‘उत्सवी’च्या विविध इकोफ्रेंडली मखरांचे भव्य प्रदर्शन!

v  १८ वर्षे बंद कारखान्याचे दरवाजे कला प्रदर्शनासाठी खुले!
v  उत्सवी’च्या विविध इकोफ्रेंडली मखरांचे भव्य प्रदर्शन!
v  मुलांमधल्या कलागुणांना इकोफ्रेंडली सांगड!
v  कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नानासाहेब शेंडरांचे पुढचे पाऊल!
v  नगर व मुंबईत प्रदर्शन सुरु! लवकरच इतर शहरांमध्येही प्रदर्शने भरणार!


नानासाहेब शेंडकरांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी-मावळा’ गावातील थर्माकोल मखर निर्मितीच्या कारखान्याला १८ वर्षांपूर्वी कायमचे टाळे ठोकले होतेपण आता या वास्तूमध्ये त्यांनीच  निर्माण केलेल्या नव्या युगाची साथ करणाऱ्या भव्य इकोफ्रेंडली मखरांचे कलाप्रदर्शन विद्यार्थी व कलाप्रेमींसाठी त्यांच्याउत्सवी’ संस्थेने भरविले आहे. या प्रदर्शनात मांडलेल्या सर्व कलाकृती शुद्ध इको फ्रेंडली’ असून संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या पर्यावरणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या उद्देशाने शालेय जीवनापासुन मुलांमध्ये हे बीज रुजावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने नानासाहेब शेंडकरांनी ही वास्तू प्रदर्शनाच्या निमित्ताने खुली केली आहे. कागदी पुठ्ठ्यांपासून निर्मिती केलेल्या विविध कलाकृती मुलांसोबतच पाहणाऱ्या कलाप्रेमींना सुखद अनुभूती देत असून सर्व वयोगटातील रसिकांसाठी हे प्रदर्शन खुले आहे.
२००१ साली नानासाहेब शेंडकर यांनी ५० एकर शेतात असलेला आपला दोन एकरात विस्तारलेला१०० हुन अधिक कामगार - कारागीर यांच्या सोबतीने उभारलेला सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला थर्माकॉल डेकोरेशन निर्मितीचा कारखाना’ ऐन मागणी असताना बंद करून पर्यावरण पुरक इको फ्रेंडली डेकोरेशनचा डोळस निर्णय घेत समाजासुखाकरिता एक महत्वाचा निर्णय घेतला. खरंतर त्यांनीच थर्माकॉल निर्मितीचे तंत्रज्ञान विकासिक करून जवळपास १५० ते २०० पॅटर्णची मखरे बाजारात आणली होती. पण ज्या क्षणाला थर्माकॉल पासून होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव त्यांना झाली त्याक्षणी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता तडकाफडकी हा कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय नानासाहेबांनी घेऊन ऐश्वर्यसंपन्न जीवनासोबत फारकत घेत पर्यावरणाला हानी पोहचविण्यार्या गोष्टींना कडक विरोध दर्शवितपर्यावरणाला पुरक वस्तूंच्या निर्मितीस प्रारंभ केला.
अहमदनगर लोणी-मावळा’ येथील प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्र खानदेशातील प्रथेनुसार गणेशमूर्तींना उंचीला साजेश्या मखरांची उंची १६ फुटांपासून २ फुटांपर्यंत आहेत. असेच मुंबईतील प्रदर्शनात २४ फुटांपासून २ फुटांपर्यंतच्या विविध रंगसंगतीतील वैविध्यपूर्ण मखरांची सजावट कलाप्रेमी गणेशभक्तांना पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध असून घरगुती मखरांपासून थेट सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ही विविध आकारातील आणि तितकीच विविधता असलेली अत्यंत काळजीपूर्वक तयार केलीली मखरे हाताळायला आणि वापरायलाही तितकीच सोप्पी व सुलभ असून सजावट करताना आपल्या पूर्ण समाधान तर देतातच सोबत आपल्यातल्या कलावंताही ती चालना देणारी आहेत. या सर्व मखरांचे डिझाईन हे भारतीय कला - संस्कृतीपासून प्रेरित आहे.
गेली ३२ वर्ष सातत्याने पर्यावरणाला अनुकूल मखरांची निर्मितीचा ध्यास घेतलेल्या उत्सवीचे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांनी जे. जे. स्कूल आ@फ आर्ट्स मध्ये  त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. गेली ४५ वर्षे कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जाहिरातक्षेत्रचित्रपट आणि नाट्यक्षेत्रांमध्ये विपुल कामगिरी केली आहे. टी के देसाईदेव आनंदकेतन आनंदरमेश सिप्पीमुखर्जी ब्रदर्समनमोहन देसाई इत्यादींसाठी नानासाहेबांनी काम केले असून जवळपास ५० हून अधिक चित्रपटांसाठी सेट उभारणी केली आहे.
उत्सवीच्या नव्या मखरांची उत्सुकता कायम असून आता ती शिगेला पोहचली आहे. गणेशोत्सवानिमित्त कागदी पुठ्यांची इकोफ्रेंडली’ मखरे तयार करणारी उत्सवी ही एकमेव संस्था आहे. नानासाहेब शेंडकर यांच्या सृजनशील कल्पकतेतून आकाराला येणारी विविधरंगी विविधढंगी आकर्षक कागदी मखरे महाराष्ट्रासह जगभरातील कलाप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय असून या मखरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेली १७ वर्षांहून अधिक काळ उत्सवी’ ही एकमेव संस्था अश्या पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती करीत आहे. कलाप्रेमी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षीही नेहमीप्रमाणे यात काही नवीन आकर्षक डिझाईनची भर पडणार असून सतत प्रयोगशील असणारे नानासाहेब आणि त्यांचे सहकारी अधिक आकर्षक मखरांच्या निर्मितीत व्यस्त आहेत.
या सोबतच उत्सवीचे मुंबईत इको फ्रेंडली मखरांचे, लालबाग येथील प्रभा कुटिर,  गणेश गल्ली,  लालबाग,  मुंबई – ४०००१२ येथे सकाळी १०.०० ते  रात्री. १०.०० या वेळेत प्रदर्शन भरले असून ते  सलग १३ सप्टेंबर २०१८ पर्यंत प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ०२२-२४७११०३८ उत्सवी 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24