोन नव्या प्रकल्पात, तसेच ओमकार, सनसिटी डेव्हलपर्स, सीबीआरई, नीलम रिएलटर्स, पीएसआयपीएल (कल्पतरू ग्रुप कंपनी) या संकुलात ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत दहा हजार लोकांनी  ‘लोकेटेड’ अॅप डाऊनलोड केले आहे. नव्या काळानुसार तंत्रज्ञानात बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर व्हावे तसेच वेळेची बचत व्हावी, याकरता हे ‘लोकेटेड’ अॅप तर अॅपच्या सुविधेसाठी व्यावहारिक प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी ‘आरयुपीएल’ अॅप विकसित करण्यात आले आहे. 

वाढता जगण्याचा वेग, पैसे कमावण्यासाठी होणारी कसरत आणि प्रवासात लागणारा वेळ यांचा एकत्रित परिणाम पाहता लोकांचे विसरण्याचे प्रमाण वाढताना दिसते. त्यातलाच एक भाग म्हणून अनेकदा घरातले महत्त्वाचे उपकरण बंद करण्यास लोक विसरतात, अशावेळी सुरक्षेच्या दुष्टिकोनातूनही कठीण समस्या उद्भवू शकते. अशावेळीही ‘लोकेटेड’ अॅप अतिशय उपयोगाचे ठरू शकते असे लोकेटेडचे ​​संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन बाफना यांनी सांगितले.

‘लोकेटेड’ आणि ‘आरयुपीएल’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना याचा फायदा होईल,यासाठी आनंद आहे. रिअल इस्टेट क्षेत्रांत नवे मार्ग उघडतील असा दावा
रहेजा युनिव्हर्सलचे व्यवस्थापकीय संचालक आशीष रहेजा यांनी केला.


‘लोकेटेड’ अॅप कसे चालते
आयोटी तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकटेडची संपूर्ण सिस्टिम चालते. घरात एक डिव्हाइस बसवले जाते. त्यावर सेंसर असतात. जे विद्युत उपकरणाला जोडले जातात. इंटरनेटच्या माध्यमातून त्यावर कंट्रोल मिळवला जातो. एखादे उपकरण सुरू राहिल्यास ते बंद करण्याचा पर्याय देण्यात येतो. तसेच एखादं उपकरण सुरू करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येतो. उदा. उन्हातून घरी जाताना घरात जाण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या घरातला एसी अॅपच्या मदतीने सुरू करू शकता. जेणे करून तुम्ही घरी पोहोल्यावर खोली पूर्णपणे थंडगार असेल. ही प्रणाली सध्या केवळ संकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून प्ले स्टोअरवर लोकेटेड अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता