लॉरिए इंडियाने मागवले त्यांच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप २०१८’साठी अर्ज

लॉरिए इंडियाने मागवले त्यांच्या फॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप २०१८साठी अर्ज
बारावी उत्तीर्ण तरुणींसाठी विज्ञान शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी . लाख रुपयांच्या ५० शिष्यवृत्ती
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख१६ जुलै २०१८
 ‘द वर्ल्ड नीड्स सायन्स अॅण्ड सायन्स नीड्स विमेन’ या घोषवाक्यासह लॉरिए इंडियाने भारतातील बारावी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींकडून ‘फॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप प्रोग्राम’च्या (एफवायडब्ल्यूआयएस) १६व्या आवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. लॉरिए इंडिया हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील ५० विद्यार्थिनींना मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठांतून विज्ञान शाखेची पदवी संपादन करण्यासाठी प्रत्येकी २.५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देणार आहे.
विज्ञानात स्त्रियांच्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेत लॉरिए इंडियाच्या संवादशाश्वतता आणि जनव्यवहार विभागाच्या प्रमुख स्नेहल चितनेनी म्हणाल्या, “विज्ञान हाच प्रगतीचा स्रोत आहे आणि त्यात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे यावर लॉरिएचा ठाम विश्वास आहेफॉर यंग विमेन इन सायन्स स्कॉलरशिप या आमच्या उपक्रमाचे लक्ष्य विज्ञानात शिक्षण किंवा करिअर करू इच्छिणाऱ्या पण त्यासाठी पुरेसे पाठबळ नसलेल्या तरुणींना मदत व प्रोत्साहन देणे हेच आहेया उपक्रमाचे हे १६वे वर्ष असूनभविष्यातही अनेक पात्र उमेदवारांपर्यंत पोहोचता येईल अशी आशा आम्हाला वाटते.”
हा कार्यक्रम सुरू केल्यापासून म्हणजेच २००३ सालापासून लॉरिए इंडियाने भारभरातील मुलींना ३०० शिष्यवृत्ती दिल्या आहेततरुण प्रतिभावान मुलींना त्यांची स्वप्ने व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत लक्षणीय प्रगती साधण्यास हा उपक्रम मदत करत आहे.
लॉरिए इंडिया फॉर यंग विमेन इन सायन्स’ शिष्यवृत्ती कार्यक्रम हा आंतरराष्ट्रीय लॉरिए-युनेस्को यांच्या विमेन इन सायन्स कार्यक्रमाचाच विस्तारित भाग आहेगेल्या वर्षी या शिष्यवृत्तीसाठी देशभरातून ३०००हून अधिक अर्ज आलेतपशीलवार मूल्यांकन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्वांत पात्र अशा ५० उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
पात्रता निकष भारतातील मार्च २०१८ मध्ये संपलेल्या शैक्षणिक वर्षांत बारावीची परीक्षा पीसीएम/पीसीबी ग्रुपमधून किमान ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व ३१ मे  २०१८ रोजी ज्यांचे वय १९ वर्षे किंवा त्याहून कमी आहे अशा तरुण मुली या शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठवण्यात पात्र आहेत.
विज्ञानाच्या पुढीलपैकी कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती वापरता येईल : वैद्यकीयइंजिनीअरिंगतंत्रज्ञानफार्मसीजैवतंत्रज्ञान आणि विज्ञान शाखेतील अन्य पदवी अभ्यासक्रम (बीएससी.)
अर्ज कसा करावा : विद्यार्थिनी पुढील लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात http://www.foryoungwomeninscience.com/ किंवा वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून तो भरून लॉरिए इंडिया स्कॉलरशिप सेलकेअर ऑफ बडीफॉरस्टडीस्टेलर आयटी पार्क सी-२५क्रमांक ८९ आणि दहाटॉवर-तळमजलासेक्टर-६२नॉएडाउत्तर प्रदेशभारत,२०१३०१ या पत्त्यावर कुरिअरद्वारे पाठवू शकतातआवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे १६ जुलै २०१८.
मुलाखतीची ठिकाणे: मुंबईगुगावबेंगळुरूहैदराबादकोलकाता.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा०२२-६७००३००० या फोन क्रमांकावर किंवा ईमेल पाठवा fywis.india@loreal.com या पत्त्यावर.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.