आपल्या कुरिअरचा खर्च एक चतुर्थांश कमी करण्यासाठी पेपर एन पार्सलची मोबाइल-अॅप आधारित कूरियर सेवा

आपल्या कुरिअरचा खर्च एक चतुर्थांश कमी करण्यासाठी पेपर एन पार्सलची मोबाइल-अॅप आधारित कूरियर सेवा

पेपर एन पार्सलने नुकतेच मोबाईल अॅप आधारित कूरियर सेवा लाँच केली असून ह्या सेवेद्वारे शहरातील इतर कूरियर सेवांच्या तुलनेत स्थानिक पार्सल वितरणाचा खर्च कमीतकमी एक चतुर्थांशने कमी झाला आहे. 
       १३ वर्षाच्या तिलक मेहता यांच्या कल्पनेने साकारलेले हि अॅप-आधारित कूरियर सेवा मुंबई शहराच्या हद्दीत दररोज ग्राहकांच्या दरवाजात पोहोचण्यासाठी ५००० पुरस्कार विजेते डबेवाल्यांचे नेटवर्क मार्फत देते. पिक-अप किंवा डिलिवरीचे ऑर्डर घेण्यासाठी प्रत्येक डब्बेवाल्याकडे अँड्राईड फोन पी एन पी अॅपसह लोड केले गेले आहे. ही व्यवस्था वितरणची किंमत कमी करते.  

         एके दिवशी  तिलक मेहता हे आपली पुस्तके आपल्या काकांच्या घरी विसरले, आणि ती पुस्तके परत मिळवताना त्यांच्या लक्षात आले कि त्यांना हि पुस्तके मिळवताना किती मोठा खर्च झाला व किती मनस्ताप झाला ह्यामुळेच त्यांना ह्या ऍपची कल्पना सुचली.  
डब्बावाल्यांचे अन्न वितरण नेटवर्क जगातील सर्वात कार्यक्षम सेवांपैकी एक आहे.  मुंबई शहरातील पार्सल वितरीत करण्यासाठी मला हे नेटवर्क वापरायचे होते. अशाप्रकारे शहराच्या हद्दीतील कूरियर सेवा अधिक कार्यक्षम होऊन त्यावरील खर्च आटोक्यात येईल. पीएनपी मोबाईल एपचे लॉन्चिंग करून   पेपर्स एन पार्सलचे संस्थापक टिळक मेहता यांनी ह्या बाबतीत आपले मत व्यक्त केले. 
  सहसा स्थानिक कुरिअर पाठविण्याची किमान किंमत सुमारे १५० ते २०० रुपये आहे.  पेपर एन पार्सल मोबाईल ऍपचा वापर केल्याने, कुरियरचा किमान दर सुमारे ४० ते ५० रुपये असेल, सध्या डब्बे पोहोचविण्याचा डब्बेवाल्यांचा दरही एका दिवसाला साधारण ४० ते ५० रुपये आहे. 
पेपर एन पार्सल कूरियर डिलीव्हरीसाठी स्पर्धात्मक किमतींसह विना अडचण मोफत डिलिवरी, डोअर-टू-डोअर पिकअप सुविधा, एक यूझर- फ्रेंडली अॅप्स आणि थेट   ग्राहक सेवा व हेल्पलाईनची सेवा देते. तसेच  www.papersnparcels.com/ ह्या वेबसाइटवर आपल्या ऑर्डर देखील नोंदवू शकतो.  
           
पेपर्स एन पार्सलचे सीईओ घनश्याम पारेख ह्यावेळी म्हणाले की २०१९ च्या अखेरपर्यंत आम्ही प्रतिदिन कमीत कमी एक लाख डिलिव्हरीजचे उद्दिष्ठ ठेवले असून आणि त्यामुळे साधारण २००० हून अधिक लोकांना रोजगार मिळू शकेल.  ह्या मोबाईल ऐपमध्ये रियल टाइम ट्रेकिंग फीचर्स आणि संबंधित कूरियरच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक असेल.  ज्यामुळे सुरक्षा प्रणाली वाढेल. तसेच बीट चाचणी टप्य्यात हे ऍप दररोज ७०० ग्राहकांना सहजपणे हाताळू शकते असे आढळून आले आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता