सुपरस्टार रणवीर सिंग आणि मिस वर्ल्ड मनुषी चिल्लर यांच्या जाहिरातीसोबत क्लब फॅक्टरीचे भारतीय बाजारपेठेत दमदार पदार्पण


सुपरस्टार रणवीर सिंग आणि मिस वर्ल्ड मनुषी चिल्लर यांच्या
जाहिरातीसोबत क्लब फॅक्टरीचे भारतीय बाजारपेठेत दमदार पदार्पण
देशभरातील लाखो लोकांना एकत्र आणून त्यांच्यातील बंध घट्ट करणारी ई-कॉमर्स विभागातील एक महत्वाची कंपनी म्हणजे क्लब फॅक्टरी या कंपनीने भारतीय बाजारपेठेच्या जाहिरात क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. या जाहिरातीत सुपरस्टार रणवीर सिंग आणि मिस वर्ल्ड मनुषी चिल्लर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
स्टाईलची जणू उपजतच जाण असलेला रणवीर आणि क्लब फॅक्टरी तसेच प्रसन्न व्यक्तिमत्व असणारी सौंदर्यवती मनुषी चिल्लर यांमध्ये एक उत्तम लय निर्माण झाली आहे. रणवीर तर एक स्टाईलची परिभाषा बदलवू शकणारा एक फॅशन आयकॉन आहे. हे दोघेही फॅशन फॅक्टरीसोबत जोडले गेल्याने आमच्या ग्राहकांसोबतची नाळ अजून घट्ट होईल तसेच क्लब फॅक्टरीच्या गुणधर्माची लोकांना नव्याने ओळख होईल, असे क्लब फॅक्टरीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विन्सेन्ट लू यांनी सांगितले.
यावेळी रणवीर सिंग म्हणाला की, सर्वांसाठी फॅशन उत्पादने ऑनलाईन उपलब्ध करून देणा-या क्लब फॅक्टरीसोबत जोडले जाणे माझ्यासाठी आनंददायी आहे. ख-या अर्थाने क्लब फॅक्टरी माझ्या स्टाईलची जाण परिभाषित करते. ऑनलाईन बहुरंगी, बहुढंगी पेहराव उपलब्ध करून देणारे, तरुणाईमध्ये क्लब फॅक्टरी नक्कीच हीट होईल.
रणवीर सिंग आणि मनुषी चिल्लर यांच्या अभिनयाने नटलेली ही जाहिरात 7 जुलै 2018 या दिवशी प्रसारमाध्यमातील प्रत्येक परिक्षेत्रात झळकणार आहे. कंपनी आजच्या घडीतील भारतातील एक आघाडीची ई कॉमर्स कंपनी असून अवघ्या दीड वर्षात त्यांना 7 कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता