टीसीएनएस क्लोथिंग कं. लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्री

टीसीएनएस क्लोथिंग कं. लिमिटेड
टीसीएनएस क्लोथिंग कं. लिमिटेड: प्रारंभी समभाग विक्रीला जुलै 18, 2018 रोजी सुरुवात होणार व जुलै 20, 2018 रोजी विक्री बंद होणार

किंमतपट्टा: प्रति इक्विटी शेअर 714 रुपये ते 716 रुपये
टीसीएनएस क्लोथिंग कं. लिमिटेडने (“कंपनी”) 15,714,038 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीला जुलै 18, 2018 रोजी सुरुवात करायचे ठरवले आहे (“ऑफर”). या ऑफरमध्ये ओंकार सिंग पसरिचा, अरविंदर सिंग पसरिचा (एकत्रित, “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), अनंत कुमार दगा, सरनप्रीत पसरिचा, अंगद पसरिचा, विजय कुमार मिश्रा व अमित चांद (एकत्रित, “अदर सेलिंग शेअरहोल्डर”) वॅगनर लिमिटेड (“वॅगनरकिंवाइन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”) यांच्यातर्फे ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफरनंतरच्या कंपनीच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलामध्ये या ऑफरचे प्रमाण 25.63% असेल.

बिड/ऑफर पिरिएड जुलै 20, 2018 रोजी बंद होणार आहे. बीआरएलएमच्या सल्ल्याने कंपनी, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स व इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारिख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग दिवस अगोदर असेल.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 714 रुपये ते 716 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 20 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 20 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
ऑफरसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड व सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत. ऑफरसाठी कार्वी कम्प्युटशेअर प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.
सुधारणा केल्यानुसार, ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, 1957च्या रुल 19(2)(b) नुसार, (“एससीआरआर”) केली जाणार आहे. बदल केल्यानुसार, ऑफर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, 2009 च्या (“सेबी आसीडीआर रेग्युलेशन्स”) रेग्युलेशनच्या नियम 26(1) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेनुसार दिली जाणार असून, त्यामध्ये ऑफरपैकी 50% शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी श्रेणी”) राखून ठेवले जातील, मात्र कंपनी, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स व इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर हे बीआरएलएमच्या सल्ल्याने क्यूआयबीपैकी 60% पर्यंत भाग कदाचित अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइसनुसार अँकर इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवतील (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”).  अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी किमान एक-तृतियांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर अलोकेशन प्रइसने वा त्याहून अधिक वैध बोलीनुसार केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखले जातील. ही प्राइस कंपनी, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स व इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर हे बीआरएलएमच्या सल्ल्याने ठरवतील. क्यूआयबीच्या 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी (अँकर इन्व्हेस्टर वगळता) उपलब्ध होतील, उर्वरित क्यूआयबी भाग विशिष्ट प्रमाणात म्युच्युअल फंडांसह क्यूआयबी बिडरना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल.
तसेच, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार, ऑफरपैकी किमान 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक बिडर्ससाठी राखून ठेवला जाईल आणि विक्रीच्या किमतीइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोली व रिटेल इंडिव्हिज्युअल बिडरसाठी किमान 35% शेअर्स राखून ठेवता येतील. अँकर इन्व्हेस्टर व्यतिरिक्त सर्व बिडरना अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. या खात्यात एससीएसबीकडून बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकेमार्फत (एससीएसबी) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सहभागी होता येणार नाही. 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.