परकीय चलन व्यवसायाच्या दृष्टीने थॉमस कूक इंडियाची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर

परकीय चलन व्यवसायाच्या दृष्टीने थॉमस कूक इंडियाची
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर
-    विद्यार्थ्यांचा परदेशात जाण्याच्या मोसमाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने
`स्टडी बडी` योजना
आकर्षक डील्स, विशेष ऑफर्स आणि खात्रीशीर भेटवस्तू
थॉमस कूक इंडियाच्या ओम्नी-चॅनलच्या माध्यमातून ३ महिने योजना

उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे ध्यानी घेऊन एकात्मिक ट्रॅव्हल आणि प्रवासाशी संबंधित वित्तीय सेवा पुरविणाऱ्या थॉमस कूक (इंडिया) लि. या आघाडीच्या कंपनीने `स्टडी बडी` या योजना आणली आहे. पूर्णपणे विद्यार्थी केंद्रीत विदेशी चलन विनिमयाला चालना देणारी ही योजना पुढील तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबर २०१८ तारखेपर्यंत थॉमस कूक इंडियाच्या सर्व ओम्नी चॅनल नेटवर्कसह भारतभरातील सुमारे १५० फॉरेन एक्स्चेंज आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहे.

पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून थॉमस कूक इंडियाने गेल्या ३-४ वर्षांत विद्यार्थ्यांसाठीच्या विदेशी चलन व्यवसायात लक्षणीय अशी २० ते २५ टक्क्यांची वर्षागणिक वाढ नोंदवली आहे. चांगल्या वाढीची संभाव्यता आणि वाढत्या मागणीचा लाभ घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विदेशी चलन विनिमयातील बाजारहिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने थॉमस कूक इंडियाने `स्टडी बडी` हे धोरणात्मक तीन महिन्यांसाठी आणले आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासासाठीच्या बुकिंगचा असल्याने त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. `स्टडी बडी`अंतर्गत विद्यार्थ्यांना विदेशी चलन विनिमयासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि डील्स कंपनीने देऊ केले आहेत. त्यात २० टक्के सवलत असलेले मैंत्रा गिफ्ट व्हाऊचर.

स्कायबॅग्जवर १० टक्के सवलत आणि दररोज भाग्यवान विजेत्याला लॅपटॉप अशा खात्रीशीर बक्षीस योजानही लागू करण्यात आली आहे.
स्टडी बडी ऑफर्सच्या व्यतिरिक्त थॉमस कूक इंडियाच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या लाभाच्या विविध योजनाही आहेत:
·         विदेशी चलन खरेदीचा आकर्षक दर
·         घरपोच सेवा
·         विद्यापीठ / ट्युशन फी आणि राहण्याच्या खर्चासाठी पैसै पाठवण्यावर कोणतेही शुल्क नाही
·         थॉमस कूक इंडियाच्या बॉर्डरलेस आणि वन करन्सी प्रीपेड कार्डाची सुविधा आणि सुरक्षितता
·         एटीएममधून नि:शुल्क पैसे काढण्याची सुविधा
·         जगभरातील चलनांतील चलनी नोटा आणि डिमांड ड्राफ्ट्स
·         विद्यार्थ्यासाठी विशेष विमान प्रवासभाडे; मूळ भाड्यावर १० टक्के सवलत
·         निवडक एअरलाइन्सवर ज्यादा सामान भत्ता
·         परदेश प्रवासाचा विमा
थॉमस कूक (इंडिया) लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष, फॉरेन एक्स्चेंज – सेल्स आणि रिलेशनशिप मॅनेजमेन्ट, श्री. दीपेश वर्मा म्हणाले की, `विद्यार्थी प्रवासाची भारतातील बाजारपेठ ही लक्षणीय संधी असून थॉमस कूक इंडियाने वर्षागणिक २०-२५ टक्के वाढ नोंदवल्याचे आम्ही पाहिले आहे. म्हणूनच मागणीचा लाभ जास्तीत जास्त व्यवहार करण्यासाठी आणि `स्टडी बडी` ही संकल्पना आणली असून विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासाच्या मोसमाचा कालावधी यासाठी निवडला आहे. `स्टडी बडी`च्या आकर्षक ऑफर्स आणि खात्रीशीर भेटवस्तू या योग्य मोल मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थीवर्गाला समाधान देणाऱ्या आहेत.`

ते पुढे म्हणाले, `विदेशी चलन विनिमयातील तज्ज्ञ म्हणून विद्यापीठ/ ट्युशन फीसाठी नि:शुल्क पैसै पाठवणे, फॉरेक्स प्रीपेड कार्ड्स आणि चलनी नोटा उपलब्ध करून देणे या आमच्या प्रमुख सेवा व उत्पादने आहेत. तसेच अनेक वर्षांच्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांना विदेशी चलनाबाबतचे बदलणारे नियम परदेशात विदेशी चलन घेऊन जाण्याचा सुरक्षित मार्ग याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. याच्या जोडीला `स्टडी बडी` उपलब्ध करून दिल्यामुळे विदेशी चलन मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना एक परिपूर्ण सेवा आमच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून आमच्या ओम्नी-चॅनल नेटवर्कमुळे ती अधिक सुलभ झाली आहे.`

Comments

Popular posts from this blog

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम